बेलापूर ( प्रतिनिधी )-ऐनतपूर येथे सायंकाळी बिबट्याचा हल्लाबोल
श्रीरामपूर-तालुक्यातील ऐनतपूर बेलापूर परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली असून तारेच्या संरक्षक कुंपणावरून आत प्रवेश करून बिबट्या शेळ्या ओढून नेत असल्याच्या घटना घडत असल्याने शेतकऱ्यांनी दहशत घेतली आहे.
मंगळवारी रात्री ऐनतपूर येथील भाऊसाहेब कुताळ यांचे वस्तीवर सायंकाळी आठ वाजताच हल्ला चढवला. घरातील सर्वजण टीव्ही पाहत असतांना आठच्या सुमारास बिबट्याने तारेच्या सरंक्षक कुंपणावरून आत गोठयात प्रवेश केला. छोटा बोकडाचे कंबर पकडून परत उडी मारून बाहेर पळ काढला. यावेळी शेळ्या जोरजोरात ओरडल्याने वस्तीवरील सर्वजण बाहेर पळत आले.यावेळी विजेरी लावून पाहिले असता बिबट्याच्या तोंडात बोकड दिसला.वस्तीवरील तरुणांनी धाडस दाखवीत बिबट्याचा पाठलाग केला. यावेळी बिबट्याने तोंडातील बोकड टाकून पळ काढला.बोकड वाचवण्यात यश आले असले तरी त्याला गंभीर जखम झाली आहे. या घटनेसह यापूर्वी ही बिबट्याने शेळ्या फस्त केल्याच्या घटना घडल्या आहेत. सध्या उसतोडी सुरु झाल्याने ऊसाचे क्षेत्र रिकामे होऊ लागल्याने बिबटया आता मानवी वस्तीकडे धाव घेऊ लागले आहे.
Post a Comment