बुलडाणा - 15 जानेवारी
बुलडाणा जिल्ह्यातील खामगांव-चिखली मार्गावर कार अपघातात 2 जण ठार तर तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना आज बुधवारी 15 जानेवारीच्या सकाळी 7 वाजताच्या दरम्यान घडली.जखमींमध्ये दीड वर्षाच्या मुलाचा समावेश असून त्यांना उपचारार्थ अकोला येथे हलविण्यात आले आहे.चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.
सद्या पुण्यात स्थायिक लोक काही कामानिमित्त एमएच-30-एटी-3009 क्रमांकाच्या कारने खामगाव तालुक्यातील कांचनपूर या आपल्या मूळ गावी येत असतांना आज बुधवारी पहाटे 7 वाजेच्या दरम्यान खामगांव-चिखली मार्गावरील अमडापूर या गावा नजीक कार रस्त्याच्या बाजूने खोदलेल्या नालीत कोसळली. यामध्ये पार्वताबाई प्रकाश बहुरुपे (50) व प्रीती विलास बहुरुपे (24) यांचा जागीच मृत्यू झाला तर प्रकाश प्रल्हाद बहुरुपे (60), स्नेहल श्रीकांत भोजने (27) व विलास श्रीकांत भोजने (दीड वर्ष ) असे तीन जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच अमडापुर ठाणेदार अमित वानखडे यांनी एएसआय टेकाळे, परमेश्वर शिंदे, तडवी, वैद्य यांना घटनास्थळी रवाना केले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन जखमी व मृतकांना चिखली येथील ग्रामिण रुग्णालयात पाठविले.चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघात घडल्याची आशंका पोलिसांनी व्यक्त केली आहे.
Post a Comment