शिरसगाव[वार्ताहर]श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक डॉ दिपाली प्रमोद काळे यांना कला,चित्रपट व गृहखात्यातील उल्लेखनीय कार्याबद्दल वर्ल्ड पार्लमेंट इंटरनेशनल अवार्ड या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.हा पुरस्कार जागतिक संविधान संसदीय संघ श्रीरामपूर मुख्यालय अध्यक्ष दत्ता विघावे,सचिव भाऊराव माळी,सदस्य बी आर चेडे,भीमराज बागुल,यांनी डॉ दिपाली काळे यांना कार्यालयात प्रदान केला.डॉ काळे यांचे सर्व क्षेत्रात योगदान असते.त्यावेळी डॉ काळे यांनी या उपक्रमाचा गौरव केला.समाजात एकोपा शांतता ठेवावी आदी अनेक उपक्रम यात आहेत.यावेळी डॉ दिपाली काळे यांनी निर्भयासारखे,लहान बालकांवर होणारे वाढते अत्याचारास आळा,पायबंद घालणेसाठी समाजात,महिला बालके,मुली यांना योग्य वेळी प्रबोधन करण्याची गरज आहे अशी चिंता व्यक्त केली.त्यासाठी डॉ दिपाली काळे ह्या पुढाकार घेऊन जागृती निर्माण करणेसाठी विविध शिबिरे घेऊन अगदी पहिलीच्या वर्गापासून बालकअवस्थेतील मुलीना शिबिराव्दारे,विविध संघटना माध्यमातून व स्वत: उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.त्याचे प्रमुख कारण म्हणजे जास्त अत्याचार हे लहान,अज्ञान बालक मुलीमध्ये नातेवाईक,त्यांचे मित्रमंडळ यामुळे व चोकलेट सारखे पदार्थ दाखविले की बालक मुली हे अज्ञान असल्याने अत्याचारास बळी पडतात.असे असल्याचे निदर्शनास येत आहे.लवकरच त्या संदर्भात महिला,मुलीना प्रबोधन करण्यासाठी व अन्याय अत्याचार कमी होणेसाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉ दिपाली काळे यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर पदाधिकारी यांचेशी चर्चा करताना सांगितले.डॉ प्रमोद काळे हेही आरोग्याचे गंभीर आजारावर मात करणेसाठी मार्गदर्शन शिबिरे आयोजित करणार आहेत.
Post a Comment