बेलापूर( प्रतिनिधी )- जनसुविधा अंतर्गत स्मशानभूमी चे नऊ लाख रुपये खर्चाचे काम जिल्हा नियोजन समितीतून एक वर्षापूर्वी मंजूर केले परंतु ग्रामपंचायतच्या आडमुठे धोरणामुळे ते काम रखडले त्यामुळे हा निधी परत जाऊ नये म्हणून तो निधी माझ्या गटातीलदुसर्या ग्रामपंचायतीला दिला असल्याचा खुलासा जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनी केला आहे याबाबत प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की एक वर्षापूर्वी हे काम जिल्हा नियोजन समितीतून मंजूर केले होते व हा निधी ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आला होता वेळोवेळी पाठपुरावा करून ते काम करण्यास विनंती केली परंतु पदाधिकाऱ्यांनी व स्वयंघोषित पुढाऱ्याने या कामाची ई निवीदा न करता त्याचे तीन तुकडे करून हे पैसे खर्च करण्याचा प्रयत्न केला त्यास मी विरोध केला व मी सुचवलेले काम न घेता दुसरे काम घेतले हा निधी मंजूर करण्यास तुमचा काहीही संबंध नाही असे ग्रामसभेत सांगितले जिल्हा परिषदेचे एकही काम गावात होऊ देणार नाही असा चंग या गाव पुढाऱ्यांनी बांधला त्यामुळे हा निधी परत जाऊ नये म्हणून माझ्या गटात असणाऱ्या दुसऱ्या ग्रामपंचायतीकडे वर्ग केला तसेच झेंडा चौक मेन रोड या रस्त्याकरीता जिल्हा परिषदेतून सात लाख रुपये मंजूर केले होते परंतु हा रस्ता होऊ नये म्हणून संबंधित पुढाऱ्याने जिल्हा परिषदेकडे तक्रार केली व हा रस्ता ग्रामपंचायतीला विचारल्याशिवाय करण्यात येऊ नये असे लेखी कळविले या रस्त्याबाबत काम होऊ नये म्हणून मंजूर असलेली व्यायाम शाळा रद्द करून तो निधी रस्त्याकडे वळविला तसेच ग्रामसभेचा खोटा ठराव घेतला त्यामुळे मी रस्त्याचे मंजूर केलेले कामही रखडले बेलापूर गावात पाच ते सहा कोटी रुपयांचा निधी आलेला असून त्यात एकही भरीव काम केले नाही 30 लाख रुपयांची लाईट बसवलेले आहे ते ही निकृष्ट दर्जाचे होते सर्व कामे तुकडे करून ई टेंडर न करता करण्याचा पदाधिकारी यांनी घाट घातलेला आहे व या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे याबाबत ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हा परिषदेकडे तक्रार केल्यामुळे त्यांची चौकशी सुरू झाली आणि या चौकशीमुळे बिथरलेल्या पदाधिकाऱ्यांनी मला बदनाम करण्यासाठी निखालस खोटे वृत्त दिले असल्याचा खुलासाही जिल्हा परिषद सदस्य यांनी केला असुन या पुढील काळात मी सुचविलेले काम करण्यास तयार असेल तर पुन्हा निधी देण्यास बांधील असल्याचेही नवले यांनी सांगितले
Post a Comment