शिर्डी - पाथरी गावाचा साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले वक्तव्य मागे घेत नाही, तोपर्यंत शिर्डी आज (रविवार दि.१९) पासूनच्या बेमुदत बंदला शिर्डीकरांनी १०० टक्के प्रतिसाद दिल्याने शिर्डी शहरात सकाळपासून शुकशुकाट आहे.
पाथरी जन्मस्थळाबाबत पाथरीकरांनी केलेले सर्व दावे तथ्यहीन व भाविकांची दिशाभूल करणारी आहेत. पाथरीला निधी देण्यास विरोध नाही; मात्र तेथील जन्म स्थळाच्या उल्लेखाला आक्षेप असल्याचे शिर्डी करांनी स्पष्ट केले आहे. या शिर्डी बंद दरम्यान, साईदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे.
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने श्री साईबाबा समाधी मंदिरातील दर्शन, मंदिरातील सर्व आरत्या व सर्व धार्मीक विधी या नियमीत प्रमाणे रविवार दिनांक १९ जानेवारी २०२० रोजी व त्यानंतर ही सुरु राहणार असून, संस्थानचे श्री साईप्रसादालय, सर्व भक्तनिवासस्थाने, रुग्णालये आदी सुविधा ही नियमीत प्रमाणेच सुरु राहतील अशी माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.
Post a Comment