बेलापूर ( प्रतिनिधी )- ग्रामपंचायतीच्या वतीने १४ व्या वित्त आयोगातुन व्यायामाचे साहित्य खरेदी केले असुन सहा महीन्यापासुन ते साहीत्य धुळ खात पडले आहे ते सेट कार्यन्वित करुन नागरिकांना व्यायामासाठी खुले करुन द्यावे अशी मागणी अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे यांनी केली आहे. बेलापूर ग्रामपंचायतीला दिलेल्या निवेदनात खंडागळे यांनी पुढे म्हटले आहे की बेलापूर ग्रामपंचायतीची व्यायाम शाळा होती ती बंद करुन आज तेथे अंगणवाडी भरविली जात आहे त्यामुळे तरुणांना व्यायाम करण्यासाठी जागाच उपलब्ध नाही असे असतानाही बेलापूर ग्रामपंचायतीने ओपन जिमचे साडे तीन लाख रुपये खर्चाचे दोन सेटखरेदी केले काहींचा आग्रह होता की हे सेट गणपती गल्लीत बसवावे परंतु ती जागा व्यापारी असोसिएशनची असल्याने व्यापाऱ्यांचा विरोध असल्याने सदर सेट इतरत्र बसविणे गरजेच आहे. साडे तीन लाख रुपये खर्चाचे व्यायाम सेट धुळ खात पडुन आहे ते नागरीकांंना व्यायामासाठी उपलब्ध करुन द्यावे १५ दिवसाच्या आत यावर कार्यवाही केली नाही तर आंदोलन केले जाईल असा ईशारा खंडागळे यांनी दिला आहे
Post a Comment