बेलापूर प्रतिनिधी - अध्यात्माशिवाय खरे सुख नाही मोबाईल ईंटरनेटच्या जमान्यात अध्यात्माची गोडी तरुण पिढीला लागावी हा दृष्टिकोन समोर ठेवुन वाचनालयास धार्मिक ग्रंथ भेट देण्याचा निर्णय घेतला असल्याचे मत इस्काँनचे प्रचारक किरण गागरे यांनी व्यक्त केले इस्काँन परिवाराच्या वतीने बेलापूर ग्रामपंचायत वाचनालयास साडे अकरा हजार रुपयांचे ग्रंथ इस्काँनचे प्रचारक किरण गागरे यांनी भेट दिले त्या वेळी ते बोलता होते ते पुढे म्हणाले की बेलापूरला प्राचीन संस्कृतीचा ठेवा असलेले केशव गोविंद मंदिर , शनीमहाराज मंदिर ,तसेच विठ्ठल मंदिर असून दुरदूरचे पर्यटक दर्शनभेट देण्यासाठी आवर्जून येतात,अशा बेलापूरला अध्यात्मिक अधिष्ठान लाभलेली संत परंपरा देखील आहे,राष्ट्रीय संत आचार्य गोविंददेव गिरीजी महाराज ,हभप गोपालबुवा हिरवे महाराज , तसेच पं.महेशजी व्यास यांनी भागवतधर्माची पताका देशात फडकावली आहे त्यामुळे धार्मिक परपंरा असलेल्या या गावाला धार्मिक ग्रंथ देण्याची अनेक वर्षापासुन ईच्छा होती ती आज पुर्ण झाली दिपक क्षत्रिय म्हणाले की इस्कॉन (आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ )परिवारा पैकी बेलापूर मधील प्रचारक किरण गागरे ,त्यांच्या मातोश्री लतादेवी,व पत्नी सौ. कावेरी देखील इस्कॉन च्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करीत आहे ,इस्कॉन परिवार सर्व जगात विखुरलेला आहे ,अनेक देशात अतिभव्य कृष्ण मंदिरे असून पाकिस्तान मधेही बारा मंदिर आहेत. , ग्रंथ हेच आयुष्याचा भवसागर तरून जाण्याचा मार्ग असल्याचे क्षत्रिय म्हणाले , शैक्षणिक,सामाजिक ,सांस्कृतिक,व आध्यात्मिक विकास हा ग्रंथ वाचनातूनच होतो , दर्जेदार अध्यात्मिक साहित्य जनसामान्यापर्यत जावे ह्या हेतूने त्यांनी अकरा हजार रुपयांचे ग्रंथ भेट दिले असल्याचे जेष्ठ , पत्रकार देविदास देसाई यांनी सांगितले या वेळी ग्रंथ भेट दिल्याबद्दल किरण गागरे यांचा सत्कार केला .या कार्यक्रम प्रसंगी किशोर नाना बोरुडे,लहानुभाऊ नागले,चंद्रकांत शेजुळ,गोविंदराव खरमाळे,मच्छिंद्र पुंड,विलास मेहेत्रे,चंद्रकांत नाईक,अशोक गवते,मनोज श्रीगोड ,गणेश मगर, आधार ग्रुपचे अमोल गाढे ,महेश ओहोळ ,सचिन मेहेत्रे , बेलापूर पत्रकार संघाचे सचिव देविदास देसाई,दिलीप दायमा ,दिपकसा क्षत्रिय ,इ हजर होते ,
Post a Comment