Latest Post

शिर्डी नगरपंचायत मध्ये कायम चर्चेत असणार आण्टिकरप्शन फेम मुरलीधर देसले यांना राज्य माहिती आयुक्त यांनी तब्बल चार लाख पंचवीस हजार दंड का करण्यात येऊ नये  बाबत नोटीस पाठवली असल्याने माहिती अधिकार कायद्याला न जुमान्नार्याचे धाबे दणावलेले आहेत  शिर्डी येथील माहितीअधिकारचे कार्यकर्ता व वकील अविनाश शेजवळ यांनी शिर्डीत झालेल्या 2016 निवडणुकीत रातोरात झालेल्या मतदार आदला बदल बाबत माहिती अधिकारात माहिती मागितली होती     शिर्डी नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणूक 2016 मध्ये वार्ड क्रमांक 1 ते 17 मध्ये मतदार अदला बदलची महिती 19/8/2017 ला माहिती अधिकारात अंतिम यादी अचानक पणे रातोरात मतदार कमी जास्त झाल्याचा शंका आल्याने मागवली असता माहिती अधिकारी यांनी माहिती देण्यास जाणूनबुजून टाळाटाळ केली होती तेव्हा 16/2/2017 ला ऐकून 16 अपील करण्यात आले अपीलीय अधिकारी यांनी माहिती द्यावी असा आदेश असतांना देखील अपीलातही माहिती न मिळाल्याने राज्य माहिती आयुक्तांना दुत्तीय अपील करण्यात आले राज्य माहिती अधिकार आयुक्तांनी वकील अविनाश शेजवळ यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून मुख्यलिपिक देसले यांना तब्बल चार लाख पंचवीस हजार रुपए दंड का करण्यात येऊ नये असे माहिती आयुक्तांनी देसले यांना नोटीस पाठवल्यानें अनेक अधिकाऱ्यांचे धाबे दणावलेले आहेत

बक्तरपूर (वार्ताहर) :- पत्रकार दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या अकरा व्यक्तीना  जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कार जाहीर करण्यात आले.पत्रकार दिनी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी दिली.

 दि.६ जानेवारी हा बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस.या दिवशी राज्यभर पत्रकार दिन साजरा करण्यात येतो या दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्यावतीने सामाजिक,शैक्षणिक,पत्रकारिता,धार्मिक, प्रशासकीय, हस्तकला,राजकीय, प्रगतशील शेतकरी अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीना जिल्हास्तरीय आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते.त्याची निवड समितीने छाननी करून पुरस्कार कर्त्यांचे नाव जाहीर करण्यात आले.

सामाजिक - मनिषा मच्छिंद्र लहारे ( केडगाव, अहमदनर ), दिव्यांग चोंद कादर शेख ( पिंगेवाडी ),शैक्षणिक शिक्षक सविता विठ्ठलराव साळुंके ( गोंडेगाव,श्रीरामपूर ), शिक्षकेत्तर सुनिता एकनाथ पालवे ( पाथर्डि),पत्रकारिता- साईप्रसाद प्रमोद कुंभकर्ण ( कोल्हार, राहाता),धार्मिक - माऊली महाराज मोरे ( ब्राम्हणी, राहुरी ),समाजप्रबोधन - महंत बाबागिरी महाराज (श्री क्षेत्र काशी केदारेश्वर संस्थान नागलवाडी ),प्रशासकीय - भैय्यालाल टेकाम ( प्रसारण मंत्रालय भारत सरकार,आकाशवाणी अ.नगर ),हस्तकला - अशोक महादेव तरसे ( शेवगाव ),राजकीय -  दादासाहेब लक्ष्मण दळवी (भातकुडगाव ),प्रगतशील शेतकरी - रोहिदास लक्ष्मण ईसारवाडे ( जोहरापुर ) यांना जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पुरस्कारानी सन्मानित करणारांची नावे गुरुवारी ( दि.२ ) जाहीर करण्यात आले.दि.६ जानेवारीला ढोरजळगाव ( ता. शेवगाव )  येथील श्रीराम विद्यालयाच्या भव्य प्रांगणात पुरस्कार वितरण व पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान करण्यात येणार आहे.या समारंभाचे अध्यक्षस्थान शिवाजीराव काकडे भूषविणार आहेत. बक्षीस वितरण जि.प.अध्यक्षा नामदार राजश्री घुले, सदस्या हर्षदाताई  काकडे, प्रांताधिकारी देवदत्त केकान,पोलिस उपाधीक्षक मंदार जावळे याच्या हस्ते करण्यात येणार आहे.यावेळी जेष्ठ नेते दिलीपराव लांडे, शिवसेना नेता रामदास गोल्हार, तहसिलदार विनोद भामरे,पोलीस निरीक्षक रामराव ढीकले, शिवशाहीर कल्याण महाराज  काळे,भारुड सम्राट हमीद सय्यद,उद्धवराव सोनवणे,सुनिल दानवे,याच्यासह परिसरातील विविध संस्थेचे पदाधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.तरी पुरस्कार जाहीर झालेल्या व्यक्तींनी व तालुक्यातील पत्रकारांनी मोठ्या संख्खेने उपस्थित रहावे असे आवाहन अ.भा.ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव, उपाध्यक्ष सुधीर चव्हाण, सरचिटणीस शंकर मरकड, कार्याध्यक्ष दिपक खोसे, संपर्क प्रमुख भाऊ कदम, तालुका अध्यक्ष उध्दव देशमुख, इसाक शेख, रमेश खैरे,सलीम शेख,ईश्वर वाघमारे, संजय सुपेकर, रामनाथ रूईकर,राजेंद्र मराठे, किरण तहकिक,संजय भालेकर, सोपान जाधव,शिवाजी खरड, अशोक वाघ,सुनिल रनमले,गणेश शिंदे,बाळासाहेब वाघ यांनी केले आहे.

नाशिकरोड । प्रतिनिधी-सोन्याचे दागिने तसेच विविध प्रकारच्या वस्तू खरेदी करून रोख पैसे न देता बनावट धनादेश देऊन ८ ते ९ व्यापार्‍यांना सुमारे २७ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी उपनगर पोलिसांत संबंधितांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण दत्तात्रय उदावंत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे टागोरनगर येथे ईश्वर ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. आपल्या परिचयातील महावीर एन्टरप्रायजेस सर्व्हिसचे मालक यशवंत मोरे हे संजय माहेश्वरी नावाच्या इसमाला माझ्याकडे घेऊन आले. त्यांना ३ लाख ७ हजार रुपयांचे सोने खरेदीची मागणी केली. ही रक्कम सोने खरेदीच्या वेळी देण्याचे त्यांनी सांगितले. ठरल्याप्रमाणे दि. २८ डिसेंबर रोजी संजय माहेश्वरी व मोरे हे आपल्या दुकानात आले व त्यांनी वरील रकमेचे सोने खरेदी केली.या बदल्यात रोख रकमेऐवजी त्यांनी धनादेश दिला. त्यानंतर दि. ३० डिसेंबर रोजी मोरे पुन्हा दुकानात आले व त्यांनी सांगितले की, सोने खरेदीचे पैसे ३१ रोजी देतो. धनादेश बँकेत जमा करू नका. सर्व रक्कम रोख देण्यात येतील, असे सांगितले. त्यानंतर माहेश्वरी यांना फोन केला असता तो बंद असल्याचे निदर्शनास आले.दरम्यान वसंत मोरे यांच्या दुकानात अनेक व्यक्ती आल्या व त्यांनी महावीर एन्टरप्रायजेसच्या मालकाने आमच्याकडून विविध प्रकारचे साहित्य खरेदी करून आम्हाला बनावट धनादेश दिले.त्यामुळे आमची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. माहेश्वरी यांनी अनेक व्यापार्‍यांकडून साहित्य खरेदी करून सुमारे २७ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. पुढील तपास वपोनि सुनील लोहकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि जी.एन. जाधव हे करीत आहेत.

भोकर (वार्ताहर) श्रीरामपूर तालुक्यातील खोकर येथील गोरक्षनाथ मठाचे मठाधिपती भागवताचार्य सेवानाथ महाराज यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करून ‘तुझ्या मालकीची खोली फिर्यादीला दे नाही तर तीन लाख रुपये दे अन्यथा आणखी विनयभंगाचा गुन्हा दाखल करू’ असे धमकावण्याचा प्रकार आळंदी येथे घडला. याप्रकरणी आळंदी येथील चौघांविरुद्ध आळंदी पोलिसांत दमदाटी केल्याचा व खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गोरख महाराज आहेर यांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अन्य तिघांचा शोध सुरू आहे.खोकर येथील श्रीक्षेत्र गोरक्षनाथ मठाचे मठाधिपती म्हणून सेवेत असलेले भागवताचार्य सेवानाथ महाराज यांचे आध्यात्मीक शिक्षण आळंदी येथील जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत झाले. त्यानंतर ते सहा वर्षे भंडारा डोंगरावर एकांतात राहिले. नंतर तेथून आल्यानंतर भजन, किर्तन व प्रवचन अशी अध्यात्मीक सेवा सुरू झाली. त्यातून त्यांनी आळंदी जवळील केळगाव येथे एका जोडीदारासोबत एक गुंठा जागा घेतली. त्यावर बांधकाम केले. पण काही वर्षानंतर खोकर येथील चौरंगीनाथ महाराज यांचे देहावसान झाले. त्यानंतर तुकाराम महाराज बोडखे यांचे नामकरण वै. चौरंगीनाथ महाराज यांचे उत्तराधिकारी म्हणून सेवानाथ महाराज असे नामकरण झाले तेव्हापासून महाराजांचे वास्तव्य खोकर येथे आहे.या दरम्यान त्यांचे खोलीत काही दिवस त्यांचे बंधु सोमनाथ यांचे वास्तव्य होते. परंतु शेजार्‍यांच्या त्रासाला कटाळून ते तेथून निघून आले आणि शेजार्‍यांना रान मोकळे झाले. त्यांनी महाराजांच्या खोलीत असलेले एक लाख रूपये किंमतीचे ग्रंथ, पाच पक्वाज, पाच होर्मोनियम व नित्य उपायोगाच्या वस्तू असे मिळून सुमारे तीन लाखांचा ऐवज लंपास करत खोलीचा ताबा घेतला. दरम्यानच्या काळात यातील एका महिलेने सेवानाथ महाराजांविरूद्ध दि.4 जुलै 2019 रोजी आळंदी पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्यांना धमकाविण्यास सुरूवात झाली.त्यानंतर दि.1 डिसेंबर रोजी सेवानाथ महाराज हे आळंदी येथे गेले असता तेथे यातील गोरख महाराज आहेर याने सर्वांसमक्ष ‘तुझ्या मालकीची रूम एका महिलेस देऊन टाक, तुला खोली द्यायची नसेल तर त्या बदल्यात आम्हाला तीन लाख रूपये देऊन टाक, मी त्या महिलेला तुझ्या विरूद्धची विनयभंगाची दाखल केलेली तक्रार मागे घेण्यास सांगतो’ असे म्हणाला.त्यावर महाराजांनी ‘मी त्या महिलेचा विनयभंग केला नसून न्यायालयात जो न्याय होईल तो मला मान्य असेल असे’ असे सुनावले. एकंदरीत ‘तुमची रूम द्या अन्यथा तीन लाख रूपये द्या’ आम्ही विनयभंगाचा गुन्हा मागे घेवू असे धमकावत महाराजांना खंडणी मागितली. याप्रकरणी आळंदी पोलिसात आळंदी येथील दोन महिला व अंबादास लक्ष्मण येल्हांडे व गोरख महाराज आहेर या चौघाविरूद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आळंदी पोलिसांत वरील चौघाविरूद्ध भादंवि कलम 448, 384, 506 व 34 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. वरील पैकी गोरख महाराज आहेर यास पोलिसांनी अटक केली असून त्यास न्यायालयात हजर केले असता त्यास एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक बापू जोंधळे करत आहेत.

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागतानिमित्‍त आयोजित करण्‍यात आलेल्‍या शिर्डी महोत्‍सवाच्‍या दिनांक २३ डिसेंबर २०१९ ते दिनांक ०२ जानेवारी २०२० याकालावधीत सुमारे ८.२३ लाख साईभक्‍तांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले तर याकालावधीत सुमारे १७.४२ कोटी रुपये देणगी प्राप्‍त झाली असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.

श्री.मुगळीकर म्‍हणाले, नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागतानिमित्‍त दिनांक २३ डिसेंबर २०१९ ते दिनांक ०२ जानेवारी २०२० याकाळात आयोजित करण्‍यात आलेल्‍या शिर्डी महोत्‍सवाच्‍या कालावधीत दानपेटीतून ९,५४,९९,६७०/- रुपये, देणगी काउंटरव्‍दारे ३,४६,९३,०९१/- रुपये, डेबीट क्रेडीट कार्डव्‍दारे १,३८,२७,४६४/- रुपये, ऑनलाईन देणगीव्‍दारे ७३,२९,५९०/- रुपये, चेक/डिडीव्‍दारे १,५०,८६,१९९/- रुपये, मनी ऑडरव्‍दारे ४,६४,५९२/- रुपये व परदेशी चलनाव्‍दारे २४,३६,४६३/- रुपये अशी एकुण १६,९३,३७,३७०६९/- रुपये देणगी रक्‍कम स्‍वरुपात प्राप्‍त झालेली आहे. तसेच सोने १२१३.६८० ग्रॅम (रुपये ४२,३,५२२/-) व चांदी १७२२३ ग्रॅम (रुपये ५,८०,७६४/-) देणगी प्राप्‍त झालेली आहे.

याशिवाय याकाळात शिर्डी महोत्‍सवाच्‍या कालावधीत ०८ लाख २३ हजार ३७९ साईभक्‍तांनी साईदर्शनाचा लाभ घेतला. यामध्‍ये टाइम बेस (बायोमेट्रीक), जनसंपर्क कार्यालय व ऑनलाईन या सेवांचा समावेश असून ऑनलाईन व सशुल्‍क दर्शन/आरती पासेसव्‍दारे ४,०८,६९,४००/- रुपये प्राप्‍त झालेले आहे. तसेच याकालावधीत श्री साईप्रसादालयात ८,११,५८६ साईभक्‍तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला व १,४७,१०२ साईभक्‍तांनी अन्‍नपाकीटांचा लाभ घेतला. याबरोबरच ७,०८,७९४ लाडु प्रसाद पाकीटांची विक्री करण्‍यात आली असून याव्‍दारे १,७७,१९,८५०/- रुपये प्राप्‍त झाले आहे. तर ८,९७,००० मोफत बुंदी प्रसाद पाकीटांचे दर्शनरांगेतून साईभक्‍तांना वाटप करण्‍यात आले.तसेच याकालावधीत साईआश्रम भक्‍तनिवास, व्‍दारावती भक्‍तनिवास, साईधर्मशाळा, श्री साईबाबा भक्‍तनिवास्‍थान (५०० रुम) व साईप्रसाद निवास आदी निवास्‍थानांव्‍दारे १,७१,८५५ साईभक्‍तांची निवासाची व्‍यवस्‍था करण्‍यात आली. तर अतिरिक्‍त निवास व्‍यवस्‍थेसाठी उभारण्‍यात आलेल्‍या मंडपात २८,०९५ अशी एकुण १,९९,९५० साईभक्‍तांची निवासाची व्‍यवस्‍था करण्‍यात आलेली होती असे श्री.मुगळीकर यांनी सांगितले.

बेलापूर  ( प्रतिनिधी )- क्रांती ज्योती  सावित्रीबाई फुले जयंती ठिकठिकाणी साजरी करण्यात आली बेलापूरच्या मुख्य चौकात विविध मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले सावता महाराज मंदिरातआशोक कारखान्याचे संचालक आभिषेक खंडागळे यांच्या हस्ते तर बेलापूर ग्रामपंचायतीच्या वतीने पत्रकार देविदास देसाई यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले बेलापूर विविध कार्यकारी संस्थेतही चेअरमन नाईक  वा व्हा चेअरमन सातभाई याच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले बेलापूर  मराठी शाळा बेलापूर मुलींची शाळा जि प उर्दू  शाळा महाविद्याल येथेही सावित्रीबाई जयंती साजरी करण्यात आली या वेळी जि प .सदस्य शरद नवले बाजार समितीचे संचालक सुधीर नवले खटोड पतसंस्थेचे चेअरमन उपसरपंच रविंद्र खटोड प्रकाश कुर्हे पत्रकार देविदास देसाई प्रा .ज्ञानेश गवले दिलीप दायमा   महेश कुर्हे  गोरख कुर्हे संजय शिरसाठ महाराज दादासाहेब कुताळ जालींदर कुर्हे प्रशांत लढ्ढा अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे महेश ओहोळ दत्ता कुर्हे आदित्य शेटे सोमनाथ शिरसाठ संदीप कुर्हे साईनाथ शिरसाठ वैभव कुर्हे बबलु कुर्हे.

बेलापूर  ( प्रतिनिधी  )- क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून कै .मुरलीधर खटोड पतसंस्थेच्या वतीने महीलांच्या हस्ते संस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन तसेच महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनाचे औचित्य साधुन बेलापूर पोलीस स्टेशनच्या पोलीसाचा सन्मान करण्यात आला  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ कल्याणी काळे  होत्या या वेळी समाजकार्य करणार्या महीलांचा पतसंस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला या वेळी बाजार समितीचे संचालक सुधीर नवले पत्रकार  देविदास देसाई  प्रा .गुंफा कोकाटे प्रा .ज्ञानेश गवले सौ कल्याणी काळे आदिंनी मनोगत व्यक्त केले या वेळी सौ अंजली खटोड निशा खटोड कृपा दायमा प्रिया चंगेडीया सरपंच राधाताई बोंबले सौ शिंदे नंदाताई पवार  लढ्ढा भाभी जिजाबाई घुले कौसाबाई जाधव शैलाबाई भांड सुशिला भगत नंदाताई पवार संगीता बाठीया हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक गणेश भिंगारदे  काँ पोपट भोईटे बाळासाहेब गुजाळ निखील तमनर पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड अँड सुभाष साळुंके विलासा मेहेत्रे बाजार समितीचे संचालक सुधीर नवले जाधव दिवाकर कोळसे अरविंद शहाणे शेखर डावरेअनिल डाकले गणेश लढ्ढा गोरख कुर्हे पप्पु कुलथे  दिलीप दायमा आदि उपस्थित  होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक   गणेश लढ्ढा यांनी केले सूत्रसंचलन अभिजीत राका यानी केले तर रविंद्र खटोड यांनी आभार मानले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget