रोख पैसे न देता बनावट धनादेश देऊन ८ ते ९ व्यापार्‍यांना सुमारे २७ लाख रुपयांना गंडा,पोलिसांत गुन्हा दाखल.

नाशिकरोड । प्रतिनिधी-सोन्याचे दागिने तसेच विविध प्रकारच्या वस्तू खरेदी करून रोख पैसे न देता बनावट धनादेश देऊन ८ ते ९ व्यापार्‍यांना सुमारे २७ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी उपनगर पोलिसांत संबंधितांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण दत्तात्रय उदावंत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे टागोरनगर येथे ईश्वर ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. आपल्या परिचयातील महावीर एन्टरप्रायजेस सर्व्हिसचे मालक यशवंत मोरे हे संजय माहेश्वरी नावाच्या इसमाला माझ्याकडे घेऊन आले. त्यांना ३ लाख ७ हजार रुपयांचे सोने खरेदीची मागणी केली. ही रक्कम सोने खरेदीच्या वेळी देण्याचे त्यांनी सांगितले. ठरल्याप्रमाणे दि. २८ डिसेंबर रोजी संजय माहेश्वरी व मोरे हे आपल्या दुकानात आले व त्यांनी वरील रकमेचे सोने खरेदी केली.या बदल्यात रोख रकमेऐवजी त्यांनी धनादेश दिला. त्यानंतर दि. ३० डिसेंबर रोजी मोरे पुन्हा दुकानात आले व त्यांनी सांगितले की, सोने खरेदीचे पैसे ३१ रोजी देतो. धनादेश बँकेत जमा करू नका. सर्व रक्कम रोख देण्यात येतील, असे सांगितले. त्यानंतर माहेश्वरी यांना फोन केला असता तो बंद असल्याचे निदर्शनास आले.दरम्यान वसंत मोरे यांच्या दुकानात अनेक व्यक्ती आल्या व त्यांनी महावीर एन्टरप्रायजेसच्या मालकाने आमच्याकडून विविध प्रकारचे साहित्य खरेदी करून आम्हाला बनावट धनादेश दिले.त्यामुळे आमची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. माहेश्वरी यांनी अनेक व्यापार्‍यांकडून साहित्य खरेदी करून सुमारे २७ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. पुढील तपास वपोनि सुनील लोहकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि जी.एन. जाधव हे करीत आहेत.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget