Latest Post

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागतानिमित्‍त आयोजित करण्‍यात आलेल्‍या शिर्डी महोत्‍सवाच्‍या दिनांक २३ डिसेंबर २०१९ ते दिनांक ०२ जानेवारी २०२० याकालावधीत सुमारे ८.२३ लाख साईभक्‍तांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले तर याकालावधीत सुमारे १७.४२ कोटी रुपये देणगी प्राप्‍त झाली असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.

श्री.मुगळीकर म्‍हणाले, नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागतानिमित्‍त दिनांक २३ डिसेंबर २०१९ ते दिनांक ०२ जानेवारी २०२० याकाळात आयोजित करण्‍यात आलेल्‍या शिर्डी महोत्‍सवाच्‍या कालावधीत दानपेटीतून ९,५४,९९,६७०/- रुपये, देणगी काउंटरव्‍दारे ३,४६,९३,०९१/- रुपये, डेबीट क्रेडीट कार्डव्‍दारे १,३८,२७,४६४/- रुपये, ऑनलाईन देणगीव्‍दारे ७३,२९,५९०/- रुपये, चेक/डिडीव्‍दारे १,५०,८६,१९९/- रुपये, मनी ऑडरव्‍दारे ४,६४,५९२/- रुपये व परदेशी चलनाव्‍दारे २४,३६,४६३/- रुपये अशी एकुण १६,९३,३७,३७०६९/- रुपये देणगी रक्‍कम स्‍वरुपात प्राप्‍त झालेली आहे. तसेच सोने १२१३.६८० ग्रॅम (रुपये ४२,३,५२२/-) व चांदी १७२२३ ग्रॅम (रुपये ५,८०,७६४/-) देणगी प्राप्‍त झालेली आहे.

याशिवाय याकाळात शिर्डी महोत्‍सवाच्‍या कालावधीत ०८ लाख २३ हजार ३७९ साईभक्‍तांनी साईदर्शनाचा लाभ घेतला. यामध्‍ये टाइम बेस (बायोमेट्रीक), जनसंपर्क कार्यालय व ऑनलाईन या सेवांचा समावेश असून ऑनलाईन व सशुल्‍क दर्शन/आरती पासेसव्‍दारे ४,०८,६९,४००/- रुपये प्राप्‍त झालेले आहे. तसेच याकालावधीत श्री साईप्रसादालयात ८,११,५८६ साईभक्‍तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला व १,४७,१०२ साईभक्‍तांनी अन्‍नपाकीटांचा लाभ घेतला. याबरोबरच ७,०८,७९४ लाडु प्रसाद पाकीटांची विक्री करण्‍यात आली असून याव्‍दारे १,७७,१९,८५०/- रुपये प्राप्‍त झाले आहे. तर ८,९७,००० मोफत बुंदी प्रसाद पाकीटांचे दर्शनरांगेतून साईभक्‍तांना वाटप करण्‍यात आले.तसेच याकालावधीत साईआश्रम भक्‍तनिवास, व्‍दारावती भक्‍तनिवास, साईधर्मशाळा, श्री साईबाबा भक्‍तनिवास्‍थान (५०० रुम) व साईप्रसाद निवास आदी निवास्‍थानांव्‍दारे १,७१,८५५ साईभक्‍तांची निवासाची व्‍यवस्‍था करण्‍यात आली. तर अतिरिक्‍त निवास व्‍यवस्‍थेसाठी उभारण्‍यात आलेल्‍या मंडपात २८,०९५ अशी एकुण १,९९,९५० साईभक्‍तांची निवासाची व्‍यवस्‍था करण्‍यात आलेली होती असे श्री.मुगळीकर यांनी सांगितले.

बेलापूर  ( प्रतिनिधी )- क्रांती ज्योती  सावित्रीबाई फुले जयंती ठिकठिकाणी साजरी करण्यात आली बेलापूरच्या मुख्य चौकात विविध मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले सावता महाराज मंदिरातआशोक कारखान्याचे संचालक आभिषेक खंडागळे यांच्या हस्ते तर बेलापूर ग्रामपंचायतीच्या वतीने पत्रकार देविदास देसाई यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले बेलापूर विविध कार्यकारी संस्थेतही चेअरमन नाईक  वा व्हा चेअरमन सातभाई याच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले बेलापूर  मराठी शाळा बेलापूर मुलींची शाळा जि प उर्दू  शाळा महाविद्याल येथेही सावित्रीबाई जयंती साजरी करण्यात आली या वेळी जि प .सदस्य शरद नवले बाजार समितीचे संचालक सुधीर नवले खटोड पतसंस्थेचे चेअरमन उपसरपंच रविंद्र खटोड प्रकाश कुर्हे पत्रकार देविदास देसाई प्रा .ज्ञानेश गवले दिलीप दायमा   महेश कुर्हे  गोरख कुर्हे संजय शिरसाठ महाराज दादासाहेब कुताळ जालींदर कुर्हे प्रशांत लढ्ढा अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे महेश ओहोळ दत्ता कुर्हे आदित्य शेटे सोमनाथ शिरसाठ संदीप कुर्हे साईनाथ शिरसाठ वैभव कुर्हे बबलु कुर्हे.

बेलापूर  ( प्रतिनिधी  )- क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून कै .मुरलीधर खटोड पतसंस्थेच्या वतीने महीलांच्या हस्ते संस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन तसेच महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनाचे औचित्य साधुन बेलापूर पोलीस स्टेशनच्या पोलीसाचा सन्मान करण्यात आला  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ कल्याणी काळे  होत्या या वेळी समाजकार्य करणार्या महीलांचा पतसंस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला या वेळी बाजार समितीचे संचालक सुधीर नवले पत्रकार  देविदास देसाई  प्रा .गुंफा कोकाटे प्रा .ज्ञानेश गवले सौ कल्याणी काळे आदिंनी मनोगत व्यक्त केले या वेळी सौ अंजली खटोड निशा खटोड कृपा दायमा प्रिया चंगेडीया सरपंच राधाताई बोंबले सौ शिंदे नंदाताई पवार  लढ्ढा भाभी जिजाबाई घुले कौसाबाई जाधव शैलाबाई भांड सुशिला भगत नंदाताई पवार संगीता बाठीया हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक गणेश भिंगारदे  काँ पोपट भोईटे बाळासाहेब गुजाळ निखील तमनर पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड अँड सुभाष साळुंके विलासा मेहेत्रे बाजार समितीचे संचालक सुधीर नवले जाधव दिवाकर कोळसे अरविंद शहाणे शेखर डावरेअनिल डाकले गणेश लढ्ढा गोरख कुर्हे पप्पु कुलथे  दिलीप दायमा आदि उपस्थित  होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक   गणेश लढ्ढा यांनी केले सूत्रसंचलन अभिजीत राका यानी केले तर रविंद्र खटोड यांनी आभार मानले.

बेलापूर  (प्रतिनिधी )- गुन्हेगारीवर वचक व ग्रामस्थांना संरक्षण  देण्याचे काम पोलीस खाते अहोरात्र करत असुन सिमेवर जवान अन गावात पोलीस असल्यामुळेच आपण सुरक्षित आहोत असे मत अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे यांनी व्यक्त केले            पोलीस स्थापना दिनानिमित्त ग्रामस्थांच्या वतीने बेलापूर  पोलीसांचा सत्कार करण्यात आला त्या वेळी बोलताना खंडागळे म्हणाले की पोलीस अहोरात्र आपले काम चोख बजावतात त्याचे मनोधैर्य वाढविणे आपली जबाबदारी आहे बाजार समितीचे संचालक सुधीर नवले म्हणाले की पोलीसांच्या भरवशावर आपण बिनधास्त राहतो पोलीस आपला जिव धोक्यात घालुन आपले रक्षण करतात सण उत्सव विसरुन ऊन पावसात आपले कर्तव्य  बजावतात गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरणार्या खाकीला आपण सलामच केला पाहीजे या वेळी पत्रकार देविदास देसाई  यांनीही मनोगत व्यक्त केले  या वेळी हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक गणेश भिंगारदे पोलीस पोपट भोईटे निखील तमनर बाळासाहेब गुंजाळ आदिंचा सत्कार करण्यात आला या वेळी मनोज श्रीगोड अतिष देसर्डा महेश कुर्हे दिलीप दायमा तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रकाश कुर्हे वैभव कुर्हे सौरभ कापसे अभिषेक निर्मळ दादासाहेब कुताळ आदि उपस्थित  होतेस.

गळनिंब(प्रतिनिधी)श्रीरामपूर तालूक्यातील प्रवराकाठची आग्रगण्य समजली जाणारी गळनिंब विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी विष्णू भागवत चिंधे तर व्हा.चेअरमनपदी पंढरीनाथ भोसले यांची एकमताने निवड झाली.
  सहाय्यक निबंधक कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी जे.एस.पवार यांच्या उपस्थितीत झाली. चेअरमन पदाची सुचना मावळते चेअरमन नानासाहेब वडितके यांनी मांडली तर अनुमोदन मर्केट कमिटीचे मा.उपसभापती आण्णासाहेब शिंदे यांनी दिले व्हा.चेअरमनपदाची सुचना प्रवरा बॅंकेचे संचालक व संस्थेचे जेष्ठ संचालक बापूसाहेब दादा वडितके यांनी तर अनुमोदन अवडाजी शिंदे यांनी दिले.यावेळी नुतन पदाधिकार्‍यांसह निवडणूक निर्णय अधिकारी पवार यांचा सत्कार करण्यात आला.
  यावेळी केशव चिंधे,कैलास मारकड,तबाजी जाटे,प्रकाश जाटे,दत्तात्रय कडनोर,सौ.सुनिता कुदनर,ताराबाई शिंदे,आण्णासाहेब कडनोर,आदिनाथ वडितके,राजेंद्र गवळी,प्रा.बाळासाहेब वडितके,संजय कुदनर,शिवाजी शिंदे,संदिप जाटे,उपसरपंच दशरथ चिंधे,बापूसाहेब वडितके,सतिष आचपळे,पांडूरंग चिंधे,केरूनाना शिंदे,देवराम बाचकर,रंगनाथ बाचकर,भागवत कोर्‍हाळे,सुनिल शिंदे,संजय भोसले,संजय शिंदे,संदिप शेरमाळे,मच्छिंद्र खेमनर,बाबुराव चिंधे,दत्तु जाटे,संजय बाहूले,बंडू जर्‍हाड,विठ्ठल वडितके आदि उपस्थित होते.

बेलापूर  ( प्रतिनिधी  )- ग्रामपंचायतीच्या वतीने १४ व्या वित्त आयोगातुन व्यायामाचे साहित्य खरेदी केले असुन सहा महीन्यापासुन ते साहीत्य धुळ खात पडले आहे ते सेट कार्यन्वित करुन नागरिकांना व्यायामासाठी खुले करुन द्यावे अशी मागणी अशोक कारखान्याचे  संचालक अभिषेक  खंडागळे यांनी केली आहे. बेलापूर ग्रामपंचायतीला दिलेल्या निवेदनात खंडागळे यांनी पुढे म्हटले आहे की बेलापूर ग्रामपंचायतीची व्यायाम शाळा होती ती बंद करुन आज तेथे अंगणवाडी भरविली जात आहे त्यामुळे तरुणांना व्यायाम करण्यासाठी जागाच उपलब्ध  नाही असे असतानाही बेलापूर  ग्रामपंचायतीने ओपन जिमचे साडे तीन लाख रुपये खर्चाचे दोन सेटखरेदी केले काहींचा आग्रह होता की हे सेट गणपती गल्लीत बसवावे परंतु  ती जागा व्यापारी असोसिएशनची असल्याने व्यापाऱ्यांचा विरोध असल्याने सदर सेट इतरत्र बसविणे गरजेच आहे.  साडे तीन लाख रुपये खर्चाचे व्यायाम सेट धुळ खात पडुन आहे   ते नागरीकांंना व्यायामासाठी उपलब्ध करुन द्यावे १५ दिवसाच्या आत यावर कार्यवाही केली नाही तर आंदोलन केले जाईल असा ईशारा  खंडागळे यांनी दिला आहे

बुलडाणा- 1 जानेवारी
वृत्तसंकलन करण्याकरिता गेलेल्या एका युवा पत्रकाराला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या स्फोटक माफियावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करणार असल्याचे आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पत्रकारांच्या शिष्ठमंडळ दिले आहेत.
      बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील अग्रवाल फटाका नावाचा विस्फोटकचा गोडाऊन हे अवैध असल्याने तहसीलदार खामगाव यांचे पथक आज पोलिस कर्मचाऱ्यांसह अग्रवाल फाटा केंद्रला सील करण्याची कारवाई करत असताना चे वृत्तसंकलन करण्याकरिता गेलेले पत्रकार शिवाजी भोसले यांना सुनील अग्रवाल , संगीत अग्रवाल व त्यांच्या सहकाऱ्यांनी जीवे मारण्याची धमकी देत भोसले यांचा मोबाईल फोडण्यात आला,याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करुण कारवाई करण्यात यावी अशी मागणी मराठी पत्रकार संघ व टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन च्या वतीने माननीय जिल्हाधिकारी सुमन चंद्रा व जिल्हा पोलिस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांना दिलेल्या निवेदनात कण्यात आली तर आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे आश्वासन पोलीस अधीक्षक दिलीप पाटील यांनी दिले आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget