बेलापूर ( प्रतिनिधी )- पोलीस दिनाचे औचित्य साधुन पोलीसांचा सन्मान करणारे बेलापूरगाव हे पहीले गाव असुन पोलीस पत्रकार व ग्रामस्थ यांच्यात विचारांची सांगड असल्यास कुठलीच समस्या उद्भवणार नाही असे मत उपविभागीय पोलीस अधीकारी राहुल मदने यांनी व्यक्त केले . पोलीस दिनाचे औचित्य साधुन बेलापूर ग्रामस्थांच्या वतीने पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच पत्रकार दिनाचे औचित्य साधुन पत्रकारांचा सन्मान तिळगुळ वाटप व वृक्षारोपनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . त्या वेळी ते बोलत होते .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खटोड पतसंस्थेचे चेअरमन व उपसरपंच रविंद्र खटोड हे होते . कार्यक्रमास पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट ,वहातुक शाखेचे पोलीस निरीक्षक योगेश देशमुख, पत्रकार अशोक गाडेकर ,जी प सदस्य शरद नवले उपस्थित होते श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट म्हणाले की समाजातील सुशिक्षित व सुसंस्कृत माणसांनी स्वतःला शिस्त लावली तर पोलीसांचे काम फार कमी होईल. परतु सुशिक्षित व्यक्तीच समजत असतानाही चुकीची कामे करतात हे दुर्दैव आहे. संयम बाळगा , अहंकार बाजुला ठेवा .माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागले तर सर्व समस्या सुटतील अन पोलीसांचेही काम कमी होईल . असेही ते म्हणाले वहातुक शाखेचे पोलीस निरीक्षक योगेश देशमुख वहातुकीचे नियम पाळा आपल्या चुकीमुळे ईतरांना त्रास अपाय होईल .असे काम करु नका .वहान चालाविताना मोबाईलवर बोलणे टाळा . गाडीचा वेग मर्यादित ठेवा असेही ते म्हणाले या वेळी जि प सदस्य शरद नवले , पत्रकार अशोक गाडेकर , ज्ञानेश गवले ,विष्णुपंत डावरे आदिंनी मनोगत व्यक्त केले या वेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले पोलीस दिनानिमित्त हवालदार अतुल लोटके ,पोलीस नाईक गणेश भिंगारदे, पोलीस हवालदार लोंढे ,बाळासाहेब गुंजाळ ,नीखील तमनर , पोपट भोईटे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजगुरु ,वाकचौरे , साळवी ,हवालदार गुंड , गिरी , लगड , शिरसाठ आदि पोलीसांचा सन्मान करण्यात आला . पत्रकार दिनानिमित्त प्रा . ज्ञानेश गवले , अशोक गाडेकर ,देविदास देसाई नवानाथ कुताळ, दिलीप दायमा, गोविंद साळुंके ,दिपक क्षत्रीय, अरविंद शहाणे ,सुहास शेलार, विष्णुपंत डावरे, सतिष काळे, अतिष देसर्डा आदिंचा शाल व गीता ग्रंथ देवुन सत्कार करण्यात आला सनदी लेखापाल परीक्षा उत्तीर्ण झालेले भुषण सोमाणी यांचा सत्कार करण्यात आला ईस्काँनचे किरण गागरे यांच्या वतीने भगवत् गीता ग्रंथ सप्रेम भेट देण्यात आले या वेळी प्रा अशोक बडधे महेश ओहोळ अमोल गाढे अशोक गवते तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश कुर्हे , गोविंद खरमाळे , अकबर टिन, मेकरवाले लहानु नागले ,मोहन सोमाणी आदि उपस्थित होते का कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन देविदास देसाई यांनी केले तर बाळासाहेब गुंजाळ यांनी आभार मानले.
Post a Comment