बेलापूर (प्रतिनिधी) – बेलापूर ग्रामपंचायतची ट्रॉली बेलापूर पोलीस स्टेशनसमोर उभी असताना, अज्ञात इसमाने या ट्रॉलीच्या टायरजवळ आग लावून ती पेटविण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी निदर्शनास आली असुन पोलीस स्टेशन समोरच ही घटना घडल्याने ग्रामस्थाकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
या बाबत माहिती अशी की सकाळी फिरायला जात असताना कुणीतरी अज्ञात व्यक्तीने बेलापूर ग्रामपंचायत ट्रॉली पेटवण्याचा प्रयत्न केल्याची बाब पत्रकार देविदास देसाई यांच्या लक्षात आली. त्यानी पातळीने तातडीने बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे यांना घटनेची माहिती दिली अभिषेक खंडागळे सरपंच व बेलापूर ग्रामपंचायत कर्मचारी तातडीने त्या ठिकाणी आले व त्यांनी बेलापूर पोलिसांना ही माहिती दिली बेलापूर पोलीस स्टेशन समोरच घटना घडून देखील पोलीस अनभिज्ञ होते , ही ट्रॉली बेलापूर ग्रामपंचायतीच्या कामासाठी वापरली जात होती
ट्रॉलीचे मोठे नुकसान टळले असले तरी, ही घटना ग्रामपंचायतीच्या मालमत्तेच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण करणारी आहे. बेलापूर पोलिसांच्या दारातच लावलेले वहान जर सुरक्षित नसेल तर इतरांचे काय असा सवाल विचारला जात आहे. ट्रॅक्टरचे नुकसान करणारा इसम हा उक्कलगाव मार्गे बायपास रोडने स्कुटी मोटरसायकल वर आला व स्कुटी बायपासला लावून तो पोलीस स्टेशन समोर उभे असलेल्या ग्रामपंचायतच्या ट्रॉलीजवळ जाऊन त्याने ट्रॉलीचे टायर पेटवून देण्याचा प्रयत्न केला. सदरील इसम पांढऱ्या रंगाचा रेनकोट घातला होता त्याचबरोबर त्याने तोंड देखील बांधले होते .याचा अर्थ जाणून बुजून त्याने हे कृत्य केले असून पोलिसांनाच एक प्रकारे आव्हानच दिले आहे या बाबत बेलापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.मिनाताई साळवी यांनी बेलापूर पोलीस स्टेशनला जावून तक्रार दिली . बेलापूरच्या सरपंच साळवी यांच्या तक्रारीवरून सार्वजनिक मालमत्तेचे अज्ञात इसमाने नुकसान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोनच दिवसांपूर्वी गोमांस विकत असल्याच्या कारणावरून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसासंमक्ष त्याठिकाणी धाड टाकली असता गोमांस विकणाऱ्यांनी पोलिसा समक्षच बजरंग दल व गोरक्षक दलाच्या कार्यकर्त्यांना अरेरवी केली तसेच दोन दिवसापूर्वी गाडीला कट मारल्याच्या संशयावरून उक्कलगाव येथील प्रगतशील शेतकरी खरेदी विक्री देखरेख संघाचे चेअरमन इंद्रनाथ पा.थोरात यांना उक्कलगाव चौकात धक्काबुक्की करण्यात आली.त्यात त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापती झाली असुन त्यांना तातडीने जालना येथील दवाखान्यात न्यावे लागले तसेच गावातील अब्दुल्ला उमर कुरेशी यांची एच एफ डिलक्स ही टु व्हीलर घरासमोरुन चोरुन नेवुन गाडीची तोडफोड करुन साळूंके पेट्रोल पंपासमोर सोमाणी यांच्या शेतांच्या कडेला असलेल्या ओढ्यात सापडली . गाडीचे मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आले असून संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी ही कुरेशी यांनी केली आहे गावात दोन गटात मारामारी झाली.तेथेही पोलीसासमोरच एका गटाने दुसऱ्या गटाची गाडी फोडली .अशा घटना घडून जर पोलीस बघ्याची भूमिका घेणार असेल न्याय मागायचा कुणाकडे असा सवाल विचारला जाता आहे.
Post a Comment