श्रीरामपूर (प्रतिनिधी)-परीवहन विभाग आणि पोलिस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने येथील उप प्रादेशिक परिवहन (आरटीओ)कार्यालयात ३१ वा रस्ता सुरक्षा अभियान २०२० उद्घाटन सोहळा संपन्न झाला,
यावेळी उप विभागीय (प्रांत) अधिकारी अनिल पवार,
राज्य अधिस्विकॄती समितीचे सदस्य प्रकाश कुलथे,
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ए.ए.खान, राज्य परिवहन महामंडळाचे विद्याधर साठे,
सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश डगळे, दैनिक जयबाबाचे अॅड.कैलास आगे, दैनिक सामनाचे बाळासाहेब भांड, दैनिक सकाळचे गौरव साळूंखे, टॅक्सी असोसिएशनचे सुनिल मुथा, मोटार वाहन निरीक्षक जमीर तडवी,गणेश पिंगळे, निलेश डहाके,जयश्री बागुल,विनोद घनवट, सहायक मोटार वाहन निरीक्षक अर्चना फटांगरे ,श्वेता कुलकर्णी, धिरजकुमार भामरे आरटीओ कार्यालयाचे मुख्य लिपिक दत्तात्रेय गाडेकर,समता फाऊंडेशनचे शौकतभाई शेख, पत्रकार स्वामिराज कुलथे,प्रेस फोटोग्राफर अमोल कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना प्रांताधिकारी श्री.पवार म्हणाले की, हल्ली वाढत्या अपघातांची संख्या ही खुपच चिंतेची बाब ठरत असून सिमेवर शुर सैनिक किंवा एखाद्या दहशतवादी हल्ल्यात जितके लोकं मॄत्यूमुखी पडत नाही त्यापेक्षा कितीतरीपटीने अपघातात प्राण गमावणाऱ्यांची संख्या अधिक आहे, याकरीता पालकांनी आपल्या अल्पवयीन पाल्यांना वाहन चालवयास देऊ नये, वाहन चालवितांना सर्वांनीच वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास आपण हमखास अपघातांवर काही अंशी नियंत्रण मिळवू शकू असेही ते म्हणाले.
आपल्या प्रस्ताविकात बोलताना श्री.खान म्हणाले की, दिनांक ११ जानेवारी ते १७ जानेवारी दरम्यान रस्ता सुरक्षा अभियान २०२० साजरा करत असताना दिनांक ११ जानेवारी २०२० रोजी शहरातून रस्ते सुरक्षेपर भव्य अशी रॅली काढण्यात आली यासोबतच सप्ताहभर कार्यक्षेत्रातील विविध शाळा, महाविद्यालय,साखर कारखाने,वर्कशॉप,तथा रस्त्यांवर, विविध चौकांचौकांमध्ये रस्ते सुरक्षेपर वाहतूक नियमांविषयी जनजागृती करण्यासाठी मार्गदर्शनपर शिबिरे यासोबतच वाहन चालकांचे आरोग्य तपासणी,नेत्र तपासणी,रक्तदान शिबीरे वाहनांना रिफ्लेक्टर लावणे, तथा विविध शाळा, महाविद्यालयांत रस्ते सुरक्षेपर निबंध स्पर्धा आदी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे ते म्हणाले,पुढे बोलताना ते म्हणाले की, अपघातात दर १७ मिनिटाला एक व्यक्ती मॄत्यूमुखी पडतो,ही मोठी खेदाची बाब आहे, मा.सुप्रिम कोर्टाच्या आदेशान्वये देशात ५०टक्के अपघात कमी करण्यासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना सुरू आहे, आपण वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास ७० टक्के अपघात हे टाळले जाऊ शकतात, याकरीता या अभियानात विविध शाळा, महाविद्यालय आणि श्रीरामपूर आरटीओ कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने महावॉकेथॉन रॅलीचे आयोजन देखील करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले, यासोबतच जर कोणी वाहतूक नियम मोडताना आढळुन आल्यास त्यावर योग्य कारवाई करत गांधीगीरीच्या माध्यमातून त्यास पुष्पगुच्छ देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले तसेच आपल्या देशात उत्तर प्रदेश, तामिळनाडू,आणि महाराष्ट्र या राज्यांत अपघातांची संख्या अधिक प्रमाणात आहे, यावर नियंत्रण मिळविण्यासाठी वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करुन वाहने चालविणे हाच वाढत्या अपघातांवर नियंत्रण मिळविण्याचा खरा उपाय असल्याचेही ते म्हणाले,
यावेळी दैनिक जयबाबाचे अॅड.कैलास आगे म्हणाले की, हल्ली अपघातांची संख्या ही इतक्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे की रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मोहिमच हाती घ्यावी असे वाटू लागले आहे, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दररोज निर्पराधांचे हकनाक बळी जात आहेत,यावर ठोस उपाययोजनांची नितांत गरज असल्याचे ते म्हणाले,
यावेळी श्री.प्रकाश कुलथे म्हणाले की, राज्यातील इतर आरटीओ कार्यालयांपेक्षा श्रीरामपूरचे आरटीओ कार्यालय खरोखरच खुप चांगलं आहे ही केवळ स्तूती नव्हेतर वास्तविक्ता आहे, या कार्यालयात वरीष्ठ अधिकाऱ्यांचं योग्य नियंत्रण आणि कनिष्ठ अधिकारी/कर्मचाऱ्यांचं शिस्तपालन मोठं कमालीचं आहे, इतर आरटीओ कार्यालयात केवळ रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त वर्षांतून सात दिवस वाहतूकीच्या नियमांना उजाळणी मिळते मात्र राज्यात श्रीरामपुरचचं एक आरटीओ कार्यालय असं आहे जिथं आरटीओ अधिकाऱ्यांकरवी वर्षाच्या बाराही महिने रस्ता सुरक्षा सप्ताह असल्यासारखे वाटते,वाहन चालविण्याचे लायसन मिळविण्यासाठी अनेक नागरीक या आरटीओ कार्यालयात येतात, त्यांना वाहतूकीच्या नियमांचे मार्गदर्शन करताना रोजच आरटीओ अधिकाऱी दॄषष्टिपथास पडतात म्हणून असा भास होतो की, रस्ता सुरक्षा सप्ताह तर चालु झाला नव्हेना ?,असे या कार्यालयातील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची कामे खरोखरच स्तूतीस पात्र ठरत असल्याचे ते म्हणाले,
पुढे बोलताना ते म्हणाले की, रस्ता सुरक्षा सप्ताह केवळ सात दिवसांचा असला तरी प्रत्येकाने तो वर्षेभर अंगीकारावा यासोबतच वाहतूक नियमांचे पालन करुनच आपापली वाहने चालवावी,कुठलेही नशा पाणी न करता अपघातमुक्त वाहने चालविल्यास खऱ्या अर्थाने रस्ता सुरक्षा अभियानाचे महत्व सफल ठरेल असेही ते म्हणाले,
यावेळी बोलताना श्री.बाळासाहेब भांड म्हणाले की, केवळ रस्ता सुरक्षा सप्ताह आहे म्हणून वाहतूकीचे नियम पाळायाची आणि वर्षभर मात्र वाहतूकीचे नियम मोडायाची असे न करता वर्षभर वाहतूकीचे नियम पाळूनच वाहने चालविल्यास बहूतांशीअपघातांवर आपण नक्कीच नियंत्रण मिळवू शकू कसेही ते म्हणाले,
यावेळी श्री.सुनिल मुथा म्हणाले की, श्रीरामपूर आरटीओ कार्यालयाचे प्रमुख श्री.खान यांची कामे अत्यंत चांगली असल्याने तक्रारीचं कारणचं उरत नाही,मात्र कायदा राबविताना माणूसकीच्या भावनेतून कायदा राबविल्यास वाहन चालकांना मोठा दिलासा मिळेल, कारण सध्या वाहन चालक/मालक मोठ्या संकटाचा सामना करत हा व्यावसाय करत आहे, एस.टी.बस भाड्यापेक्षा कमी दरात प्रवाशांकडून भाडे आकारणी केली जात आहे म्हणून आरटीओ अधिकाऱी/कर्मचार्ऱ्यांनी देखील त्यांच्या समस्यांना योग्यरित्या समजून घ्याव्यात असेही ते म्हणाले,
निशिकांत दोंदे यांच्या श्रीसाईलिला वॄतवाहिनीने या कार्यक्रमाचे सुरेख असे लाईव्ह टेलिकास्ट केले,
यावेळी मान्यवरांच्या हस्ते रस्ते सुरक्षेपर परीपत्रकांचे प्रकाशन करण्यात आले, यासोबतच उपस्थितांना रस्ते सुरक्षेपर प्रतिज्ञाही देण्यात आली.
सहायक मोटार वाहन निरीक्षक धिरजकूमार भामरे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश डगळे यांनी आभार मानले,
या कार्यक्रमास आरटीओ कर्मचारी अभिजित कुऱ्हाडे, निशिकांत दोंदे, श्रीकांत शिंदे,सारंग पाटील, रावसाहेब शिंदे,भरत गुणावत, अभिजित जाधव, राजेंद्र गरड,अंकूश शेंडे,श्री.निंबाळकर मेजर,श्री.गावडे श्री.शिलावट,आनंद ओहोळ, युटीएल कर्मचारी अतिक शेख, मंगेश, प्रदिप नरवडे,विजय पाठक, भाऊसाहेब साळवे,गणेश सरोदे यांच्यासह वाहन चालक/मालक,टॢक चालक/मालक संघ/ टॅक्सी युनियन /रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत वाहन चालक/मालकांचे प्रतिनिधी, पत्रकार आणि समस्त नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिनांक 11 ते 17 जानेवारी 2020 दरम्यान राबविण्यात येत असलेल्या या रस्ते सुरक्षा अभियानात रस्ते सुरक्षेपर विविध उपक्रम राबविले जाणार आहेत यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहनही श्रीरामपूर आरटीओ कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
Post a Comment