प्रतिनिधी। । अहमदनगर जिल्हा हा सर्व क्षेत्रात आघाडीवर आहे, तसा तो आता गुन्हेगारी क्षेत्रात आघाडीवर चालला आहे, जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून त्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे, जिल्ह्यात अनेक ठिकाणी सध्या पोलिसांचे प्रभारी राज चालू असून सर्वकाही साई भरोसे सुरू असल्याने जिल्ह्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे, जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र असणाऱ्या श्री साईबाबांच्या शिर्डी पावन भूमीत हीच परिस्थिती असून शिर्डीत वाढलेली गुन्हेगारी वाढतच चालली आहे ,त्यामुळे शिर्डीतील सर्वसामान्य ग्रामस्थ व साईभक्त त्रस्त झाले आहे त्यामुळे या गुन्हेगारीच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा पत्रकार जितेश मनोहरलाल लोकचंदाणी यांनी एका पत्रकान्वये दिला आहे,
अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रात क्षेत्रफळाने मोठा असलेला जिल्हा असून जिल्हा सामाजिक, आर्थिक ,शैक्षणिक ,राजकीय क्षेत्रांमध्ये आघाडीवर आहे ,अशा या जिल्ह्यात आता गुन्हेगारांनी मोठा कळस केला आहे, गुन्हेगारी क्षेत्रात हा जिल्हा आता आघाडीवर चालला असल्याचे दिसत आहे, मात्र अहमदनगर जिल्ह्यात पोलिसांची संख्या कमी असल्याचे थातूरमातूर कारण सांगत पोलीस दलाचे गुन्हेगारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, त्यामुळे जिल्ह्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढतच आहे ,सर्वत्र अवैध वाहतूक, अवैध धंदे ,अवैध दारू, मटका, जुगार, वाळूतस्करी गुटखा विक्री ,गुंडगिरी, मोठ्या प्रमाणात सुरू असताना त्याकडे कमी पोलिस बळाचे कारण दाखवून जाणीवपूर्वक कानाडोळा केला जात आहे, मात्र त्याचे खरे कारण वेगळेच असून या दोन नंबर धंदा व गुन्हेगारी क्षेत्राकडून मोठ्या प्रमाणात चिरीमिरी मिळत असल्याने अनेक पोलिस कर्मचारी, पोलिस अधिकारी एवढेच नव्हे तर आपली चालू कमाई बंद होईल म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकारीही याकडे दुर्लक्ष करत आहेत, जनता साईभक्त, शिर्डीकर यांनी अनेकदा निवेदने व सांगून तसेच वृत्तपत्र ,टीव्ही वर अनेकदा बातम्या येऊनही पोलीस मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत, उलट गुन्हेगारी विरोधात आवाज उठविणाऱ्यांना पोलीसांनी गूण्हेगारांना हाताशी धरूण खोटे गुन्हे दाखल केले. अवैध धंद्यांवर, व गुन्हेगारीवर कारवाई करण्याऐवजी त्यांना अप्रत्यक्ष पाठबळ देण्यात येत आहे, जिल्ह्यात जिल्हा पोलीस अधीक्षक सध्या प्रभारी आहे, हीच परिस्थिती शिर्डी सह इतर ही पोलिस स्टेशनला आहे ,अहमदनगर जिल्ह्यात सर्वत्र गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असताना देशात विदेशात प्रसिद्ध असणाऱ्या आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र श्री साईबाबांच्या शिर्डी या पावन भूमीत सध्या राजरोसपणे पाकीटमारी, गुंडगिरी, लुटमार ,अवैध धंदे, दारू मटका ,जुगार ,गांजा ,चरस विक्री अवैध वाहतूक ,मारामाऱ्या, गुटका विक्री पोलिसांच्या पाठबळावर सुरू आहे ,त्यामुळे शिर्डी तील सर्वसामान्य ग्रामस्थ, साईभक्त यांना त्याचा मोठा त्रास होत आहे शिर्डीतिल ग्रामस्थांनी या बाबत ग्रामसभा घेउन शिर्डीत चालत असलेल्या अवैद्य व्यवसायाला विरोध करुणही काहीच कारवाई केली गेली नाहि अनेकदा निवेदने देऊन वृत्तपत्रात बातम्या येऊनही त्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष आहे कारवाई करण्याऐवजी चिरीमिरी वर अधिक डोळा असणाऱ्या काही पोलीस कर्मचारी, पोलीस अधिकारी यांना आपण श्री साईंच्या पावन नगरीत काम करत आहोत, आपली कर्तव्य जबाबदारी आपण विसरत आहोत,, याचेही भान राहिले नाही, त्यामुळे अशा गुन्हेगारीला पाठबळ देणाऱ्या व आपले कर्तव्य ,जबाबदारी असणाऱ्या या मग तो कोणीही असो त्यावर साईंचा दंडा पडल्याशिवाय राहत नाही, साईंच्या पावन भूमीत सेवा करण्याची संधी योगायोगाने व श्री साईकृपेने मिळाली असून या संधीचा चांगला उपयोग पोलीस व अधिकाऱ्यांनी करून येथील गुन्हेगारी व गुन्हेगारांवर वचक ,आळा बसावा यासाठी प्रत्येक पोलीस कर्मचारी पोलीस अधिकारी, वरिष्ठ अधिकारी यांनी प्रामाणिक, निस्वार्थीपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे ,अन्यथा या गुन्हेगारी विरोधात व गुन्हेगारीला पाठबळ देणाऱ्या पोलीस कर्मचारी, अधिकारी यांच्याविरोधात आमरण उपोषण करण्याचा इशारा या पत्रकात पत्रकार जितेश मनोहरलाल लोक चांदनी शिर्डी यांनी दिला आहे,
