अहमदनगर - नगर - सोलापूर महामार्गावरील मांडवगण शिवारातील अपघातात मयत झालेले चापोहेकाँ शहाजी भाऊराव हजारे यांच्या वारसदार पत्नी लता शहाजी हजारे यांना ३० लाख रुपयांचा अपघात विमाचा चेक प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी शहर पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके, एचडीएफसी बँकेचे शाखा प्रमुख विशाल खडके, उपशाखा प्रमुख उपस्थित होते.
कै. शहाजी हजारे यांचा अपघात दावा ते वेतन घेत असलेल्या एचडीएफसी बँकेकडे पाठविण्यात आला होता. हा दावा बँकेने तातडीने निकाली काढून कै.हजारे यांच्या वारस पत्नीस अपघात विमाची रक्कम मिळून दिली. यासाठी प्रभारी पोलिस अधीक्षक सागर पाटील व शहर पोलिस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके आदिसह कार्यालयीन पाठपुरावा करुन मयत पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला मदत केली आहे.
Post a Comment