Latest Post

अहमदनगर - शहरात धुमाकूळ घालणारी सराईत सोनसाखळी व जबरी चोरीतील चार चोरट्यांना जेरबंद करण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे. राजू रामय्या दास (रा.बुडाई, स्वरा बजगा जि.बालेसुर राज्य उडिसा हल्ली रा. बोरुडे मळा, भुतकरवाडी, अहमदनगर), राम मधुकर खंडागळे ( रा.वार्ड न.१ गोधवणीरोड, आण्णाभाऊ साठे घरकुल, श्रीरामपूर, जि.अहमदनगर), नयन राजेंद्र तांदळे (रा.डावखररोड, श्री फर्निचर शेजारी, श्रीरामपूर जि.अहमदनगर) पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. भूषण बबन ससे (रा.भुतकरवाडी ता.जि.अहमदनगर) हा फरार आहे. आरोपींकडून २ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यांच्यावर तोफखाना, भिंगार व कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिस ठाण्यात पो.नि. विकास वाघ यांनी दिलेल्या सूचनेनुसार पो उप नि.सतीश शिरसाठ, पोना शाहीद शेख, नितीन शिंदे, नितीन गाडगे, मुकुंद दुधाळ, संदीप थोरात, भारत इंगळे, राहुल शेळके, सुजय हिवाळे आदीच्या पथकाने ही कारवाई केली.

बेलापूर  ( प्रतिनिधी  )- महाराष्ट्र  लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या सिव्हील जज्ज व ज्यूडीशिअल मँजिस्टेट फस्ट क्लास पदाकरीता घेण्यात आलेल्या परिक्षेत बेलापूर येथील शैलेश राजेंद्र सातभाई याने राज्यातून ५८ क्रमांक मिळवीला आहे                           बेलापूर येथील प्रगतशील शेतकरी व बेलापूर सेवा संस्थेचे माजी चेअरमन राजेंद्र कचरु सातभाई यांचे ते चिरंजीव  आहे त्याचे १० पर्यंतचे शिक्षण केशव गोविंद विद्यालय बेलापूर खूर्द येथे तर बारावी पर्यंतचे शिक्षण जे टी एस हायस्कूल बेलापूर  येथे झाले त्यांचे बी काँमचे शिक्षण एस पी काँलेज पुणे येथे झाले एल एल बीचे शिक्षण आय एल एस काँलेज पुणे येथे झाले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लाँ विभागातुन त्यांनी एल एल एम ही पदवी संपादन केली शिवाजीनगर पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायालयात त्यांनी प्रँक्टीस केली बेलापूर  व परिसरात न्यायाधीश म्हणून नियुक्ती होणारे शैलेश सातभाई हे पहीले व्यक्ती  आहे त्याच्या यशाबद्ल बेलापूरातील अनेकांनी त्याचे अभिनंदन  केले आहे

बुलडाणा- 21 डिसेंबर
नवीन नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसी रद्द करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी बुकडाणा येथे  भारतीय मुस्लिम परिषद यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला तर त्याला जमीअत उलमा ए हिंद,जमात ए इस्लामी,महामानव ग्रुप संघटना, आजाद हिंद संघटना व इतर अनेक संघटनांचा पाठिंबा होता. जिल्हाधिकारी कार्यालयावर शनिवार धडकलेल्या या आक्रश मोर्च्यात हजारोच्या संख्येने सर्व जाती धर्माचे नागरिक सहभागी झाले होते.
   
 केंद्र शासनाने CAA हा नवीन कायदा अमलात आणला असून हा कायदा फक्त मुस्लिम समाजाला टारगेट करण्यासाठी बनवन्यात आला आहे.यात बदल करण्यासाठी देशभरातील बुद्धिजीवी लोक,कायदे तज्ञ,विद्यार्थी व अनेक इतर समाजातील लोक समोर येवून या नवीन कायद्याला असंवैद्यानिक म्हणत विरोध करीत आहे.बुलडाणा जिल्ह्यात ही अनेक ठिकाणी मोर्चे काढण्यात आले.आज 21 डिसेंबर रोजी भारतीय मुस्लिम परिषदच्या नेतृत्वात बुलढाणा शहरात भव्य मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते.दुपारी या मोर्चाला बुलढाणाच्या इदगाह मैदानावरुन सुरुवात झाली, मोर्चा संगम चौक,जयस्तंभ चौक,बाजार लाइन, जनता चौक, कारंजा चौक ते थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. मोरच्यामध्ये तरुणाची संख्या लक्षणीय होती,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा मोठा फोटो व विविध मागण्याचे फलके यावेळी
मोर्चेकर्यांच्या हातात दिसून आले, यावेळी एका शिष्ट मंडळाने जिल्हाधिकारी यांना भेटून आपली मागणीचे निवेदन दिले.या निवेदनात नमूद करण्यात आले की केंद्र सरकारचा CAA व NRC कायदा असंवैधानिक असून ते रद्द करण्यात यावे.या वेळी शहरात मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता तर एसपी डॉ.दिलीप पाटील भुजबळ हे स्वता हजर होते.निवेदन देते वेळी शिष्ठमंडळ मध्ये जमात इस्लामी चे जिलाध्यक्ष डॉ. यासीन,जमीअत उलेमाचे जिलाध्यक्ष हाफिज़ शेख खलील उल्लाह,अब्दुल हफीज़ खान,हाफिज़ रहमत खान,विजयराज शिंदे,मो.सज्जाद,एड.जयश्रीताई शेळके,एड.शरदचंद्र रोठे,प्रा.सुनील सपकाळ आदि हजर होते.आक्रोश मोर्च्याला यशस्वी करण्यासाठी हाजी सय्यद बिलाल डोंगरे,हाजी वकार अहमद खान, रईसोद्दीन काझी, जाकीर कुरेशी, सरपंच गजनफर उल्लाह खान, शेख अकबर, एड. राज शेख, शफीक खान, मो. दानिश, शकीब खान, मो अबुजर, तारीक नदीम, मुजाहीद शेख, नवेद मिर्झा, जावेद शेख, जुबेर खान, सादीक उर्फ राजु, मो.अफसर मो.सरवर आदीने अथक प्रयत्न केले.

अहमदनगर ः नागापूर एमआयडीसी येथील एमआरएफ टायरचे गोडावून फोडून टायरची चोरी करणार्‍या तीन आरोपींना दोन ट्रकसह कळंब (जि.उस्मानाबाद) येथे पकडण्यात आले आहे. विभीषण राजाराम काळे, बालाजी छगन काळे व सुनिल नाना काळे ( तिघे रा. आंदोरा, ता.कळंब, जि.उस्मानाबाद) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे असून अन्य 10 जण फरार आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,  नागापूर येथील टायरच्या गोडावूनमधून 17 लाख 98 हजार 286 रुपयांची एमआरएफ कंपनीचे ट्रक व मोटारसायकलचे टायर चोरीप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी विभीषण काळे, बालाजी काळे व सुनिल काळे या तिघांना मिळालेल्या माहितीनुसार कळंब (जि.उस्मानाबाद) येथे पकडण्यात आले. तिघा आरोपींकडे अधिक चौकशी केली असता, ही चोरी तात्या रमेश काळे, पिल्या रविंद्र काळे, सुभाष भास्कर काळे, रमेश लघमन काळे, सुनिल कालिदास शिंदे, दादा उर्फ राजेंद्र छगन काळे, बंड्या उर्फ शहाजी बाबूराव काळे, शाम विभीषण काळे, बाबूशा भिमराज काळे, बबन बापू शिंदे, सुधाकर श्रावण भगत, भागवत उर्फ भाग्या बाप्पा काळे आदींनी मिळून केली असल्याची कबुली दिली आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली 8 लाख रुपयांची ट्रक (एमएच 24, एफ 7130) व बंद बॉडी असलेला आयशर कंपनीचा टेम्पो (एमएच 46, एफ 7616) जप्त करून आरोपींना पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
 स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिलीप पवार यांच्या सुचनेनुसार पोसई गणेश इंगळे, सफौ सोन्याबापू नानेकर, पोहेकॉ सुनिल चव्हाण, दत्ता हिंगडे, पोना आण्णा पवार, रविंद्र कर्डिले, भागीनाथ पंचमूख, विशाल दळवी, विश्वास बेरड, राहुल सोळुंके, रवि सोनटक्के, दीपक शिंदे, मेघराज कोल्हे, चालक बाळासाहेब भोपळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे. 

बुलडाणा- 20 डिसेंबर (कासिम शेख)5 महिन्यात 13 शे किलोमीटरचा पायी प्रवास करत यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयरण्यातून बाहेर निघालेला "C1" नावाचा 3 वर्षीय सबअडल्ट पट्टेदार वाघ चक्क बुलडाणा जिल्ह्यातील "ज्ञानगंगा अभयारण्यात" दाखल झाला होता व 15 दिवस या जंगलात राहून आपल्या सुरक्षित आधिवास किंवा वाघिनच्या शोधात हा वाघ आता अजिंठा पर्वत रांगा ओलांडत पुढे जात असल्याची गोपनीय माहिती "बिंदास न्यूज़" च्या हाती लागली आहे."ज्ञानगंगा अभयारण्य" सोडून गेल्या मुळे अधिकारी निराश झाले तरी काही कामचोर कर्मचारी खुश झालेले आहे.या वाघच्या आगमनाने ज्ञानगंगा अभ्यारण्यातील कर्मचाऱ्यांची जबाबदारी वाढली होती परंतु आता तो निघुन गेल्याने त्यांचा कामाचा भार कमी झाला आहे.
        यवतमाळच्या "टिपेश्वर अभयारण्यात" 3 वर्षा अगोदर एका "T1" नावाची वाघिनने 3 बछडे दिले होते त्यांचे अनुक्रमे C1,C2 आणि C3 अशे नामकरण करण्यात आले होते.लहानपणा पासून C1 वाघ लवकर उघड़पणे समोर येत नव्होता म्हणजेच तो अतिशय लाजाळु होता.आपली आईला सोडून हा वाघ तेलंगाना राज्यातील आदिलाबादच्या जंगलात फिरून महाराष्ट्रात परत आला व नांदेड, हिंगोली,परभणी,वाशिमहुन बुलडाणा जिल्ह्यात दाखल झाला. 5 महिन्यात 13 शे किलोमीटरचा प्रवास केल्यावर असे वाटत होते की हा वाघ आता "ज्ञानगंगा अभ्यारण्यात" थांबणार व इथेच राहणार परंतु जवळपास 15 दिवस या अभयारण्यात खुप फिरल्यानंतर शेवटी हा वाघ अभ्यारण्याच्या बाहेर निघाला व बुलडाणा शहरा जवळून जात राजुर घाट गाठले व मग अजिंठा पर्वत रांगेत आपली वाट काढत पुढे निघालेला आहे.सद्या हा वाघ विदर्भ- मराठवाडा व खान्देशच्या सीमेवर असल्याचे कळाले.अजिंठा पर्वत रांग औरंगाबाद,बुलडाणा जालना व जळगांव खान्देश या जिल्ह्यात पसरलेली आहे.औरंगाबाद जिल्ह्यातील "गौताळा औट्रमघाट अभयारण्य" चा काही भाग जळगाव जिल्ह्यात ही विस्तारलेला आहे व C1 वाघ आता याच अभ्यारण्यच्या दिशेने जाऊ शकतो असा कयास लावण्यात येत आहे.मात्र या वाघच्या सुरक्षेच्या दृष्टीने वाघ "ज्ञानगंगा अभयारण्य" सोडून गेल्याची माहिती उघड होऊ नये, याची पूर्णपणे दक्षता घेतली जात आहे.

सिल्लोड, प्रतिनिधी : विद्यालयातील विद्यार्थीनींची छेड काढणाऱ्या एका एकोणीस वर्षीय तरुणाला दामिनी व निर्भया पथकातील पोलिसांनी तालुक्यातील पालोद येथील यशवंत विद्यालयाबाहेर शुक्रवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास पकडले. तरुणावर प्रतिबंधक कारवाई करीत भावासमोर समज देऊन सोडून देण्यात आले, अशी माहिती पथकातील पोलिसांनी दिली.

      पालोद येथील यशवंत विद्यालयात लागून असलेल्या छोट्या- छोट्या गावांचे विद्यार्थी- विद्यार्थीनी शिक्षण घेण्यासाठी येतात. यातील विद्यार्थीनींची गावातील एक तरुण नेहमी छेड काढत होता. यामुळे तरुणाच्या नेहमीच्या छेडछाडीला कंटाळून या विद्यार्थीनींनी ही माहिती  दामिनी पथकाला दिली. शुक्रवारी पथकातील सहायक पोलिस उपनिरीक्षक पंडित इंगळे, सहायक फौसदार भगवान भिसे, विठ्ठल डोके, नायसे, महिला पोलिस मंगला ढोले, सिता ढाकणे यांनी सकाळी पालोद येथे जाऊन पाळत ठेवली व छेड काढणाऱ्या तरुणाला पकडले.

     या तरुणावर पोलिसांनी प्रतिबंधक कारवाई केली व त्याच्या भावासमोर त्याला समज देऊन भावासमक्ष सोडून दिले. शाळा, महाविद्यालय, धार्मिकस्थळे, बस थांब्यावर तसेच बसमध्ये गर्दीचा फायदा घेत महिला, विद्यार्थीनींची छेड काढतात. याला आळा घालण्यासाठी नुकतीच सहायक पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांनी या पथकाची नियुक्ती केली आहे. या पथकाची पालोद येथे ही पहिली कारवाई केली. या पथकाची शाळा, महाविद्यालय, धार्मिकस्थळे, बस थांब्यावर करडी नजर राहणार आहे.
      शाळा, महाविद्यालय, धार्मिकस्थळे, बस थांब्यावर तसेच बसमध्ये गर्दीचा फायदा घेत महिला, विद्यार्थीनींची रोडरोमिओ छेड काढतात. परंतु त्यांच्या विरोधात कुणी तक्रार करत नाही. यामुळे रोडरोमिओंच्या अशा प्रकाराला बळ मिळते. याला आळा घालण्यासाठी महिला, विद्यार्थीनींनी भीती न बाळगता पोलिसांना कळवावे असे आवाहन पथकातील अधिकारी, पोलिस कर्मचाऱ्यांनी केले आहे.

सिल्लोड, प्रतिनिधी : धडाकेबाज कारवाई, कल्याण नावाचा मटका घेणाऱ्या तिघांना पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापा मारुन रंगेहाथ पकडले. ही कारवाई तालुक्यातील आमठाणा येथे शुक्रवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी तिघांन विरोधात सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
        तेजराव वाळुबा बावस्कर (60), युनूस शेख उमर शेख (30), व शेख शरीफ शेख दाऊद (51) तिघे रा. आमठाणा अशी मटका घेताना पकडलेल्या आरोपींची नावे आहेत.
    पोलिसांनी दिलेली माहिती अशी की आमठाणा येथील चौफुलीवर दोघे तर बाजार पट्टीत एक जण कल्याण मटका घेत असल्याची गोपनीय माहिती सहायक पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांना मिळाली. माहिती मिळताच किरण बिडवे यांनी पोलिस कर्मचारी हरिदास आहेर, दिनेश पुसे यांना सोबत घेऊन आमठाणा येथे सापळा लावला असता चौफुलीवर तेजराव बावस्कर, युनूस शेख, तर बाजार पट्टीत शेख शरीफ मटका घेताना मिळून आले. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता 5 हजार 370 रुपये मिळून आले, अशी माहिती किरण बिडवे यांनी दिली.
       मटका घेणारे तेजराव बावस्कर, युनूस शेख यांना धंदा कुणाला देता असे पोलिसांनी विचारले असता आम्ही शेख कालू (आमठाणा) यांना देतो. ते राजू शिंदे (घाटनांद्रा) यांना तर राजू शिंदे हे विजय सिंघवी (भराड़ी) यांना देतो असे सांगितले, तर शेख शरीफ यांनी हाजी पटेल (देऊळगाव बाजार) यांना देतो असे सांगितले.
   

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget