Latest Post

बुलडाणा - 16 जानेवारी
येथील सहकार विद्या मंदिर येथे शारीरिक शिक्षक म्हणून कार्यरत श्रीकांत निंबोकार हे खामगांवहुन परत येत असतांना त्यांच्या मोटरसाइकिलला रान डुककरने  जोरदार धड़क दिल्याने ते गंभीर जख्मी झाले व उपचारा आभावी जागेवरच मरण पावले.ही दुर्दैवी घटना आज सकाळी भादोला जवळ उघडकिस आली आहे.
      मिळालेल्या माहितीनुसार श्रीकांत देवीदास निम्बोकार (वय 32) रा. बोबडे कॉलोनी,खामगांव हे मागील 10 वर्षा पासून बुलडाणा येथील सहकार विद्या मंदिर येथे शारीरिक शिक्षक या पदावर कार्यरत होते.काल 15 जानेवारीला रात्री 10 वाजेच्या सुमारास ते आपली मोटरसाइकिल ने खामगांवहुन बुलडाणा कडे येत होते दरम्यान भादोला गावा जवळील पेट्रोल पंपा जवळ त्यांच्या बाइकला रान डुकराने जोरदार धडक दिली व ते खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला रात्रिची वेळ असल्याने त्यांना कोणतीही मदत वेळेवर मिळू शकली नाही.आज सकाळी भादोलाचे पोलिस पाटील सूर्यकांत गवई व इतर काही लोक मॉर्निंगवॉक साठी वरवंड फाट्या कडे जात असतांना त्यांना शिक्षक निबोकार हे पडून दिसले याची माहिती बुलडाणा ग्रामीण पोलिसाला दिल्याने बिटजमादार रमेश बनसोडे, जनार्धन इंगले घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करुण शव बुलडाणा सामान्य रुग्णालयात नेन्यात आले.ही माहिती सहकार विद्या मंदिर च्या इतर शिक्षकांना मिळताच शोककळा पसरली.या प्रकरणी बुलडाणा ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


अहमदनगर - नगर - सोलापूर महामार्गावरील मांडवगण शिवारातील अपघातात मयत झालेले चापोहेकाँ शहाजी भाऊराव हजारे यांच्या वारसदार पत्नी लता शहाजी हजारे यांना ३० लाख रुपयांचा अपघात विमाचा चेक प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी शहर पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके, एचडीएफसी बँकेचे शाखा प्रमुख विशाल खडके, उपशाखा प्रमुख उपस्थित होते.
कै. शहाजी हजारे यांचा अपघात दावा ते वेतन घेत असलेल्या एचडीएफसी बँकेकडे पाठविण्यात आला होता. हा दावा बँकेने तातडीने निकाली काढून कै.हजारे यांच्या वारस पत्नीस अपघात विमाची रक्कम मिळून दिली. यासाठी प्रभारी पोलिस अधीक्षक सागर पाटील व शहर पोलिस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके आदिसह कार्यालयीन पाठपुरावा करुन मयत पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला मदत केली आहे. 

बुलडाणा - 15 जानेवारी
बुलडाणा जिल्ह्यातील खामगांव-चिखली मार्गावर कार अपघातात 2 जण ठार तर तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना आज बुधवारी 15 जानेवारीच्या सकाळी 7 वाजताच्या दरम्यान घडली.जखमींमध्ये दीड वर्षाच्या मुलाचा समावेश असून त्यांना उपचारार्थ अकोला येथे हलविण्यात आले आहे.चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून  वर्तविण्यात येत आहे.
        सद्या पुण्यात स्थायिक लोक काही कामानिमित्त एमएच-30-एटी-3009 क्रमांकाच्या कारने खामगाव तालुक्यातील कांचनपूर या आपल्या मूळ गावी येत असतांना आज बुधवारी पहाटे 7 वाजेच्या दरम्यान खामगांव-चिखली मार्गावरील अमडापूर या गावा नजीक कार रस्त्याच्या बाजूने खोदलेल्या नालीत कोसळली. यामध्ये पार्वताबाई प्रकाश बहुरुपे (50) व प्रीती विलास बहुरुपे (24) यांचा जागीच मृत्यू झाला तर प्रकाश प्रल्हाद बहुरुपे (60), स्नेहल श्रीकांत भोजने (27) व विलास श्रीकांत भोजने (दीड वर्ष ) असे तीन जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच अमडापुर ठाणेदार अमित वानखडे यांनी एएसआय टेकाळे, परमेश्वर शिंदे, तडवी, वैद्य यांना घटनास्थळी रवाना केले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन जखमी व मृतकांना चिखली येथील ग्रामिण रुग्णालयात पाठविले.चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघात घडल्याची आशंका पोलिसांनी व्यक्त केली आहे.

बुलडाणा - 15 जानेवारी 
भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन विवेकानंद आश्रमाच्या वतीने आयोजित विवेकानंद जन्मोत्सव सोहळयास आज बुधवार ता.15 पासून हिवरा आश्रम ता.मेहकर येथे सुरूवात होत असून कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज यांच्या आसनस्थ रथारूढ प्रतिमेची सवाद्य शोभा यात्रा हे प्रमुख आकर्षण राहणार आहे. 
        या शोभायात्रेसाठी पंचक्रोशीतील दिंड्या,पालख्या व भजनी मंडळे यांचे विवेकानंद नगरीकडे आगमन सुरू झाले आहे. दि 15 जानेवारी ते 17 जानेवारी असे तीनही दिवस यानिमित्त भरगच्च सांस्कृतिक,धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. शेवटच्या दिवशी तीन लाख भाविकांना महाप्रसादाचे वाटप करून सांगता करण्यात येईल. तीनही दिवस सकाळी थुट्टे शास्त्री महाराज यांचे व्याख्यान तर दि.15 जानेवारी रोजी विवेकानंद आश्रम संगीत विभागाचे अनुभूती गायन व अभंग गायन,हभप येवले शास्त्री महाराज यांचे प्रवचन होईल. हभप प्रकाश महाराज जवंजाळ यांचे कीर्तन,डॉ.विकास बाहेकर यांचे प्रवचन,विवेकानंद विचारदूत जान्हवी केळकर यांचे व्याख्यान,हभप महादेव महाराज राऊत यांचे कीर्तन पार पडणार आहे. विवेकानंद जन्मोत्सव हा व्हिलेज ते ग्लोबल असा सर्वदूर पोहोचला असून, तीनही दिवस चालणा-या भरगच्च कार्यक्रमांचे विवेकानंद आश्रमाच्या युट्यूब वाहिनीसह सोशल मीडियाद्वारे लाईव्ह प्रक्षेपण केले जाणार आहे.  गतवर्षी तब्बल साडेचार लाख भाविक व भारतीयांनी हे लाईव्ह प्रक्षेपण जगाच्या विविध भागात पाहिले होते. त्यादृष्टीने विवेकानंद आश्रमाच्या मीडिया व पब्लिसिटी विभागाने चोख नियोजन केले आहे.  तीनही दिवसांच्या या सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सचिव संतोष गोरे, सहसचिव विष्णुपंत कुलवंत, आत्मानंद थोरहाते यांनी केले आहे.

गळनिंब(प्रतिनिधी) महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व संतलूक हास्पिटल श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने व सिध्देश्वर चहा समिती यांच्या वतीने मोफप उपचार व शस्रक्रीया शिबिर नुकतेच संपन्न झाले.
 यावेळी हृदयरोग,मुतखडा,विषबाधा,बालरोग,हाडांचेविकार, किडनीविकार,सर्पदंश,मुत्रपिंड आदी रोगांवर तज्ञ डाॅक्टरानी मार्गदर्शन व मोफत उपचार करून औषध वाटप केले.
यावेळी डाॅ.शितल महाले,डाॅ.वर्षा भिसे,सिस्टर जॅकलिन,रिटा,लिमा,माधुरी,प्रिया,ब्रदर कीरण साळवे,योगेश सरोदे,अनिस इनामदार,आहद शेख,राहूल राऊत यांनी या शिबिरात रूग्णांची तपासणी करून सेवा पुरवली.या दरम्यान १६९ रूग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधे पुरविण्यात आले.
यावेळी प्रवरा बॅंकेचे माजी संचालक भाऊसाहेब वडितके,मा.उपसरपंच गणपत चिंधे,देवस्थानचे अध्यक्ष सुनिल शिंदे,भगत भोसले,आण्णासाहेब वडितके,साहेबराव भोसले,पंढरीनाथ भोसले,राजु भोसले,साहेबराव चिंधे,चंद्रकांत भोसले,नानासाहेब शिंदे,प्रभाकर जाटे आदी उपस्थित होते.
    शिबिर यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत सदस्य संदिप शेरमाळे, सचिव कैलास ऐनोर,विलास ससाणे,भाऊराव विश्वासे,संजय शिंदे,मनोज तुपे,सह सिध्देश्वर चहा समितीचे सदस्य आदिंनी परीश्रम घेतले.

नेवासा (शहर प्रतिनिधी) नेवासा तालुक्यातील टोका-प्रवरासंगम येथे नदीपात्रात सोमवारी आढळलेल्या अज्ञात तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटली असून मागील वादाच्या कारणातून गंगापूर तालुक्यातील तरुणाची हत्या करून मृतदेह नदीपात्रात फेकल्या प्रकरणी किरण सुभाष हिवाळे (वय 23) रा. भीवधानोरा ता. गंगापूर याच्या वडिलांच्या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत माहिती अशी की, सोमवारी सकाळी तालुक्यातील टोका येथील प्रवरा नदीपात्रात तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. नेवासा पोलिसांनी याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. सदर मृतदेहाची तपासणी केली असता किरण सुभाष हिवाळे या नावाची पावती त्याच्या खिशात सापडल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. सदर तरुण गंगापूर तालुक्यातील भीवधानोरा येथील असल्याचे स्पष्ट झाले.भीवधानोरा येथे हिवाळे राहत असलेल्या दलित वस्तीमध्येच कानिफ माणिक मावस हा चोरून दारू विक्रीचा धंदा करत होता. एक वर्षांपूर्वी किरण याने वस्तीतील तरुण बिघडत असल्याचे कारण देत मावस यास वस्तीत दारू विक्री करू नका असे सांगितल्यानंतर मावस व त्याचा मित्र अशोक तुपे (रा. भेंडाळा ता. गंगापूर) यांनी किरणला मारहाण केली. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्या गुन्ह्यात दोघांना अटक करण्यात आली होती. जामिनावर सुटल्यानंतर त्या दोघांनी किरण यास तुझ्यामुळे जेल मध्ये बसावे लागले असून तुझा काटा काढणार असल्याचे फोनवर तसेच समक्ष भेटून दमबाजी केली.किरण हा भेंडाळा येथील एका हॉटेलवर वेटर म्हणून काम करत होता तो मागील आठवड्यात घरी आल्यानंतर त्याने वडिलांना सदर माहिती सांगितली त्यानंतर दोन दिवस राहून तो पुन्हा हॉटेलवर कामासाठी गेला मात्र तीन दिवसांपासून त्याचा फोन लागत नव्हता. दरम्यान किरणचा मृतदेह प्रवरानदी पात्रात आढळून आल्याची माहिती हिवाळे यांना सोमवारी सायंकाळी समजल्यानंतर त्यांनी नातेवाईकांसह नेवासाफाटा येथील ग्रामीण रुग्णालय येथे जाऊन पाहणी केली असता सदरचा मृतदेह किरणचा असल्याची खात्री पटली.मृत किरण याच्या हाताला व गळ्याला दावे बांधून त्या दाव्याला दगड बांधलेला होता तसेच पोटाच्या बाजूला कशाने तरी खुपसल्याच्या खुणा दिसत होत्या. मृतदेह पाण्यात भिजल्याने फुगलेल्या अवस्थेत प्रवरासंगम प्रवरा नदी वरील पुलाखाली आढळून आला असल्याचे पोलिसांनी मृत किरण याच्या वडिलांना सांगितले.याबाबत मृत किरणचे वडील सुभाष हिवाळे यांनी मागील केसच्या कारणावरून जीवे ठार मारण्याची धमकी देणार्‍या कनिफ माणिक मावस (रा. भीवधानोरा ता. गंगापूर) व अशोक तुपे (रा. भेंडाळा ता. गंगापूर) या दोघांवर संशय व्यक्त करत यांच्याविरुद्ध नेवासा पोलिसात फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी वरील दोघांवर गुन्हा रजिस्टर फर्स्ट 28/2019 भारतीय दंड विधान कलम 302, 201, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पी. के. शेवाळे करीत आहेत.

बेलापूर प्रतिनिधी - अध्यात्माशिवाय खरे सुख नाही मोबाईल  ईंटरनेटच्या जमान्यात अध्यात्माची गोडी तरुण पिढीला लागावी हा दृष्टिकोन समोर ठेवुन वाचनालयास धार्मिक ग्रंथ भेट देण्याचा निर्णय घेतला असल्याचे मत इस्काँनचे प्रचारक किरण गागरे यांनी व्यक्त केले        इस्काँन परिवाराच्या वतीने बेलापूर ग्रामपंचायत वाचनालयास साडे अकरा हजार रुपयांचे ग्रंथ इस्काँनचे प्रचारक किरण गागरे यांनी भेट दिले त्या वेळी ते बोलता होते ते पुढे म्हणाले की  बेलापूरला प्राचीन संस्कृतीचा ठेवा असलेले केशव गोविंद मंदिर , शनीमहाराज मंदिर ,तसेच विठ्ठल मंदिर असून दुरदूरचे पर्यटक दर्शनभेट देण्यासाठी आवर्जून येतात,अशा बेलापूरला अध्यात्मिक अधिष्ठान लाभलेली संत परंपरा देखील आहे,राष्ट्रीय संत आचार्य गोविंददेव गिरीजी महाराज ,हभप गोपालबुवा हिरवे महाराज , तसेच पं.महेशजी व्यास यांनी भागवतधर्माची पताका देशात फडकावली आहे त्यामुळे धार्मिक परपंरा असलेल्या या गावाला धार्मिक ग्रंथ देण्याची अनेक वर्षापासुन ईच्छा होती ती आज पुर्ण झाली दिपक क्षत्रिय म्हणाले की   इस्कॉन (आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ )परिवारा पैकी बेलापूर मधील प्रचारक किरण गागरे ,त्यांच्या मातोश्री लतादेवी,व पत्नी सौ. कावेरी  देखील इस्कॉन च्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करीत आहे ,इस्कॉन परिवार सर्व जगात विखुरलेला आहे ,अनेक देशात  अतिभव्य कृष्ण मंदिरे असून पाकिस्तान मधेही बारा मंदिर आहेत.  ,  ग्रंथ हेच आयुष्याचा भवसागर तरून जाण्याचा मार्ग असल्याचे क्षत्रिय म्हणाले  , शैक्षणिक,सामाजिक ,सांस्कृतिक,व आध्यात्मिक विकास हा ग्रंथ वाचनातूनच होतो , दर्जेदार अध्यात्मिक साहित्य जनसामान्यापर्यत जावे ह्या हेतूने त्यांनी अकरा हजार रुपयांचे ग्रंथ भेट दिले असल्याचे जेष्ठ , पत्रकार देविदास देसाई यांनी सांगितले या वेळी  ग्रंथ भेट दिल्याबद्दल किरण गागरे  यांचा सत्कार केला .या कार्यक्रम प्रसंगी किशोर नाना बोरुडे,लहानुभाऊ नागले,चंद्रकांत शेजुळ,गोविंदराव खरमाळे,मच्छिंद्र पुंड,विलास मेहेत्रे,चंद्रकांत नाईक,अशोक गवते,मनोज श्रीगोड ,गणेश मगर, आधार ग्रुपचे अमोल गाढे ,महेश ओहोळ ,सचिन मेहेत्रे , बेलापूर पत्रकार संघाचे सचिव देविदास देसाई,दिलीप दायमा ,दिपकसा क्षत्रिय ,इ हजर होते ,

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget