Latest Post

बेलापूर  (प्रतिनिधी )- गुन्हेगारीवर वचक व ग्रामस्थांना संरक्षण  देण्याचे काम पोलीस खाते अहोरात्र करत असुन सिमेवर जवान अन गावात पोलीस असल्यामुळेच आपण सुरक्षित आहोत असे मत अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे यांनी व्यक्त केले            पोलीस स्थापना दिनानिमित्त ग्रामस्थांच्या वतीने बेलापूर  पोलीसांचा सत्कार करण्यात आला त्या वेळी बोलताना खंडागळे म्हणाले की पोलीस अहोरात्र आपले काम चोख बजावतात त्याचे मनोधैर्य वाढविणे आपली जबाबदारी आहे बाजार समितीचे संचालक सुधीर नवले म्हणाले की पोलीसांच्या भरवशावर आपण बिनधास्त राहतो पोलीस आपला जिव धोक्यात घालुन आपले रक्षण करतात सण उत्सव विसरुन ऊन पावसात आपले कर्तव्य  बजावतात गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरणार्या खाकीला आपण सलामच केला पाहीजे या वेळी पत्रकार देविदास देसाई  यांनीही मनोगत व्यक्त केले  या वेळी हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक गणेश भिंगारदे पोलीस पोपट भोईटे निखील तमनर बाळासाहेब गुंजाळ आदिंचा सत्कार करण्यात आला या वेळी मनोज श्रीगोड अतिष देसर्डा महेश कुर्हे दिलीप दायमा तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रकाश कुर्हे वैभव कुर्हे सौरभ कापसे अभिषेक निर्मळ दादासाहेब कुताळ आदि उपस्थित  होतेस.

गळनिंब(प्रतिनिधी)श्रीरामपूर तालूक्यातील प्रवराकाठची आग्रगण्य समजली जाणारी गळनिंब विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी विष्णू भागवत चिंधे तर व्हा.चेअरमनपदी पंढरीनाथ भोसले यांची एकमताने निवड झाली.
  सहाय्यक निबंधक कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी जे.एस.पवार यांच्या उपस्थितीत झाली. चेअरमन पदाची सुचना मावळते चेअरमन नानासाहेब वडितके यांनी मांडली तर अनुमोदन मर्केट कमिटीचे मा.उपसभापती आण्णासाहेब शिंदे यांनी दिले व्हा.चेअरमनपदाची सुचना प्रवरा बॅंकेचे संचालक व संस्थेचे जेष्ठ संचालक बापूसाहेब दादा वडितके यांनी तर अनुमोदन अवडाजी शिंदे यांनी दिले.यावेळी नुतन पदाधिकार्‍यांसह निवडणूक निर्णय अधिकारी पवार यांचा सत्कार करण्यात आला.
  यावेळी केशव चिंधे,कैलास मारकड,तबाजी जाटे,प्रकाश जाटे,दत्तात्रय कडनोर,सौ.सुनिता कुदनर,ताराबाई शिंदे,आण्णासाहेब कडनोर,आदिनाथ वडितके,राजेंद्र गवळी,प्रा.बाळासाहेब वडितके,संजय कुदनर,शिवाजी शिंदे,संदिप जाटे,उपसरपंच दशरथ चिंधे,बापूसाहेब वडितके,सतिष आचपळे,पांडूरंग चिंधे,केरूनाना शिंदे,देवराम बाचकर,रंगनाथ बाचकर,भागवत कोर्‍हाळे,सुनिल शिंदे,संजय भोसले,संजय शिंदे,संदिप शेरमाळे,मच्छिंद्र खेमनर,बाबुराव चिंधे,दत्तु जाटे,संजय बाहूले,बंडू जर्‍हाड,विठ्ठल वडितके आदि उपस्थित होते.

बेलापूर  ( प्रतिनिधी  )- ग्रामपंचायतीच्या वतीने १४ व्या वित्त आयोगातुन व्यायामाचे साहित्य खरेदी केले असुन सहा महीन्यापासुन ते साहीत्य धुळ खात पडले आहे ते सेट कार्यन्वित करुन नागरिकांना व्यायामासाठी खुले करुन द्यावे अशी मागणी अशोक कारखान्याचे  संचालक अभिषेक  खंडागळे यांनी केली आहे. बेलापूर ग्रामपंचायतीला दिलेल्या निवेदनात खंडागळे यांनी पुढे म्हटले आहे की बेलापूर ग्रामपंचायतीची व्यायाम शाळा होती ती बंद करुन आज तेथे अंगणवाडी भरविली जात आहे त्यामुळे तरुणांना व्यायाम करण्यासाठी जागाच उपलब्ध  नाही असे असतानाही बेलापूर  ग्रामपंचायतीने ओपन जिमचे साडे तीन लाख रुपये खर्चाचे दोन सेटखरेदी केले काहींचा आग्रह होता की हे सेट गणपती गल्लीत बसवावे परंतु  ती जागा व्यापारी असोसिएशनची असल्याने व्यापाऱ्यांचा विरोध असल्याने सदर सेट इतरत्र बसविणे गरजेच आहे.  साडे तीन लाख रुपये खर्चाचे व्यायाम सेट धुळ खात पडुन आहे   ते नागरीकांंना व्यायामासाठी उपलब्ध करुन द्यावे १५ दिवसाच्या आत यावर कार्यवाही केली नाही तर आंदोलन केले जाईल असा ईशारा  खंडागळे यांनी दिला आहे

बुलडाणा- 1 जानेवारी
वृत्तसंकलन करण्याकरिता गेलेल्या एका युवा पत्रकाराला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या स्फोटक माफियावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करणार असल्याचे आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पत्रकारांच्या शिष्ठमंडळ दिले आहेत.
      बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील अग्रवाल फटाका नावाचा विस्फोटकचा गोडाऊन हे अवैध असल्याने तहसीलदार खामगाव यांचे पथक आज पोलिस कर्मचाऱ्यांसह अग्रवाल फाटा केंद्रला सील करण्याची कारवाई करत असताना चे वृत्तसंकलन करण्याकरिता गेलेले पत्रकार शिवाजी भोसले यांना सुनील अग्रवाल , संगीत अग्रवाल व त्यांच्या सहकाऱ्यांनी जीवे मारण्याची धमकी देत भोसले यांचा मोबाईल फोडण्यात आला,याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करुण कारवाई करण्यात यावी अशी मागणी मराठी पत्रकार संघ व टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन च्या वतीने माननीय जिल्हाधिकारी सुमन चंद्रा व जिल्हा पोलिस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांना दिलेल्या निवेदनात कण्यात आली तर आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे आश्वासन पोलीस अधीक्षक दिलीप पाटील यांनी दिले आहे.

     
श्रीरामपूर/प्रतिनिधी
जीवनात ही घडी अशीच राहू दे मैत्रीच्या या फुलांवरी वसंत नाचू दे असाच काहीसा अनुभव श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटी हायस्कुल च्या 1996 इयत्ता 10 वि च्या बॅच च्या मैत्री मेळाव्यायातू न अनुभवयास मिळाला.शाळेच्या त्या दिवसांच्या आठवणी कटू गोड यांना उजाळा देताना प्रत्येकालाच पुन्हा एकदा शाळेत असल्याचा आनंद मिळाला .मित्र मैत्रिणी नि एकत्र येऊन आपले 22 वर्ष पुन्हा मागे वळून बघितले आणि भविष्याचा वेध घेणारा वर्तमानकाळ एकमेकांशी वाटलं .वेगवेगळ्या क्षेत्रात असताना देखील भविष्यात या मैत्रीच्या रेशीमगाठी टिकवण्यासाठी आणाभाका घेतल्या .आपआपल्या जीवनात घडलेल्या सुखाच्या काही दुःखाच्या क्षणांना वाटून मन मोकळे केले .
 एक उनाड दिवस भोजनाचा आस्वाद घेऊन घालवला
या कार्यक्रमाचे नियोजन कल्पना वाघ ,रवींद्र वाघ ,मनोहर लबडे ,नितीन लबडे,समीर शेख यांनी अतिशय सुरेख असे केले.व सर्वानाच मैत्रीचा हा कट्टा नव्याने जगण्याची ही उमेद देऊन गेला.

अहमदनगर (प्रतिनिधी)  शहरातून जाणारे अवजड वाहने, चारचाकी, दुचाकीविरोधात वर्षांच्या शेवटच्या दिवशी शहर वाहतूक शाखेने तपासणी मोहिम राबविली. मंगळवारी (दि. 31) रात्री बारा वाजेपर्यंत शहरातील विविध भागात राबविलेल्या या मोहिमेत पोलिसांनी अडीचशे वाहन चालकांवर कारवाई करत 95 हजार रुपयांचा दंड वसूल केला.शहरातील पत्रकार चौक, एसपी ऑफिस चौक, जीपीओ चौक, मार्केट यार्ड चौक, चांदणी चौक, जुने बसस्थानक, पुणे रोड, यांच्यासह शहरातील महत्वाच्या मार्गावरील केडगाव, शेंडी, विळद, वाळुंज बायपासवर वाहनचालकांना रोखून त्यांच्यावर शहर वाहतूक पोलिसांनी मंगळवारी दिवसभर कारवाई केली. त्यात मोटारसायकलवरील हेल्मेट नसणे, ट्रिपल सीट, लायसन्स नसणे, नंबरप्लेट नसलेल्या तसेच, अल्पवयीन विद्यार्थी अशा 100 दुचाकी वाहनांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईत 62 हजार 900 रूपयांचा दंड वसूल केला.अवजड वाहने, चारचाकी वाहनामध्ये प्रवास करताना सिल्टबेल्ट न लावणे, काळ्या काचा असणे, कागदपत्रे नसणे अशा 151 चारचाकी वाहनांवर कारवाई करत 32 हजार 300 रूपयाचा दंड वसूल केला आहे. वर्षांचा शेवटचा दिवस असल्याने शहर वाहतूक शाखेकडून पोलीस निरीक्षक अविनाश मोरे यांच्या नेतृत्वाखाली वाहनावर कारवाईची मोहिम राबविली होती. यासाठी शहर वाहतूक शाखेचे 25 ते 30 कर्मचारी व 20 होमगार्ड शहरातील विविध चौकात दिवसभर व रात्री बारा पर्यंत कारवाई करण्यात आली.

माजी विद्यार्थी सस्नेह मेळाव्यात वयोवृद्द शिक्षकांचा कॅटवॉक.. विद्यार्था बरोबर शिक्षकांनी केला आनंकव्यक्त

२५ वर्षांनतर वाजली शाळेची घंटा...छडी नको म्हणून माजी विद्यार्थी धावले वर्गाकडे..सस्नेह मेळाव्याचे अनोखे आयोजन
 शाळेतील आठवणींना उजाळा देत साईनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील १९९४ सालच्या दहावी वर्गाचा सस्नेह मेळावा अगदी उत्साहात पार पडला. तब्बल २५ वर्षानंतर शभंरहुन आधिक विद्यार्थी आणि २६ शिक्षक या अभुतपुर्व सोहळ्यासाठी उपस्थीत होते.दहावी पर्यंत शाळेचे दिवस संपल्याने प्रत्येकाने आपआपल्या करिअरसाठी आणि पुढील प्रवासासाठी वेगवेगळ्या क्षेत्राकडे धाव घेतली.. मात्र, ज्या शाळेमध्ये आपण शिकलो, लहानाचे मोठे झालो, मैत्री कशाला म्हणतात हे शिकलो तसेच ज्या शिक्षकांनी ज्ञानेची गंगा बहाल करत विद्यार्थी घडवले त्या सर्व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी १९९३-९४ सालचे विद्यार्थी एकत्र आले.
रविवारी या सोहळा साईनाथ विद्यालयातील भव्य स्टेजवर आयोजीत करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष तत्कालीन मुख्यध्यापक अभिमन्यू चव्हाण हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षक शांताराम मिराणे, हभप गोंदकरसर, रसाळताई ह्या होत्या. कार्यक्रमाला २६ शिक्षकांची उपस्थीती लाभली. यात तिडकेसर, रसाळसर,शेज्वळसर,राऊतसर,ढमढेरेसर, निकमसर,त्र्यंबकेसर, देशपांडेताई, चव्हाणताई, शहाणेताई, विद्यामान मुख्याध्यापक मुठाळसर,बेलदारसर,डुबलसर, कदमसर, त्याच बरोबर शाळेतील त्याकाळचे शिपाई देखील उपस्थीत होते.
२९ डिसेंबर राजी आयोजित या सोहळ्यात सकाळी ९.१५ मीनीटाने शाळेची घंटा वाजली आणी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या पायरीचे दर्शन घेत वर्गात प्रवेश केला. विद्यालयातील साईच्या मुर्तीला आकर्षक सजावट यावेळी करण्यात आली. तसेच शिर्डी माझे पंढरपुर आरती होवून वर्गाच्या बाहेर उपस्थीत शिक्षकांचा पाद्य पुजनाचा अनोखा सोहळा यावेळी पार पडला. शिर्डी ग्रामाचार्य वैभवशास्त्री यांनी मंत्रोपचार केले तर माजी विद्यार्थींनी पाटावर बसुन शिक्षकांच्या पायावर पाणी आणि फुली वाहीली. तर विद्यार्थांनी सर्व शिक्षकांचे दर्शन घेत कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी अनेक शिक्षक भावूक झाले तर त्यांचे डोळे पाणवले.
पाद्यपुजन आणि गुरुपुजना नंतर भव्य स्टेजवर शिक्षकांचे वेलकम करण्यात आले. यावेळी अध्यक्षीय सुचना माजी विद्यार्थीनी पंकजा दाभाडे यांनी मांडली तर वैशाली सुर्वे यांनी अनुमोदन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी सुनिल दवंगे यांनी मांडले.
यावेळी सर्व शिक्षकांचा शॉल,गुलाबपुष्प आणि पेन देवून योथिचित सत्कार करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना देखील आठवण राहावी यासाठी पुन्हा एकदा शिक्षकांकडून पेन वाटप करण्यात आले. कार्यक्रमा दरम्यान विमला पोरवाल,रविंद्र गोंदकर, डॉ.सुनिल साबळे, रविंद्र जोशी, माधवी गिते यांनी जुन्या आठणींना उजाळा देत आपण कसे घडलो हे आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
तर मिराणेसरांनी शाळेत फॅशनेबल भांग पाडणारे आता टक्कल घेवून फिरतात मग कसे ओळखणार असे नेहमी प्रमाणे आपल्या विनोदी स्वभावातून बोलल्याने एकच हशा उडला. शेज्वळसरांनी माजी विद्यार्थांवर कवितावाचन केले, तर रसाळताई आणि गोदंकरसरांनी वर्गातील विद्यार्थांचं मोठ कौतूक केले,  माजी विदयार्थांनी शाळेला साऊंड सिस्टम भेट दिल्याने मुख्याध्यापक मुठाळसरांनी यामुळे शाळेतील कार्यक्रमात या मोठा उपयोग होईल असे सांगीतले.
अध्यक्षीय भाषणात तत्कालीन मुख्याध्यापक चव्हानसरांनी सर्व विद्यार्थांना कशी शिस्त लावली हे सांगत बेशिस्त सायकल पार्क करणा-या विद्यार्थांना कसे धोपाटल ही आठवण करुन दिली, माझा विद्यार्थी यशस्वी व्हावा, जीवनात कसा जगला पाहीजे त्याने आपली मान खाली घालता काम नये, या एकचं उद्देशाने सर्वांना शिस्तीत वागायला शिकवले. आणि आज ऐवढ्या वर्षानंतर मोठे झालेले विद्यार्थी बघून आपण जे पेरलं तेच उगलं यामुळे आपलं जीवन सार्थक झाल्याची भावाना चव्हणसरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले.तर मैदानावर पुन्हा एकदा मुला-मुलींचा खो-खो चा खेळ रंगला. पकडा-पकडी आणि विसर पडलेल्या कमेंटने शाळेचे मैदान पुन्हा एकदा दणाणून गेले.यावेळी खेळाच्या माजी शिक्षीका शहाणेताईंनी व्हीसल वाजवून आपले कर्तव्य बजावले.
यानंतर सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांना तारांकित हॉटेल मध्ये सहभोजन आयोजन करण्यात आले. तर वयोवृद्ध शिक्षकांचा आणि विद्यार्थांनीचा कॅटवॉक ही आयोजीत करण्यात आला.तसेच सर्व मुला-मुली झिंगाट गाण्यावर मनसोक्त थिरकले. एक दिवस स्वतःसाठी असा उद्देश ठेवून दिडशे जणांचा सा सस्नेहमेळावा अगदी अविस्मरणीय ठरला आहे. हा सस्नेह मेळावा यशस्वी व्हावा म्हणून माजी विदयार्थी प्रसन्न शिरगावकर, सुनिल दवंगे, संदिप रामदास सोनवणे, मंगेश कुलकर्णी, सचिन गंगवाल,सचिन औताडे, अशोक मोरे, अशोक तुपे, रविंद्र महाले, ज्ञानेश्वर लांबोळे, विमला पोरवाल, पंकजा दाभाडे,सुरैय्या पठाण,वैशाली सुर्वे, यांनी आधिक परिश्रम घेतले. त्याच बरोबर दहावी अ आणि ब मधील सव्वाशे विद्यार्थी या निमित्ताने उपस्थीत होते.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget