कॉ.पी.बी.कडू पाटील यांचे कार्य समाजासाठी प्रभावशाली-अभिनेते सयाजी शिंदे.

कोल्हार प्रतिनिधी (साईप्रसाद कुंभकर्ण ) :-  कॉ.पी.बी.कडू पाटील यांचे कार्य स्मरणात राहण्यासाठी प्रत्येकाने एक झाड लावले पाहिजे. कॉ.पी.बी.कडू पाटील  यांचे कार्य अत्यंत प्रभावशाली असेच आहे असे प्रतिपादन सह्याद्री देवराई अभियानचे अभिनेता सयाजी शिंदे यांनी थोर स्वातंत्र्य सेनानी कॉ.पी.बी.कडू पाटील तृतीय स्मृतीदिन,मातोश्री शांताबाई पुंजाजी कडू पाटील स्मृती पारितोषिक समारंभ व  कॉ.पी.बी.कडू पाटील समाजक्रांती पुरस्कार प्रदान समारंभ प्रसंगी रयत संकुल सात्रळ येथे केले.त्यांनी सांगितले कि प्रत्येकांनी आज किमान एक झाड लावले पाहिजे त्याचप्रमाणे पाच वर्ष त्यांचा वाढदिवस साजरा केला पाहिजे आजची शिक्षण पद्धती ही व्यक्तिगत जीवन जगण्याची आहे त्याऐवजी निसर्गासाठी कसे जगता येईल हे पाहावे कारण देश मागे गेला तर शेतकरी मागे राहील यासाठी या भयानक परिस्थितीचा आपण सर्वांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे आपल्या वागण्याने जग बदलता येते.यासाठीच आपण निसर्गासाठी बदल केला पाहिजे यावेळी त्यांनी कविवर्य अरविंद जगताप यांची काव्यरचना विद्यार्थ्यांसमवेत गायली तसेच युवानेते पंकज कडू पाटील यांच्या सहकार्याने पाच हजार वृक्ष लावण्याचा संकल्प केला.   
कॉ.पी.बी.कडू पाटील तृतीय स्मृतीदिन समाजक्रांती पुरस्कार समारंभ कॉ.पी.बी.कडू पाटील फौंडेशन,सात्रळ यांचे विद्यमाने मातोश्री शांताबाई पुंजाजी कडू पाटील  स्मृती पारितोषिक वितरण समारंभ रयत शैक्षणिक संकुल सात्रळ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
 कार्यक्रमाचे प्रास्ताविक रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व कॉ.पी.बी.कडू पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.अरुण कडू पाटील यांनी करतांना सांगितले कि  आप्पांच्या कार्याचा वसा चालविण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोतच यासाठी त्यांच्या स्मृती दिनी वेगेवेगळे पुरस्कार देऊन नामवंत वक्त्यांना आमंत्रित करून विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन केले जाते.या उपक्रमास सर्वांची साथ लाभाल्यानेच अप्पांचे हे कार्य पुढे चालू शकलो आहे. यावेळी त्यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.
कॉ.पी.बी.कडू पाटील समाजक्रांती पुरस्कार जेष्ठ साहित्यिक मा.फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी आपल्या संदेशात कॉ.पी.बी.कडू पाटील यांच्या कार्याबद्दल सांगितले की जे समाजासाठी सुंदर जीवन जगतात त्यांची स्मृती कायम राहते त्याप्रमाणेच कॉ.पी.बी.कडू पाटील यांनी आपल्या  कार्याने  स्मृती कायम ठेवली आहे.त्यामुळे आपल्या सर्वांची आज जबाबदारी बनते की कॉ.पी.बी.कडू पाटील यांच्या कार्याचा वसा आपण सर्वांनी पुढे चालू ठेवणे गरजेचे आहे.तोच वसा या संकुलात जपला हि अभिमानाची गोष्ट आहे
महाराष्ट्र राज्य आदर्श गाव प्रकल्प समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार यांनी आपले मनोगत व्यक्त शेती आणि मातीसाठी कॉ.पी.बी.कडू पाटील यांचे कार्य थोर असेच आहे आज मात्र पाणी चळवळ उभी करणे गरजेचे आहे अभिनेता सयाजी शिंदे यांच्या देवराई प्रकल्पाबद्दल बोलतांना त्यांनी सांगितले की दैवत्वाचे नाव ठेवून वनराई नटविण्याचे कार्य अभिनेता सयाजी शिंदे यांनी केले विस्तापित माणसाला प्रस्तापित कसे करता येईल याचे उत्तम उदाहरण म्हणजे सयाजी शिंदे होय.आज आपण सर्वांनी निसर्गाच्या विविधतेसाठी झटले पाहिजे सर्वजन आज विषयुक्त अन्न खात आहोत देशाला अन्न पुरविना-या पंजाबची अवस्था आज कॅन्सरग्रस्त अशी झाली आहे  यासाठी सर्वांनी पर्यावरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून पाणी चळवळ उभी करणे गरजेचे आहे
याप्रसंगी कॉ.पी.बी.कडू पाटील फौंडेशन,सात्रळ यांचे विद्यमाने  दिला जाणारा  कॉ.पी.बी.कडू पाटील समजक्रांती पुरस्कार जेष्ठ साहित्यिक मा.फादर फ्रान्सिस दिब्रिटो रु.५१,००० /- व सन्मानपत्र त्यांच्या वतीने त्यांची पुतणी लुसि दिब्रोटो यांनी स्वीकारला  व विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या शिक्षक व विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यामध्ये मातोश्री शांताबाई पुंजाजी कडू पाटील स्मृति परितोषिक श्री. कवडे वसंत सुदाम कृतिशील मुख्याध्यापक,पुंजाजी रामजी भोर विद्यालय,ठाणगाव ता.सिन्नर रु.११,००० /- व स्मृतीचिन्ह उपक्रमशील शिक्षक पुरस्कार - कचरे रविंद्र पांडुरंग उपशिक्षक,छत्रपती शिवाजी विद्यालय,बेलवंडी ता.श्रीगोंदा -रु.११,००० /- व स्मृतीचिन्ह सावित्रीबाई फुले उपक्रमशील शिक्षिका पुरस्कार- सौ.शेख तैसिन जावेद उपशिक्षिका,महात्मा फुले विद्यालय,भाळवणी ता.पारनेररु.११,००० /- व स्मृतीचिन्ह स्वच्छ सुंदर शाळा पुरस्कार प्रथम क्रमांक  रु.५,००१/- व स्मृतीचिन्ह -लक्ष्मीबाई भाउराव पाटील प्राथमिक विद्यालय,अहमदनगर स्वच्छ सुंदर शाळा पुरस्कार द्वितीय क्रमांक  रु.३,०००/- व स्मृतीचिन्ह डॉ.सी.एम.मेहता कन्या विद्यामंदिर, ता.कोपरगाव  एस.एस.सी.परीक्षा उत्तर विभागात प्रथम खेमनर संचित ठकाजी  पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील विद्यालय,लोणी   -रु.१,१०१/- व स्मृतीचिन्ह एस.एस.सी.परीक्षा उत्तर विभागात प्रथम - मुली.पवार वैष्णवी पांडुरंग  श्री गणेश विद्यामंदिर आमंळनेर भांड्याचे ता. पटोदा    रु.११०१/- व स्मृतीचिन्ह एच.एस.सी परीक्षा मार्च - विभागात प्रथम --कला शाखा   कु.दुतारे स्वाती गौरव  राधाबाई काळे महिला महाविद्यालय,अहमदनगर  रु.११०१/- व स्मृतीचिन्ह एच.एस.सी परीक्षा मार्च - वाणिज्य शाखा कु.शिंदे ऋतुजा नानासाहेब  एस एस जी एम कॉलेज,कोपरगाव रु.११०१/- व स्मृतीचिन्ह एच.एस.सी परीक्षा मार्च - विज्ञान शाखा काळे गणेश रमेश    महात्मा गांधी विद्यालय,कर्जत    रु.११०१/- व स्मृतीचिन्ह
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहुरी पंचायत समितीचे सभापती धोंडीभाऊ सोनवणे हे होते
या कार्यक्रमास मा.आमदार सुधीरजी तांबे,आमदार लहुजी कानडे ,उत्तर विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दादाभाऊ कळमकर, मा.मीनाताई जगधने, मा.रावसाहेब मस्के पाटील,कॉ.बाबा आरगडे,माजी सचिव प्राचार्य शिवाजीराव भोर, प्रा.डॉ.गहिनीनाथ विखे,बाळासाहेब केरूनाथ विखे,भाऊसाहेब थोरात,कारखान्याचे एम.डी घुगरकर साहेब, माजी सहसचिव श्रीरंग झावरे, विभागीय अधिकारी संजय नागपुरे,उपविभागीय सरदार साहेब,गोविंदराव मोकाटे,शब्बीरभाई देशमुख, बबनराव कडू पाटील, एस.के,रयत सेवक संघाचे सरचिटणीस मा.भाऊसाहेब पेटकर,गणेश पाटील कडू ,पर्यवेक्षक श्री साळुके बी .एल. मुख्याध्यापिका जोगदंड जे.ए.,युवा नेते किरण कडू पाटील ,पंकज कडू पाटील ,विक्रांत कडू, सन्मानीय सर्व शाखाप्रमुख, संस्था पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.सिराज मन्सुरी व श्री.मंगेश कडलग यांनी केले.तर मा.दिलीप शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget