बुलडाणा- 10 डिसेंबर (कासिम शेख)
जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात मागील 1 डिसेंबर पासून C1 नावाचा पट्टेदार वाघ आलेला असून तो सद्या याच जंगलात आहे.या वाघाचे संरक्षण वन्यजीव विभाग, प्रादेशिक वन विभाग व पोलीस विभागाने संयुक्तरित्य करावे अशे चर्चा आज बुलडाणा येथील पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी अशी भावना आपल्या अध्यक्षतेखाली संपन्न जिल्हा व्यघ्र समितीच्या बैठकीत व्यक्त केली आहे.
बुलडाणा जिल्ह्याच्या मध्य भागी बुलडाणा, चिखली,मोताळा व खामगांव या चार तालुक्यात 205 चौरस किलोमीटर क्षेत्रावर ज्ञानगंगा अभयारण्य आहे जिथे बिबट,अस्वल लांडगे सारखे हिंस्र प्राण्या सह इतर अनेक जातीचे पशु पक्षी राहतात.अनेक वेळी इतर व्यघ्र प्रकालपातील वाघ इथे येऊन गेल्याचे बोलले जात आहे.मागील 1 डिसेंबरच्या रात्री या अभ्यारण्यात C1 नावाचा वाघ दाखल झाला.रेडिओ कॉलर लावलेला सदर वाघ यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभ्यारण्यातुन निघुन तब्बल 5 महिन्यात 1300 किलोमीटरचा प्रवास करत ज्ञानगंगा अभ्यारण्यात आलेला आहे.वाइल्ड लाइफ इंस्टिट्यूट ऑफ इंडिया,देहरादूनचे अभ्यासक श्री.हुसैन सदर वाघाचा सतत पाठलाग करुण त्याच्यावर अभ्यास करत आहे.

C1 वाघाच्या या जंगलात प्रवेश केल्याने अकोला वन्यजीव विभाग सतर्क झालेला असून आवश्यक त्या पाऊले उचलली जात आहे.प्रत्येक जिल्ह्यात व्यघ्र समिति कागदोपत्री असून C1 वाघाच्या प्रवेशाने बुलडाणा जिल्ह्यातील समिती ही चर्चेत आली आहे. जिल्हा एसपी या समितीचे अध्यक्ष असून आज आयोजित बैठकीवर सर्वांची नजर होती.जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ यांच्या कार्यालयात आयोजित या समितीच्या बैठकीत बुलडाणा प्रादेशिक वन विभागाचे दोन एसीएफ रणजीत गायकवाड व संदीप गवारे,अकोट वन्यजीव विभागाचे एसीएफ लक्षण अवारे, ज्ञानगंगा अभयारण्यचे दोन्ही आरएफओ डांगे व मयूर सुरवसे,बुलडाणा एलसीबीचे पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख हजर होते.या वेळी ज्ञानगंगा अभयरण्यातून जाणाऱ्या बुलडाणा-खामगांव या मार्गावर अनेक ठिकाणी वाहनाचा वेग कमी करण्यासाठी गतिरोधक बसविण्यात यावे, रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत वन्यजीवांच्या रक्षणासाठी सदर मार्ग वाहतुकीसाठी बंद असते तरी काही

अधिकारी,राजकीय पुढारी व इतर काही लोक चेकपोस्टवर कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून बंद असलेला गेट उघडायला लावतात आता अत्यावश्यक सेवा वगळून कोणाच्याही वाहणाला रात्रीच्या वेळी अभयरण्यातून जाऊ द्यायचे नाही अशे ठरले व जे कोणीही गेट उघडन्यास भाग पड़त असेल तर त्याच्यावर नियमानुसार गुन्हे दाखल करावे तसेच C1 वाघाचे संरक्षण वन्यजीव विभाग, प्रादेशिक वन विभाग व पोलीस विभागाला संयुक्तरित्य करायचे आहे अशी आपली जबाबदारी व्यक्त केली आहे.