Latest Post

कोल्हार प्रतिनिधी (साईप्रसाद कुंभकर्ण ) :-  कॉ.पी.बी.कडू पाटील यांचे कार्य स्मरणात राहण्यासाठी प्रत्येकाने एक झाड लावले पाहिजे. कॉ.पी.बी.कडू पाटील  यांचे कार्य अत्यंत प्रभावशाली असेच आहे असे प्रतिपादन सह्याद्री देवराई अभियानचे अभिनेता सयाजी शिंदे यांनी थोर स्वातंत्र्य सेनानी कॉ.पी.बी.कडू पाटील तृतीय स्मृतीदिन,मातोश्री शांताबाई पुंजाजी कडू पाटील स्मृती पारितोषिक समारंभ व  कॉ.पी.बी.कडू पाटील समाजक्रांती पुरस्कार प्रदान समारंभ प्रसंगी रयत संकुल सात्रळ येथे केले.त्यांनी सांगितले कि प्रत्येकांनी आज किमान एक झाड लावले पाहिजे त्याचप्रमाणे पाच वर्ष त्यांचा वाढदिवस साजरा केला पाहिजे आजची शिक्षण पद्धती ही व्यक्तिगत जीवन जगण्याची आहे त्याऐवजी निसर्गासाठी कसे जगता येईल हे पाहावे कारण देश मागे गेला तर शेतकरी मागे राहील यासाठी या भयानक परिस्थितीचा आपण सर्वांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे आपल्या वागण्याने जग बदलता येते.यासाठीच आपण निसर्गासाठी बदल केला पाहिजे यावेळी त्यांनी कविवर्य अरविंद जगताप यांची काव्यरचना विद्यार्थ्यांसमवेत गायली तसेच युवानेते पंकज कडू पाटील यांच्या सहकार्याने पाच हजार वृक्ष लावण्याचा संकल्प केला.   
कॉ.पी.बी.कडू पाटील तृतीय स्मृतीदिन समाजक्रांती पुरस्कार समारंभ कॉ.पी.बी.कडू पाटील फौंडेशन,सात्रळ यांचे विद्यमाने मातोश्री शांताबाई पुंजाजी कडू पाटील  स्मृती पारितोषिक वितरण समारंभ रयत शैक्षणिक संकुल सात्रळ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
 कार्यक्रमाचे प्रास्ताविक रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व कॉ.पी.बी.कडू पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.अरुण कडू पाटील यांनी करतांना सांगितले कि  आप्पांच्या कार्याचा वसा चालविण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोतच यासाठी त्यांच्या स्मृती दिनी वेगेवेगळे पुरस्कार देऊन नामवंत वक्त्यांना आमंत्रित करून विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन केले जाते.या उपक्रमास सर्वांची साथ लाभाल्यानेच अप्पांचे हे कार्य पुढे चालू शकलो आहे. यावेळी त्यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.
कॉ.पी.बी.कडू पाटील समाजक्रांती पुरस्कार जेष्ठ साहित्यिक मा.फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी आपल्या संदेशात कॉ.पी.बी.कडू पाटील यांच्या कार्याबद्दल सांगितले की जे समाजासाठी सुंदर जीवन जगतात त्यांची स्मृती कायम राहते त्याप्रमाणेच कॉ.पी.बी.कडू पाटील यांनी आपल्या  कार्याने  स्मृती कायम ठेवली आहे.त्यामुळे आपल्या सर्वांची आज जबाबदारी बनते की कॉ.पी.बी.कडू पाटील यांच्या कार्याचा वसा आपण सर्वांनी पुढे चालू ठेवणे गरजेचे आहे.तोच वसा या संकुलात जपला हि अभिमानाची गोष्ट आहे
महाराष्ट्र राज्य आदर्श गाव प्रकल्प समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार यांनी आपले मनोगत व्यक्त शेती आणि मातीसाठी कॉ.पी.बी.कडू पाटील यांचे कार्य थोर असेच आहे आज मात्र पाणी चळवळ उभी करणे गरजेचे आहे अभिनेता सयाजी शिंदे यांच्या देवराई प्रकल्पाबद्दल बोलतांना त्यांनी सांगितले की दैवत्वाचे नाव ठेवून वनराई नटविण्याचे कार्य अभिनेता सयाजी शिंदे यांनी केले विस्तापित माणसाला प्रस्तापित कसे करता येईल याचे उत्तम उदाहरण म्हणजे सयाजी शिंदे होय.आज आपण सर्वांनी निसर्गाच्या विविधतेसाठी झटले पाहिजे सर्वजन आज विषयुक्त अन्न खात आहोत देशाला अन्न पुरविना-या पंजाबची अवस्था आज कॅन्सरग्रस्त अशी झाली आहे  यासाठी सर्वांनी पर्यावरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून पाणी चळवळ उभी करणे गरजेचे आहे
याप्रसंगी कॉ.पी.बी.कडू पाटील फौंडेशन,सात्रळ यांचे विद्यमाने  दिला जाणारा  कॉ.पी.बी.कडू पाटील समजक्रांती पुरस्कार जेष्ठ साहित्यिक मा.फादर फ्रान्सिस दिब्रिटो रु.५१,००० /- व सन्मानपत्र त्यांच्या वतीने त्यांची पुतणी लुसि दिब्रोटो यांनी स्वीकारला  व विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या शिक्षक व विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यामध्ये मातोश्री शांताबाई पुंजाजी कडू पाटील स्मृति परितोषिक श्री. कवडे वसंत सुदाम कृतिशील मुख्याध्यापक,पुंजाजी रामजी भोर विद्यालय,ठाणगाव ता.सिन्नर रु.११,००० /- व स्मृतीचिन्ह उपक्रमशील शिक्षक पुरस्कार - कचरे रविंद्र पांडुरंग उपशिक्षक,छत्रपती शिवाजी विद्यालय,बेलवंडी ता.श्रीगोंदा -रु.११,००० /- व स्मृतीचिन्ह सावित्रीबाई फुले उपक्रमशील शिक्षिका पुरस्कार- सौ.शेख तैसिन जावेद उपशिक्षिका,महात्मा फुले विद्यालय,भाळवणी ता.पारनेररु.११,००० /- व स्मृतीचिन्ह स्वच्छ सुंदर शाळा पुरस्कार प्रथम क्रमांक  रु.५,००१/- व स्मृतीचिन्ह -लक्ष्मीबाई भाउराव पाटील प्राथमिक विद्यालय,अहमदनगर स्वच्छ सुंदर शाळा पुरस्कार द्वितीय क्रमांक  रु.३,०००/- व स्मृतीचिन्ह डॉ.सी.एम.मेहता कन्या विद्यामंदिर, ता.कोपरगाव  एस.एस.सी.परीक्षा उत्तर विभागात प्रथम खेमनर संचित ठकाजी  पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील विद्यालय,लोणी   -रु.१,१०१/- व स्मृतीचिन्ह एस.एस.सी.परीक्षा उत्तर विभागात प्रथम - मुली.पवार वैष्णवी पांडुरंग  श्री गणेश विद्यामंदिर आमंळनेर भांड्याचे ता. पटोदा    रु.११०१/- व स्मृतीचिन्ह एच.एस.सी परीक्षा मार्च - विभागात प्रथम --कला शाखा   कु.दुतारे स्वाती गौरव  राधाबाई काळे महिला महाविद्यालय,अहमदनगर  रु.११०१/- व स्मृतीचिन्ह एच.एस.सी परीक्षा मार्च - वाणिज्य शाखा कु.शिंदे ऋतुजा नानासाहेब  एस एस जी एम कॉलेज,कोपरगाव रु.११०१/- व स्मृतीचिन्ह एच.एस.सी परीक्षा मार्च - विज्ञान शाखा काळे गणेश रमेश    महात्मा गांधी विद्यालय,कर्जत    रु.११०१/- व स्मृतीचिन्ह
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहुरी पंचायत समितीचे सभापती धोंडीभाऊ सोनवणे हे होते
या कार्यक्रमास मा.आमदार सुधीरजी तांबे,आमदार लहुजी कानडे ,उत्तर विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दादाभाऊ कळमकर, मा.मीनाताई जगधने, मा.रावसाहेब मस्के पाटील,कॉ.बाबा आरगडे,माजी सचिव प्राचार्य शिवाजीराव भोर, प्रा.डॉ.गहिनीनाथ विखे,बाळासाहेब केरूनाथ विखे,भाऊसाहेब थोरात,कारखान्याचे एम.डी घुगरकर साहेब, माजी सहसचिव श्रीरंग झावरे, विभागीय अधिकारी संजय नागपुरे,उपविभागीय सरदार साहेब,गोविंदराव मोकाटे,शब्बीरभाई देशमुख, बबनराव कडू पाटील, एस.के,रयत सेवक संघाचे सरचिटणीस मा.भाऊसाहेब पेटकर,गणेश पाटील कडू ,पर्यवेक्षक श्री साळुके बी .एल. मुख्याध्यापिका जोगदंड जे.ए.,युवा नेते किरण कडू पाटील ,पंकज कडू पाटील ,विक्रांत कडू, सन्मानीय सर्व शाखाप्रमुख, संस्था पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.सिराज मन्सुरी व श्री.मंगेश कडलग यांनी केले.तर मा.दिलीप शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले.

मा.ना.श्री.छगन भुजबळ, मंत्री, अन्‍न व नागरी पुरवठा, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर उपस्थित होते.

साईबाबांच्या खोट्या जन्म स्थळाच्या निषेधार्थ शिर्डी ग्रामस्थ व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी पुकारलेल्या बेमुदत बंद संदर्भात आज परत एकदा शिर्डी ग्रामस्थांची ग्रामसभा पार पडली यामध्ये माननीय मुख्यमंत्री यांनी निमंत्रण देऊन बैठक बोलावली व   साईभक्तांचा विचार करता सध्याचा बंद तात्पुरता  स्थगीत करून येणाऱ्या काळात समाधान कारक निर्णय जर मा.मुख्यमंत्री यांनी घेतला नाही तर पुन्हा एकदा आंदोलनाची दिशा ठरवणार आहे.

शिर्डी - पाथरी गावाचा साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले वक्तव्य मागे घेत नाही, तोपर्यंत शिर्डी आज (रविवार दि.१९) पासूनच्या बेमुदत बंदला शिर्डीकरांनी १०० टक्के प्रतिसाद दिल्याने शिर्डी शहरात सकाळपासून शुकशुकाट आहे.
पाथरी जन्मस्थळाबाबत पाथरीकरांनी केलेले सर्व दावे तथ्यहीन व भाविकांची दिशाभूल करणारी आहेत. पाथरीला निधी देण्यास विरोध नाही; मात्र तेथील जन्म स्थळाच्या उल्लेखाला आक्षेप असल्याचे शिर्डी करांनी स्पष्ट केले आहे. या शिर्डी बंद दरम्यान, साईदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे.
श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने श्री साईबाबा समाधी मंदिरातील दर्शन, मंदिरातील सर्व आरत्‍या व सर्व धार्मीक विधी या नियमीत प्रमाणे रविवार दिनांक १९ जानेवारी २०२० रोजी व त्‍यानंतर ही सुरु राहणार असून, संस्‍थानचे श्री साईप्रसादालय, सर्व भक्‍तनिवासस्‍थाने, रुग्‍णालये आदी सुविधा ही नियमीत प्रमाणेच सुरु राहतील अशी माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.


शिर्डी, दि. 18 :- विमानतळ परिसरात जमा होणाऱ्या पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर करता यावा यासाठी, विमानतळ प्राधिकरणाने रेन वॉटर हार्वेस्टींग यंत्रणा उभारुन पाण्याचे नियोजन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांनी आज येथे केली. 
  शिर्डी येथील विमानतळ आणि परिसराचे व्यवस्थापनासाठी पर्यावरण व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची बैठक आज येथे आयोजित करण्यात आली होती. बैठकीत विविध कामांचा आढावा घेताना जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी अहमदनगरचे उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, विमानतळ संचालक दीपक शास्त्री, विमानतळ मुख्य सुरक्षा अधिकारी दिनेश दहीवडकर, सुरक्षा अधिकारी पंढरीनाथ शेळके, राहाता तहसीलदार कुंदन हिरे उपस्थित होते.
  विमानतळाचा मुख्य भाग व परिसरामध्ये विविधप्रकारची कार्ये निरंतर पार पाडण्यात येतात. ही सर्व कार्ये सुलभपणे पार पाडता यावी यासाठी, या कार्यात विमानतळ प्रशासनाने स्थानिकांना सहभागी करुन घ्यावे अशी सूचना, जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांनी केली. परिसरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी खाजगी संस्था नेमण्यात यावी, अशीही सूचना जिल्हाधिकारी यांनी केली.
  विमानतळ परिसरातील कचरा संकलन व त्याची विल्हेवाट, त्यामध्ये ग्रामपंचायतीचा सहभाग तसेच विमानतळ परिसरात उडणाऱ्या पक्षांवर नियंत्रण ठेवणे, जंगली श्वापदांचा बंदोबस्त करणे इत्यादी विषयावर विमानतळ संचालक दीपक शास्त्री यांनी प्राधिकरणाने केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. आजूबाजच्या शेतकऱ्यांकडून शेतीची कामे करताना विमानतळ प्रशासनास होणाऱ्या गैरसोईबद्दल स्थानिकांशी चर्चा करुन मार्ग काढण्यात येईल असे ते म्हणाले. विमानतळ परिसर व्यवस्थापन सुकर व्हावे यासाठी नगर पंचायत आणि जिल्‍हा प्रशासनाने पुढाकार घ्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 
  बैठकीला विमानतळ उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, टर्मीनल व्यवस्थापक एस.मुरलीकृष्ण, मुख्य विद्युत अभियंता अजय देसाई, मुख्य स्थापत्य अभियंता कौस्तुभ ससाणे, एअरपोर्ट मॅनेजर रोहित रेहपाडे, गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे, तालुका कृषि अधिकारी बापुसाहेब शिंदे, पशुसंवर्धन विभागाचे डॉ.अजयनाथ थेारे, स्पाईस जेटचे अशेाक मौर्य, इंडिगोचे आशीश अब्राहम, एअर इंडियाचे सचिन होडगर, साईबाबा हॉस्पीटलचे डॉ.विजय नरोडे आदी उपस्थित होते.

शिरसगाव[वार्ताहर]श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक डॉ दिपाली प्रमोद काळे यांना कला,चित्रपट व गृहखात्यातील उल्लेखनीय कार्याबद्दल वर्ल्ड पार्लमेंट इंटरनेशनल अवार्ड या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.हा पुरस्कार जागतिक संविधान संसदीय संघ श्रीरामपूर मुख्यालय अध्यक्ष दत्ता विघावे,सचिव भाऊराव माळी,सदस्य बी आर चेडे,भीमराज बागुल,यांनी डॉ दिपाली काळे यांना कार्यालयात प्रदान केला.डॉ काळे यांचे सर्व क्षेत्रात योगदान असते.त्यावेळी डॉ काळे यांनी या उपक्रमाचा गौरव केला.समाजात एकोपा शांतता ठेवावी आदी अनेक उपक्रम यात आहेत.यावेळी डॉ दिपाली काळे यांनी निर्भयासारखे,लहान बालकांवर होणारे वाढते अत्याचारास आळा,पायबंद घालणेसाठी समाजात,महिला बालके,मुली यांना योग्य वेळी प्रबोधन करण्याची गरज आहे अशी चिंता व्यक्त केली.त्यासाठी डॉ दिपाली काळे ह्या पुढाकार घेऊन जागृती निर्माण करणेसाठी विविध शिबिरे घेऊन अगदी पहिलीच्या वर्गापासून बालकअवस्थेतील मुलीना शिबिराव्दारे,विविध संघटना माध्यमातून व स्वत: उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.त्याचे प्रमुख कारण म्हणजे जास्त अत्याचार हे लहान,अज्ञान बालक मुलीमध्ये नातेवाईक,त्यांचे मित्रमंडळ यामुळे व चोकलेट सारखे पदार्थ दाखविले की बालक मुली हे अज्ञान असल्याने अत्याचारास बळी पडतात.असे असल्याचे निदर्शनास येत आहे.लवकरच त्या संदर्भात महिला,मुलीना प्रबोधन करण्यासाठी व अन्याय अत्याचार कमी होणेसाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉ दिपाली काळे यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर पदाधिकारी यांचेशी चर्चा करताना सांगितले.डॉ प्रमोद काळे हेही आरोग्याचे गंभीर आजारावर मात करणेसाठी मार्गदर्शन शिबिरे आयोजित करणार आहेत.

बेलापूर  ( प्रतिनिधी  )- पोलीस दिनाचे औचित्य साधुन पोलीसांचा सन्मान करणारे बेलापूरगाव हे पहीले गाव असुन पोलीस पत्रकार व ग्रामस्थ यांच्यात विचारांची सांगड असल्यास कुठलीच समस्या उद्भवणार नाही असे मत उपविभागीय पोलीस अधीकारी राहुल मदने यांनी व्यक्त केले .        पोलीस दिनाचे औचित्य साधुन बेलापूर ग्रामस्थांच्या वतीने पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच पत्रकार दिनाचे औचित्य साधुन पत्रकारांचा सन्मान तिळगुळ वाटप व वृक्षारोपनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . त्या वेळी ते बोलत होते  .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खटोड पतसंस्थेचे चेअरमन व उपसरपंच रविंद्र  खटोड हे होते . कार्यक्रमास पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट ,वहातुक शाखेचे पोलीस निरीक्षक योगेश देशमुख, पत्रकार अशोक गाडेकर ,जी प सदस्य शरद नवले उपस्थित  होते  श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट म्हणाले की समाजातील सुशिक्षित व सुसंस्कृत माणसांनी स्वतःला शिस्त लावली तर पोलीसांचे काम फार कमी होईल. परतु सुशिक्षित व्यक्तीच समजत असतानाही चुकीची कामे करतात हे दुर्दैव आहे. संयम बाळगा , अहंकार बाजुला ठेवा .माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागले तर सर्व समस्या सुटतील अन पोलीसांचेही काम कमी होईल . असेही ते म्हणाले वहातुक शाखेचे पोलीस निरीक्षक योगेश देशमुख वहातुकीचे नियम पाळा आपल्या चुकीमुळे ईतरांना त्रास अपाय होईल .असे काम करु नका .वहान चालाविताना मोबाईलवर बोलणे टाळा . गाडीचा वेग मर्यादित ठेवा असेही ते म्हणाले या वेळी जि प सदस्य शरद नवले , पत्रकार अशोक गाडेकर , ज्ञानेश गवले  ,विष्णुपंत डावरे आदिंनी मनोगत व्यक्त केले या वेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले  पोलीस दिनानिमित्त हवालदार अतुल लोटके ,पोलीस नाईक गणेश भिंगारदे, पोलीस हवालदार लोंढे ,बाळासाहेब गुंजाळ ,नीखील तमनर , पोपट भोईटे,  सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजगुरु  ,वाकचौरे , साळवी  ,हवालदार गुंड , गिरी , लगड , शिरसाठ आदि पोलीसांचा सन्मान करण्यात आला . पत्रकार दिनानिमित्त  प्रा . ज्ञानेश गवले , अशोक गाडेकर ,देविदास देसाई नवानाथ कुताळ, दिलीप दायमा, गोविंद साळुंके ,दिपक क्षत्रीय, अरविंद शहाणे ,सुहास शेलार, विष्णुपंत डावरे, सतिष काळे, अतिष देसर्डा आदिंचा  शाल व गीता ग्रंथ देवुन सत्कार करण्यात आला सनदी लेखापाल परीक्षा उत्तीर्ण झालेले भुषण सोमाणी यांचा सत्कार करण्यात आला  ईस्काँनचे किरण गागरे यांच्या वतीने भगवत् गीता ग्रंथ सप्रेम भेट देण्यात आले  या वेळी प्रा अशोक बडधे महेश ओहोळ अमोल गाढे अशोक गवते  तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश कुर्हे ,  गोविंद खरमाळे ,  अकबर टिन, मेकरवाले लहानु नागले ,मोहन सोमाणी आदि उपस्थित होते का कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन देविदास देसाई यांनी केले तर बाळासाहेब गुंजाळ यांनी आभार मानले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget