शिर्डी नगरपंचायतीचे मुख्यलिपिक यांना राज्य माहिती आयुक्तांनी दंड का करू नये अशी पाठवली नोटीस
शिर्डी नगरपंचायत मध्ये कायम चर्चेत असणार आण्टिकरप्शन फेम मुरलीधर देसले यांना राज्य माहिती आयुक्त यांनी तब्बल चार लाख पंचवीस हजार दंड का करण्यात येऊ नये बाबत नोटीस पाठवली असल्याने माहिती अधिकार कायद्याला न जुमान्नार्याचे धाबे दणावलेले आहेत शिर्डी येथील माहितीअधिकारचे कार्यकर्ता व वकील अविनाश शेजवळ यांनी शिर्डीत झालेल्या 2016 निवडणुकीत रातोरात झालेल्या मतदार आदला बदल बाबत माहिती अधिकारात माहिती मागितली होती शिर्डी नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणूक 2016 मध्ये वार्ड क्रमांक 1 ते 17 मध्ये मतदार अदला बदलची महिती 19/8/2017 ला माहिती अधिकारात अंतिम यादी अचानक पणे रातोरात मतदार कमी जास्त झाल्याचा शंका आल्याने मागवली असता माहिती अधिकारी यांनी माहिती देण्यास जाणूनबुजून टाळाटाळ केली होती तेव्हा 16/2/2017 ला ऐकून 16 अपील करण्यात आले अपीलीय अधिकारी यांनी माहिती द्यावी असा आदेश असतांना देखील अपीलातही माहिती न मिळाल्याने राज्य माहिती आयुक्तांना दुत्तीय अपील करण्यात आले राज्य माहिती अधिकार आयुक्तांनी वकील अविनाश शेजवळ यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून मुख्यलिपिक देसले यांना तब्बल चार लाख पंचवीस हजार रुपए दंड का करण्यात येऊ नये असे माहिती आयुक्तांनी देसले यांना नोटीस पाठवल्यानें अनेक अधिकाऱ्यांचे धाबे दणावलेले आहेत