बेलापूर (प्रतिनिधी )- गुन्हेगारीवर वचक व ग्रामस्थांना संरक्षण देण्याचे काम पोलीस खाते अहोरात्र करत असुन सिमेवर जवान अन गावात पोलीस असल्यामुळेच आपण सुरक्षित आहोत असे मत अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे यांनी व्यक्त केले पोलीस स्थापना दिनानिमित्त ग्रामस्थांच्या वतीने बेलापूर पोलीसांचा सत्कार करण्यात आला त्या वेळी बोलताना खंडागळे म्हणाले की पोलीस अहोरात्र आपले काम चोख बजावतात त्याचे मनोधैर्य वाढविणे आपली जबाबदारी आहे बाजार समितीचे संचालक सुधीर नवले म्हणाले की पोलीसांच्या भरवशावर आपण बिनधास्त राहतो पोलीस आपला जिव धोक्यात घालुन आपले रक्षण करतात सण उत्सव विसरुन ऊन पावसात आपले कर्तव्य बजावतात गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरणार्या खाकीला आपण सलामच केला पाहीजे या वेळी पत्रकार देविदास देसाई यांनीही मनोगत व्यक्त केले या वेळी हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक गणेश भिंगारदे पोलीस पोपट भोईटे निखील तमनर बाळासाहेब गुंजाळ आदिंचा सत्कार करण्यात आला या वेळी मनोज श्रीगोड अतिष देसर्डा महेश कुर्हे दिलीप दायमा तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रकाश कुर्हे वैभव कुर्हे सौरभ कापसे अभिषेक निर्मळ दादासाहेब कुताळ आदि उपस्थित होतेस.
Post a Comment