शिरसगाव[वार्ताहर]येथील ग्रामीण साहित्यिक प्रा.डॉ बाबुराव दत्तात्रय उपाध्ये यांना “विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान”चा महाराष्ट्र साहित्यरत्न पुरस्कार जाहीत झाला असून हा पुरस्कार रविवार दि ३० जानेवारी रोजी रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.श्रीरामपूर येथील बोरावकेनगरमधील विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचा दुसरा वर्धापन दिन ३० जानेवारी रोजी श्रीरामपूर आगाशे सभागृह येथे सकाळी १०-३० वा. आयोजित करण्यात आला आहे.त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संस्थापक साहेबराव घाडगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान उपाध्यक्ष डॉ राजीव रावसाहेब शिंदे,यांच्या अध्यक्षतेखाली विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.प्रतिष्ठान संस्थापक सुखदेव सुकळे लिखित”समर्पित प्रकाशयात्री”या चिंतनात्मक चरित्रग्रंथाचे प्रकाशन होणार आहे.या ग्रंथात सुखदेव सुकळे यांनी आरोग्यमित्र सुभाषराव गायकवाड,डॉ बाबुराव उपाध्ये,माजी प्राचार्य टी इ शेळके,यांचा चरित्रात्मक शब्दवेध घेतलेला आहे.डॉ उपाध्ये यांनी ७ ओगस्ट १९८४ ते ३० जून २०१७ या ३३ वर्षे काळात रयत शिक्षण संस्थेच्या सातारा,पुणे,कर्जत,श्रीरामपूर शाखेत मराठी प्राध्यापक म्हणून काम केले.विविध वाड:मय प्रकारात ३० पुस्तके प्रसिद्ध असून त्यांना आतापर्यंत ३३ पुरस्कार मिळाले आहेत.ते पुणे विद्यापीठाचे मराठी विषयाचे एम फील/पी एच डी चे नार्गादर्शक होते.त्यांचे ८ अभ्यासकांनी पी एच डी व १७ अभ्यासकांनी एम फील पदवी प्राप्त केली.त्यांच्या जीवनावर आधारित ६ जीवनग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत.विविध नियतकालिकामध्ये ७५ शोधनिबंध लिहिले असून ते सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बहि:शाल शिक्षण मंडळाचे व्याख्याते म्हणून समाज प्रबोधनाचे कार्य करीत आहेत,त्यांनी ६ ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे.व ३००० व्याख्याने झाली आहेत.त्यांनी”आईची माया”ही कथा पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात होती.सध्या दोन संदर्भग्रंथ अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत.त्यांना पुरस्कार जाहिर झाल्याने अनेकांनी अभिनंदन केले आहे.
Post a Comment