माजी विद्यार्थी सस्नेह मेळाव्यात वयोवृद्द शिक्षकांचा कॅटवॉक.. विद्यार्था बरोबर शिक्षकांनी केला आनंकव्यक्त
२५ वर्षांनतर वाजली शाळेची घंटा...छडी नको म्हणून माजी विद्यार्थी धावले वर्गाकडे..सस्नेह मेळाव्याचे अनोखे आयोजन
शाळेतील आठवणींना उजाळा देत साईनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील १९९४ सालच्या दहावी वर्गाचा सस्नेह मेळावा अगदी उत्साहात पार पडला. तब्बल २५ वर्षानंतर शभंरहुन आधिक विद्यार्थी आणि २६ शिक्षक या अभुतपुर्व सोहळ्यासाठी उपस्थीत होते.दहावी पर्यंत शाळेचे दिवस संपल्याने प्रत्येकाने आपआपल्या करिअरसाठी आणि पुढील प्रवासासाठी वेगवेगळ्या क्षेत्राकडे धाव घेतली.. मात्र, ज्या शाळेमध्ये आपण शिकलो, लहानाचे मोठे झालो, मैत्री कशाला म्हणतात हे शिकलो तसेच ज्या शिक्षकांनी ज्ञानेची गंगा बहाल करत विद्यार्थी घडवले त्या सर्व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी १९९३-९४ सालचे विद्यार्थी एकत्र आले.
रविवारी या सोहळा साईनाथ विद्यालयातील भव्य स्टेजवर आयोजीत करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष तत्कालीन मुख्यध्यापक अभिमन्यू चव्हाण हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षक शांताराम मिराणे, हभप गोंदकरसर, रसाळताई ह्या होत्या. कार्यक्रमाला २६ शिक्षकांची उपस्थीती लाभली. यात तिडकेसर, रसाळसर,शेज्वळसर,राऊतसर,ढमढेरेसर, निकमसर,त्र्यंबकेसर, देशपांडेताई, चव्हाणताई, शहाणेताई, विद्यामान मुख्याध्यापक मुठाळसर,बेलदारसर,डुबलसर, कदमसर, त्याच बरोबर शाळेतील त्याकाळचे शिपाई देखील उपस्थीत होते.
२९ डिसेंबर राजी आयोजित या सोहळ्यात सकाळी ९.१५ मीनीटाने शाळेची घंटा वाजली आणी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या पायरीचे दर्शन घेत वर्गात प्रवेश केला. विद्यालयातील साईच्या मुर्तीला आकर्षक सजावट यावेळी करण्यात आली. तसेच शिर्डी माझे पंढरपुर आरती होवून वर्गाच्या बाहेर उपस्थीत शिक्षकांचा पाद्य पुजनाचा अनोखा सोहळा यावेळी पार पडला. शिर्डी ग्रामाचार्य वैभवशास्त्री यांनी मंत्रोपचार केले तर माजी विद्यार्थींनी पाटावर बसुन शिक्षकांच्या पायावर पाणी आणि फुली वाहीली. तर विद्यार्थांनी सर्व शिक्षकांचे दर्शन घेत कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी अनेक शिक्षक भावूक झाले तर त्यांचे डोळे पाणवले.
पाद्यपुजन आणि गुरुपुजना नंतर भव्य स्टेजवर शिक्षकांचे वेलकम करण्यात आले. यावेळी अध्यक्षीय सुचना माजी विद्यार्थीनी पंकजा दाभाडे यांनी मांडली तर वैशाली सुर्वे यांनी अनुमोदन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी सुनिल दवंगे यांनी मांडले.
यावेळी सर्व शिक्षकांचा शॉल,गुलाबपुष्प आणि पेन देवून योथिचित सत्कार करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना देखील आठवण राहावी यासाठी पुन्हा एकदा शिक्षकांकडून पेन वाटप करण्यात आले. कार्यक्रमा दरम्यान विमला पोरवाल,रविंद्र गोंदकर, डॉ.सुनिल साबळे, रविंद्र जोशी, माधवी गिते यांनी जुन्या आठणींना उजाळा देत आपण कसे घडलो हे आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
तर मिराणेसरांनी शाळेत फॅशनेबल भांग पाडणारे आता टक्कल घेवून फिरतात मग कसे ओळखणार असे नेहमी प्रमाणे आपल्या विनोदी स्वभावातून बोलल्याने एकच हशा उडला. शेज्वळसरांनी माजी विद्यार्थांवर कवितावाचन केले, तर रसाळताई आणि गोदंकरसरांनी वर्गातील विद्यार्थांचं मोठ कौतूक केले, माजी विदयार्थांनी शाळेला साऊंड सिस्टम भेट दिल्याने मुख्याध्यापक मुठाळसरांनी यामुळे शाळेतील कार्यक्रमात या मोठा उपयोग होईल असे सांगीतले.
अध्यक्षीय भाषणात तत्कालीन मुख्याध्यापक चव्हानसरांनी सर्व विद्यार्थांना कशी शिस्त लावली हे सांगत बेशिस्त सायकल पार्क करणा-या विद्यार्थांना कसे धोपाटल ही आठवण करुन दिली, माझा विद्यार्थी यशस्वी व्हावा, जीवनात कसा जगला पाहीजे त्याने आपली मान खाली घालता काम नये, या एकचं उद्देशाने सर्वांना शिस्तीत वागायला शिकवले. आणि आज ऐवढ्या वर्षानंतर मोठे झालेले विद्यार्थी बघून आपण जे पेरलं तेच उगलं यामुळे आपलं जीवन सार्थक झाल्याची भावाना चव्हणसरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले.तर मैदानावर पुन्हा एकदा मुला-मुलींचा खो-खो चा खेळ रंगला. पकडा-पकडी आणि विसर पडलेल्या कमेंटने शाळेचे मैदान पुन्हा एकदा दणाणून गेले.यावेळी खेळाच्या माजी शिक्षीका शहाणेताईंनी व्हीसल वाजवून आपले कर्तव्य बजावले.
यानंतर सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांना तारांकित हॉटेल मध्ये सहभोजन आयोजन करण्यात आले. तर वयोवृद्ध शिक्षकांचा आणि विद्यार्थांनीचा कॅटवॉक ही आयोजीत करण्यात आला.तसेच सर्व मुला-मुली झिंगाट गाण्यावर मनसोक्त थिरकले. एक दिवस स्वतःसाठी असा उद्देश ठेवून दिडशे जणांचा सा सस्नेहमेळावा अगदी अविस्मरणीय ठरला आहे. हा सस्नेह मेळावा यशस्वी व्हावा म्हणून माजी विदयार्थी प्रसन्न शिरगावकर, सुनिल दवंगे, संदिप रामदास सोनवणे, मंगेश कुलकर्णी, सचिन गंगवाल,सचिन औताडे, अशोक मोरे, अशोक तुपे, रविंद्र महाले, ज्ञानेश्वर लांबोळे, विमला पोरवाल, पंकजा दाभाडे,सुरैय्या पठाण,वैशाली सुर्वे, यांनी आधिक परिश्रम घेतले. त्याच बरोबर दहावी अ आणि ब मधील सव्वाशे विद्यार्थी या निमित्ताने उपस्थीत होते.
Post a Comment