नाशिक (प्रतिनिधी )नामदार छगन भुजबळ यांची भेट घेऊन छत्रपती युवा सेनेच्या वतीने दिले निवेदन
मराठा समाजावरील गुन्हे सरसकट मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
ना. छगन भुजबळ साहेब
छत्रपती युवा सेनेच्या वतीने आज नामदार छगन भुजबळ यांची संस्थापक-अध्यक्ष गणेश भाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली भेट घेण्यात आली
यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यात 58 मोर्चे काढण्यात आले होते त्यामध्ये अनेक बांधवांवर तरुणांवर गुन्हे दाखल झाले असून हे गुन्हे त्वरित मागे घ्यावे यासाठी आज नामदार छगन भुजबळ यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली
यावेळी भुजबळ साहेब म्हणाले की छत्रपती युवा सेनेच्या वतीने करण्यात आलेल्या मागणीचा विचार करून लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांशी यावर चर्चा करून मराठा समाजातील मुलांचे गुन्हे मागे घेण्यात येतील असे आश्वासन संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले.यावेळी रफिक तडवी मयुर दाते दीपक जाधव सतीश शिंदे उपस्थित होते
Post a Comment