श्री साईबाबा संस्‍थान शिर्डी महोत्‍सव कालावधीत सुमारे ८.२३ लाख साईभक्‍तांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले तर याकालावधीत सुमारे १७.४२ कोटी रुपये देणगी प्राप्‍त.-दीपक मुगळीकर.

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागतानिमित्‍त आयोजित करण्‍यात आलेल्‍या शिर्डी महोत्‍सवाच्‍या दिनांक २३ डिसेंबर २०१९ ते दिनांक ०२ जानेवारी २०२० याकालावधीत सुमारे ८.२३ लाख साईभक्‍तांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले तर याकालावधीत सुमारे १७.४२ कोटी रुपये देणगी प्राप्‍त झाली असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.

श्री.मुगळीकर म्‍हणाले, नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागतानिमित्‍त दिनांक २३ डिसेंबर २०१९ ते दिनांक ०२ जानेवारी २०२० याकाळात आयोजित करण्‍यात आलेल्‍या शिर्डी महोत्‍सवाच्‍या कालावधीत दानपेटीतून ९,५४,९९,६७०/- रुपये, देणगी काउंटरव्‍दारे ३,४६,९३,०९१/- रुपये, डेबीट क्रेडीट कार्डव्‍दारे १,३८,२७,४६४/- रुपये, ऑनलाईन देणगीव्‍दारे ७३,२९,५९०/- रुपये, चेक/डिडीव्‍दारे १,५०,८६,१९९/- रुपये, मनी ऑडरव्‍दारे ४,६४,५९२/- रुपये व परदेशी चलनाव्‍दारे २४,३६,४६३/- रुपये अशी एकुण १६,९३,३७,३७०६९/- रुपये देणगी रक्‍कम स्‍वरुपात प्राप्‍त झालेली आहे. तसेच सोने १२१३.६८० ग्रॅम (रुपये ४२,३,५२२/-) व चांदी १७२२३ ग्रॅम (रुपये ५,८०,७६४/-) देणगी प्राप्‍त झालेली आहे.

याशिवाय याकाळात शिर्डी महोत्‍सवाच्‍या कालावधीत ०८ लाख २३ हजार ३७९ साईभक्‍तांनी साईदर्शनाचा लाभ घेतला. यामध्‍ये टाइम बेस (बायोमेट्रीक), जनसंपर्क कार्यालय व ऑनलाईन या सेवांचा समावेश असून ऑनलाईन व सशुल्‍क दर्शन/आरती पासेसव्‍दारे ४,०८,६९,४००/- रुपये प्राप्‍त झालेले आहे. तसेच याकालावधीत श्री साईप्रसादालयात ८,११,५८६ साईभक्‍तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला व १,४७,१०२ साईभक्‍तांनी अन्‍नपाकीटांचा लाभ घेतला. याबरोबरच ७,०८,७९४ लाडु प्रसाद पाकीटांची विक्री करण्‍यात आली असून याव्‍दारे १,७७,१९,८५०/- रुपये प्राप्‍त झाले आहे. तर ८,९७,००० मोफत बुंदी प्रसाद पाकीटांचे दर्शनरांगेतून साईभक्‍तांना वाटप करण्‍यात आले.तसेच याकालावधीत साईआश्रम भक्‍तनिवास, व्‍दारावती भक्‍तनिवास, साईधर्मशाळा, श्री साईबाबा भक्‍तनिवास्‍थान (५०० रुम) व साईप्रसाद निवास आदी निवास्‍थानांव्‍दारे १,७१,८५५ साईभक्‍तांची निवासाची व्‍यवस्‍था करण्‍यात आली. तर अतिरिक्‍त निवास व्‍यवस्‍थेसाठी उभारण्‍यात आलेल्‍या मंडपात २८,०९५ अशी एकुण १,९९,९५० साईभक्‍तांची निवासाची व्‍यवस्‍था करण्‍यात आलेली होती असे श्री.मुगळीकर यांनी सांगितले.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget