विमानतळ पर्यावरण व्यवस्थापन समितीची बैठक संपन्न रेन वॉटर हार्वेस्टींग यंत्रणा उभारुन पाण्याचे नियोजन करावे-जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी .

शिर्डी, दि. 18 :- विमानतळ परिसरात जमा होणाऱ्या पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर करता यावा यासाठी, विमानतळ प्राधिकरणाने रेन वॉटर हार्वेस्टींग यंत्रणा उभारुन पाण्याचे नियोजन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांनी आज येथे केली. 
  शिर्डी येथील विमानतळ आणि परिसराचे व्यवस्थापनासाठी पर्यावरण व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची बैठक आज येथे आयोजित करण्यात आली होती. बैठकीत विविध कामांचा आढावा घेताना जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी अहमदनगरचे उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, विमानतळ संचालक दीपक शास्त्री, विमानतळ मुख्य सुरक्षा अधिकारी दिनेश दहीवडकर, सुरक्षा अधिकारी पंढरीनाथ शेळके, राहाता तहसीलदार कुंदन हिरे उपस्थित होते.
  विमानतळाचा मुख्य भाग व परिसरामध्ये विविधप्रकारची कार्ये निरंतर पार पाडण्यात येतात. ही सर्व कार्ये सुलभपणे पार पाडता यावी यासाठी, या कार्यात विमानतळ प्रशासनाने स्थानिकांना सहभागी करुन घ्यावे अशी सूचना, जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांनी केली. परिसरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी खाजगी संस्था नेमण्यात यावी, अशीही सूचना जिल्हाधिकारी यांनी केली.
  विमानतळ परिसरातील कचरा संकलन व त्याची विल्हेवाट, त्यामध्ये ग्रामपंचायतीचा सहभाग तसेच विमानतळ परिसरात उडणाऱ्या पक्षांवर नियंत्रण ठेवणे, जंगली श्वापदांचा बंदोबस्त करणे इत्यादी विषयावर विमानतळ संचालक दीपक शास्त्री यांनी प्राधिकरणाने केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. आजूबाजच्या शेतकऱ्यांकडून शेतीची कामे करताना विमानतळ प्रशासनास होणाऱ्या गैरसोईबद्दल स्थानिकांशी चर्चा करुन मार्ग काढण्यात येईल असे ते म्हणाले. विमानतळ परिसर व्यवस्थापन सुकर व्हावे यासाठी नगर पंचायत आणि जिल्‍हा प्रशासनाने पुढाकार घ्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 
  बैठकीला विमानतळ उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, टर्मीनल व्यवस्थापक एस.मुरलीकृष्ण, मुख्य विद्युत अभियंता अजय देसाई, मुख्य स्थापत्य अभियंता कौस्तुभ ससाणे, एअरपोर्ट मॅनेजर रोहित रेहपाडे, गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे, तालुका कृषि अधिकारी बापुसाहेब शिंदे, पशुसंवर्धन विभागाचे डॉ.अजयनाथ थेारे, स्पाईस जेटचे अशेाक मौर्य, इंडिगोचे आशीश अब्राहम, एअर इंडियाचे सचिन होडगर, साईबाबा हॉस्पीटलचे डॉ.विजय नरोडे आदी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget