Latest Post

बुलडाणा - 31 जानेवारी
वन्य प्राण्यांची शिकार करून त्याचा मांस विक्री केला जात आहे.एका ठिकाणी रानडुक्करचे मांस असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने वन विभागाच्या पथकाने धाड टाकून 2 लोकांना ताब्यात घेतले त्यांच्या कडून रानडुक्करचे मांस जप्त करण्यात आले आहे तर हे पथक कार्यवाही करत असतांना इतर 2 लोकांनी वन पथकाला लोटपाट करीत शिविगाळ केल्याची घटना आज 31 जानेवारीला ग्राम मोहेगांव येथे घडली आहे.
     मोताळा तालुक्यातील मोहेगांव येथील काही लोक रानडुक्करची शिकार करुण त्याचा मांस विकतात अशी गुप्त माहिती मिळाल्याने संजय एन.माळी उपवनसंरक्षक बुलडाणा, रंजित गायकवाड सहाय्यक वनसंरक्षक, (प्रादेशिक व कॅम्पा) बुलडाणा यांच्या मार्गदर्शनात आर.बी.कोंडावार वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) मोताळा, यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह 31 जानेवारीला मोहेगाव येथील अनिल मलचंद चव्हाण व दरबार भोंद पवार यांच्या राहत्याघरुन धाड टाकली असता घरातून वन्यप्राणी रानडुक्करचे मास आढळुन आले. सदर मास जप्त केलेले असुन आरोपी नामे अनिल मलचंद चव्हाण व दरबार भोंदु पवार दोन्ही रा.मोहेगाव यांच्या विरोधात  वन्यजिव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 9,39,43,44,48,49,50,51
अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले.दोन्ही आरोपींना मा.न्यायालय, मोताळा समक्ष हजर केले असता दि. 3 फेब्रूवारी पर्यंत वनकोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पुढील तपास व्ही.डी. सानप, राजुर वर्तुळ अधिकारी करत आहेत. सदर कार्यवाहीत धनंजय पोटे, व्ही. डी. सानप, पी. पी. मुंढे,ए. एन. सपकाळ,एस. पी. कुशोड,एस. के. घुगे, अहीरे, संतोष जाधव व वाहन चालक यांचा समावेश होता. 

*शासकीय कामात अडथळा*

मोहेगांवात वन विभाग सदर कार्यवाही करीत असतांना संजय शंकर जाधव व सागर संतोष राठोड यांनी वन अधिकारी व कर्मचारी यांच्याशी आरेरावी व शिवीगाळ करीत लोटपोट केली व शासकीय कामात अडथळा आनला म्हणुन या दोघांच्या विरुद्ध पोलिस स्टेशन बोराखेडी येथे शासकिय कामी अडथळा निर्माण केल्याची फिर्याद दाखल केली आहे.

शिरसगाव येथील कनोसा हॉस्टेल येथे नुकतेच सी.ए. ए, एन.आर. सी.व एन.पी.आर या केंद्र सरकारच्या जाचक नागरिकत्व सुधार कायद्याच्या अनुषंगाने महिलांमध्ये जनजागृती शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ऍड.समीन बागवान यांनी उपस्थित महिलांना देशात नागरिकत्व सुधार कायदा अस्तित्वात आल्यानंतर आता पुढे राष्ट्रीय जनसंख्या रजिस्टर, राष्ट्रीय नागरिकता रजिस्टर देशातील सर्व अल्पसंख्याक समुदायकरिता अन्याय कारक असल्याने त्याचा सर्वांनी तीव्र विरोध करावा असे आवाहन केले,यावेळी बोलताना ऍड बागवान यांनी देशाच्या शैक्षणिक, सामाजिक व आरोग्याच्या दृष्टीने ख्रिस्ती समाज धर्मियांच्या असणाऱ्या अमुल्य योगदानाबद्दल विस्तृत विवेचन केले.तसेच नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे देशात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.सर्वत्र अराजकता माजली आहे,या देशाचे मूलतः असणारे नागरिक भीतीच्या सावटाखाली जीवन जगत आहे कारण या कायद्याचे स्वरूप अत्यन्त गुंतागुंतीचे व जाचक अटींचे असणार आहे,याकरीता या कायद्याला कडाडून विरोध करून हा कायदा रद्द करण्यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकाला रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल संविधानाचे रक्षण करावे लागेल, कारण भारताला फक्त संविधान च वाचवू शकते.
यावेळी उपस्थित असंख्य महिलांनी सदर अन्याय कारक कायद्या विरुद्ध लढा उभा करण्याची ग्वाही यावेळी दिली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लोयोला धर्मग्रामचे प्रमुख धर्मगुरू फा. ज्यो गायकवाड, कनोसा हॉस्टेल च्या सुपिरिअर सिस्टर पाकुळी,रवी त्रिभुवन सर,धर्मभगिनी सि. मार्टिना,सि. ग्रेसी,सि. प्रेसिला, सि. रोड्रीग्स,श्री.खंडागळे गुरुजी व आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सूत्रसंचालन व परिचय रवी त्रिभुवन सर यांनी करून आपल्या सुमधुर वाणीत कवी वामन दादा कर्डक यांचे "माणसा इथे मी तुझे गीत गावे" हे गीत गायले.

गळनिंब येथे बिबट्याच्या हल्यात मृत्यू
गळनिंब (प्रतिनिधी)घराच्या पोर्च मध्ये कु.ज्ञानेश्वरी नामदेव मारकड(वय ३ वर्षे)आजी बरोबर ७:३०वा.खेळत असताना बिबट्याने आजीच्या हाताला हिसका देवून झडप घातली व शंभर दिडशे फुट उसात नेत आरडा ओरड होत लोक जमा झाल्यानंतर जखमी अवस्थेत तिला प्रवरा मेडिकल ट्रस्ट लोणी येथील अति दक्षता विभागात  उपचारा दरम्यान प्राणज्योत मावळली.
   गळनिंब येथील नामदेव भाऊसाहेब मारकड यांची ३ वर्षाची मुलगी बंगल्याच्या पोर्च मध्ये आपल्या आजी बरोबर खेळत असताना बिबट्याने झडप घालून शेजारील उसाच्या उसाच्या शेतात नेले नागरीकांनी आरडा ओरड करुन उसात मुलीचा शोध घेतला जखमी अवस्थेत असलेल्या मुलीस तातडीने लोणी येथील  प्रवरा मेडीकल ट्रस्टच्या दवाखान्यात  दाखल केले तिच्या मानेवर खोल जखम झालेली होती नुकत्याच आलेल्या माहीती नुसार उपचार चालु असताना तिची प्राणज्योत मावळली  मागे काही महीन्यापूर्वी गणपतीची आरती आटोपुन येत असलेल्या मुलास आजीच्या हातातुन दर्शन चंद्रकांत देठे यास  बिबट्याने ओढुन नेल्याची घटना लोक विसरलेले नसतानाच आजची ही ताजी घटना घडली या घटनेमुळे नागरीकात घबराटीचे वातावरण पसरले आहे


बुलडाणा - 31 जानेवारी
चिखली तालुक्यातील गोद्री येथील मूळचे रहिवासी व हल्ली  चिखली येथील संभाजीनगर भागात वास्तव्यात असलेल्या बीएसएफ जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 31 जानेवारी रोजी घडली.
        यासंदर्भात दीपक देशमुख यांनी चिखली पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की अंकुश अशोक देशमुख वय 35 वर्ष हा बीएसएफ मध्ये नोकरीला असून एक महिन्याची सुट्टी घेऊन घरी आलेला होता. दिनांक 28 जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शहरातील स.द. म्हस्के मार्गावरून अंकुश हा आपला मुलगा देवेंद्र याच्यासह प्लेजर गाडीने येत असतांना समोरून येणाऱ्या गौतम इंगळे रा.चांधई यांनी त्यांच्या ताब्यातील स्कुटी भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवून अंकुश यांच्या दुचाकीस समोरासमोर जबर धडक दिली. यामध्ये अंकुश व त्याचा मुलगा देवेंद्र याला मार लागला, त्यांना स्थानिक खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले मात्र अंकुश यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने डॉक्टरांनी त्यास पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्याचे सांगितले. औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असतांनाच तो कोमात गेला अश्या फिर्याद मृतकाचा भाऊ दिपक देशमुख यांनी दिनांक 30 जानेवारी रोजी चिखली पोलीस स्टेशनला दिली. या फिर्यादी वरून चिखली पोलिसांनी भांदवी कलम 279, 337 व मोटर वाहन अधिनियम 134 नुसार गुन्हा दाखल केला आहे. आज दिनांक 31 जानेवारी रोजी उपचारादरम्यान जवान अंकुश देशमुख याचे दुर्दैवी मृत्यु झाले.ही माहिती शहरात पसरताच हळहळ व्यक्त होत आहे.

गळनिंब (प्रतिनिधी)श्रीरामपूर तालूक्यातील गळनिंब ग्रामपंचायत सदस्यांची मासिकमिटींगचा अजेंठा देवूनही एकही सदस्य,ग्रामसेवक मासिक मिटींगकडे फिरकला नाही.तसेच प्रजाकसत्ताक दिनानिमित्त ग्रामसभेचा विसर देखील पदाधिकारी,ग्रामसेवक यांना पडला.
  गावाच्या विकासाचा केंद्रबिंदु म्हणजे ग्रामसभा असल्याने या सभेला अनन्यसाधारण महत्व असते.विविध कामांच्या आराखड्याची व शासनाच्या अनेक योजनांचा या ग्रामसभेत ठरावाच्या रूपाने कागदपत्रांची आवश्यकता असते गावातील विविध समस्यांचा प्रश्न समस्या मांडण्याचे व्यासपीठ असते. परंतु याच ग्रामसभेबाबत ग्रामपंचायत पदाधिकारी अधिकारी अभियज्ञ असल्याचे समोर आले आहे.याबाबत गावातील सुज्ञ नागरीकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
विषेश म्हणजे येथील ग्रामसेवकांना दोन गावांचा पदभार असल्याने दोन्ही गावांच्या ग्रामसभेची वेळ एकच असल्याने ग्रामसभेस सचिव म्हणून जि.प. शाळेच्या मुख्यध्यापिका यांनी चार्ज घेण्यास नकार दिला असल्याने प्रजाकसत्ताकदिनी ग्रामसभा होवू शकली नाही.
 गावाच्या प्रश्नावर जर पदाधिकारीच गंभीर नसतील तर विकास कसा होणार आणि कोण करणार यावेळी अनेकांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या बाबतीत अनेक समस्यांबाबत नाराजी व्यक्त केली.  प्रजाकसत्ताक दिनी न झालेली ग्रामसभा लवकरात लवकर घ्यावी असे मतही यावेळी व्यक्त केले.

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात श्रीरामपूर बंद
एन.आर.सी./एन.पी.आर/सी.ए.ए 
या संविधानविरोधी कायद्याचा विरोध आज श्रीरामपूर बंद करून करण्यात आला.
बहुजन क्रांती मोर्चा या राष्ट्रव्यापी संघटनेच्या वतीने या कायद्याच्या विरोधात भारत बंद चे आवाहन केले होते.
श्रीरामपूर मधील सर्व नागरिक व व्यापारी यांनी आपापली दुकाने बंद करून बंद पाळला.या वेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर येथे या कायद्याच्या विरोधात निषेध सभा घेण्यात आली,यावेळी  एन.आर.सी./एन.पी.आर/सी.ए.ए हे कायदे रद्द करून डी. एन.ए तपासणी करून एन.आर.सी लागू करावी हि मागणी करण्यात आली व निवडणुकीत इ.व्ही.एम मशीन बंद करण्यात यावे,ओबीसींची जातवार जनगणना करण्यात यावी याही मागण्या या वेळी करण्यात आल्या निषेध सभेत 
एस के चौदांते (संयोजक बहुजन क्रांती मोर्चा)
तुषार पारखे (संयोजक श्रीरामपूर शहर)
मुश्ताक तांबोळी (राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा)
अहमद जहागीरदार(संविधान बचाव समिती)दिलीप त्रिभुवन,सुनील मगर(बी एस पी),अँथोनी शेळके(आर.पी.आय)
शिवाजी गांगुर्डे( राष्ट्रीय अध्यक्ष एकलव्य भिल्ल समाज संघटना)
डॉ सलीम शेख
अमारप्रीत सिंग( शीख समुदाय)
अशोक बागुल (रिपब्लिकन नेते)
मुख्तार शहा(नगरसेवक)
सुधाकर भोसले(राष्ट्रीय ख्रिश्चन मोर्चा)
दिलीप बडधे(राष्ट्रीय ओबीसी मोर्चा)
जोएफ जामदार( जिल्हाध्यक्ष समाजवादी पार्टी)
साजिद मिर्झा(एम आय एम)दीपक कदम(अल्पसंख्यांक ख्रिस्ती संघटना)
फिरोज पठाण(जिल्हाध्यक्ष भीम आर्मी)
भगवान रोकडे(भीम आर्मी)
सुभाष तोरणे(ख्रिश्चन संघटना)
मास्टर सरवरअली
रज्जाकभाई शेख (भारतीय लहुजी सेना जिल्हाध्यक्ष)
पोपट ढोकने,शब्बीर पठाण,रामदास रोकडे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.वरील मागण्यासाठी बंद मध्ये भारत मुक्ती मोर्चा,राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा,राष्ट्रीय ओबीसी मोर्चा,संविधान बचाव समिती,शीख समाज संघटना,एकलव्य भिल्ल समाज संघटना,विविध रिपब्लिकन गट,बी एस पी,समाजवादी पक्ष,एम आई एम,भीम आर्मी,ख्रिश्चन संघटना आदी संघटना सक्रिय सहभागी झाल्या होत्या.

नाशिक | प्रतिनिधी:-नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात असलेल्या मेशी गावानजीक काल (दि.२८) सायंकाळी चारच्या सुमारास बस आणि रिक्षाची धडक होऊन भीषण अपघात झाला. अपघातातील मृतांचा आकडा २४ वर पोहोचला असून अजूनही एका बेपत्ता मुलाचा शोध एनडीआरएफच्या टीमकडून केला जात आहे.देवळा तालुक्यातील मेशी फाट्याजवळ ही भीषण दुर्घटना घडली होती.  अपघातानंतर दोन्ही वाहने विहिरीत कोसळल्याने अधिक जीवितहानी झाली. बसने दिलेल्या जोरदार धडकेत रिक्षाचा चक्काचूर होऊन रिक्षा विहिरीत कोसळली.या अपघातात २४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात अपघातात ३४ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त बस मालेगावकडून कळवण येथे चालली होती.विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरु होते. अंधार पडल्यामुळे आणि विहिरीत १५ ते २० फुट पाणी असल्यामुळे शोधकार्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे मध्यरात्री शोधकार्य थांबविण्यात आले होते.
आज सकाळपासून पुन्हा एनडीआरएफकडून शोधकार्य हाती घेण्यात आले आहे. रात्री २३ मृतदेह हाती आल्यानंतर आज सकाळी पुन्हा एक मृतदेह मिळून आला. तसेच अजून एक मुलगा बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे.जे प्रवासी या अपघातात मृत झाले आहेत त्यांच्या नातेवाईकांना दहा लाखांची मदत केली जाणार आहे. तर जे प्रवासी जखमी झाले आहेत त्यांच्यावर होणाऱ्या उपचारांचा खर्च एस टी महामंडळातर्फे करण्यात येणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली. तर गंभीर जखमी प्रवाशांना पाच लाखांची मदत केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.तर बसही रीक्षापाठोपाठ विहिरीचा कठडा तोडून विहिरीत पडली. त्यामुळे बसमधील प्रवाशी अधिक जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बसमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, मृतांची ओळख पटवून शवविच्छेदन करत मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget