Latest Post


कोपरगाव (प्रतिनिधी)
एका दुचाकीतील चोरीच्या गुन्ह्यात आपल्याला अटक करू नये व मदत करण्याच्या मोबदल्यात शिर्डी पोलीस ठाण्याचे दोन पोलीस शिपाई ज्ञानेश्वर पाराजी सुपेकर व विशाल पी.मैद या दोघाना चाळीस हजार रुपयांची लाचेची मागणी पुणतांबा फाटा पंचासमक्ष केल्याने नगर येथील लाच प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांच्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने कोपरगाव शिर्डी परिसरात खळबळ उडाली आहे.सदरचे सविस्तर वृत्त असे कि, कोपरगाव येथील रहिवाशी तरुण सागर मेहमूद सय्यद यांचे येवला रस्ता कोपरगाव या ठीकाणी विविध कंपनीच्या दुचाकी खरेदी विक्रीचे दुकान असून कोपरगाव बागुल वस्ती येथील बंडू जगताप नावाच्या एका युवकाने त्यांच्याकडून मे 2018 रोजी एक बजाज पल्सर कंपनीची दुचाकी खरेदी केली होती.त्याने ती संगमनेर तालुक्यातील आश्वी येथील बाजारात ती अज्ञात इसमास अदलाबदल करून विकली असल्याची माहिती समजते.दरम्यान शिर्डीत दरम्यान शिर्डीत एका परप्रांतीय महिलेची पर्स ओढताना काही चोरटे पकडण्यात आले होते.त्यात हि प्लसर गाडी सापडल्याने शिर्डी पोलिस शिपाई ज्ञानेश्वर सुपेकर व विशाल मैद यांनी दुचाकी दलाल सागर सय्यद व त्यांचा भाऊ मोहसीन सय्यद यांचेकडिल असल्याचा बहाणा करून सागर सय्यद त्याचा भाऊ मोहसीन सय्यद व त्यांच्याकडे काम करणारा राहुल काकडे यांची नावे वगळण्यासाठी पन्नास हजारांची मागणी केली शुक्रवार 22 नोव्हेंबर रोजी केली होती.त्यात तडजोड होऊन ती रक्कम चाळीस हजार रुपये करण्यात आली.त्यावेळी हि रक्कम जास्त व अन्यायकारक वाटल्याने या दोघांनी या बाबत अहमदनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करून न्याय मागितला होता.त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कोपरगाव नजीक असलेल्या पुणतांबा चौफुलीवर शुक्रवार दि.22 नोव्हेंबर रोजी साडेचारच्या दरम्यान सापळा लावला होता.त्यात फिर्यादी सागर सय्यद व त्याचा भाऊ मोहसीन सय्यदव त्यांच्याकडे काम करणारा मुलगा राहुल काकडे यांना अटक न करण्याच्या मोबदल्यात चाळीस हजार रुपये देण्याची चर्चा तेथे असलेल्या पंचासमक्ष चालू असताना आरोपी पोलीस शिपाई सुपेकर व मैद यांना संशय आल्याने त्यांनी पोबारा केला होता.दरम्यान या ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे विभागीय पोलीस अधिकारी एच.डी. खेडकर यांनी समक्ष भेट देऊन पाहणी करून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गु.र.नं.394/2019 भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन.1988 चे कलम 7 प्रमाणे आरोपी ज्ञानेश्वर सुपेकर व विशाल मैद यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक दैपाक करांडे हे करीत आहेत.दरम्यान या प्रकरणामुळे पोलीस विभागात चालत असलेला भ्रष्टाचार उघड झाल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात तृतियपंथियाचा मारहाणीत मृत्यू झाला असून श्रीरामपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.दि. 17 ऑक्टोबर रोजी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात अश्विनी नुरजहाँ शेख (वय-45, रा.श्रीरामपूर) या तृतियपंथीयाला अज्ञात व्यक्तींनी काहीतरी टणक वस्तूने डोक्यात मारहाण केली होती. यामध्ये ते जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटल अहमदनगर येथे दाखल करण्यात आले होते. मात्र तेथे त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याबाबत श्रीरामपूर पोलीस ठाण्यात वैद्यकीय अधिकार्‍यांच्या अहवालानुसार दि. 29 रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहायक फौजदार सुरेश रामचंद्र मुसळे यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास सपोनि संभाजी पाटील करीत आहेत.

बुलडाणा- 29 नोव्हे.
जिल्ह्यात गुटख्याची सर्रास विक्री सुरू आहे. ही विक्री तत्काळ बंद करुन खामगाव शहरातील मुख्य गुटखा तस्करावर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ता समीर खान यांनी आज जिल्हाधिकारी, अन्न व औषध प्रशासन आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात केली आहे. कारवाई न झाल्यास स्वतः गुटख्याच्या गोडाऊनवर धाड टाकण्याचा इशारादेखील त्यांनी दिला आहे.
     महाराष्ट्र राज्यात गुटखा, सुगंधित तंबाखूची बिक्रीवर बंदी आहे.असे असतांना अनेक लोक प्रशासनातील भरष्ट अधिकाऱ्याचा खिशा गरम करुण गुटख्याचा अवैध व्यापार करुण "गब्बर" झाले तर इतकेच नव्हे या धंध्यातुन आडमाप कमाई करत अनेकांनी आता हा धंधा बंद करुण अशे तस्कर राजकारणात सक्रिय झाले आहे.जिल्हा प्रशासनाला समीर खान यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की खामगाव शहरातील एक मोठा गुटखा तस्कर संपूर्ण जिल्हाभरात गुटखा पोहोचवतात. खामगावातील मुख्य अवैध गुटखा तस्करांची चौकशी करून त्याच्याविरूद्ध अन्न व औषध कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा येत्या 2 डिसेंबरला आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात शेवटी करण्यात आला आहे.


अंबड : प्रतिनिधी अंबड तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रातून होत असलेली अवैध वाळु वाहतुक डोकेदुखी ठरत आहे. कारवाई केल्यानंतरही अवैध वाळू वाहतुक थांबत नाही. त्यामुळे ही फक्त कारवाई दिखावू आहे की काय? किंवा या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर महसूल प्रशासनातील काही अधिकाऱ्यांचे हात आहेत का? असा सवाल उभा राहत आहे. यातच जिल्हाधिकारी जालना यांनी महसूल प्रशासनातील काही अधिकाऱ्यांचे वाळू माफिया सोबत संबध उघड झाल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात निलंबनाच्या कारवाई मुळे मोठी खळबळ माजली आहे निलबंनाची कारवाई झालेला बडा अधिकारी कोण याची सर्वांना उत्सुकता लागली असून वाळू प्रकरणात झालेली अनियमितता हेच मोठे कारण निलबंन कारवाईचे असु शकते असा कयास बांधला जात आहे. उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांनी गेल्या महिनाभरापासुन वाळु माफियांच्या विरोधात कारवाईची मोहिम सुरू करीत वाळु माफियांना मदत करणाऱ्या लोकांवरही गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. अवैध वाळु वाहतुक रोखण्यासाठी रस्ते देखील उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांनी नुकतेच खोदलेले होते. निलंबनाची कारवाई झालेला तो बडा अधिकारी कोण याबाबत माहिती विचारणा करण्यासाठी उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांचेशी भ्रमणध्वनीवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होवु शकलेला नाही. निलंबनाच्या कारवाईमुळे महसूल प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

नाशिकरोड | प्रतिनिधी नाशिकरोड परिसरातील शिंदे गावात एका गाळ्यात पोलीस आणि अन्न पुरवठा अधिकाऱ्यांच्या संयुक्त कारवाईत दीड लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी गाळा मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.अधिक माहिती अशी की, नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे येथील लोहिया कंपाउंडमध्ये असलेल्या एका गाळ्यात अनधिकृत तंबाखू, गुटखा असल्याची गुप्त माहिती पोलीस आयुक्तालयातील विशेष पथकाला मिळाली  होती. त्यानुसार छापा टाकून पोलिसांच्या पथकाने शिताफीने दीड लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला.ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन सोनवणे, शिरसाठ, वाघ, पवार, गवळी अन्न सुरक्षा अधिकारी पी.एस.पाटील यांच्या पथकाने केली.  छाप्यात विविध नावांचा सुमारे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे.  याप्रकरणी गाळा मालक रामविलास शिवणारायन लोहिया याच्या विरोधातनाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


बुलडाणा- 27 नोव्हे.
बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील बदनापुर येथील वैजनाथ बोरकर या शेतकरी सह इतर 15 शेतकऱ्यांना शेतात काम करीत असतांना अचानकपणे शेतात येवून अवैध सावकार वामन आसोले यांनी भाडोत्री गुंड आणून जीवघेणा हल्ला केला असा आरोप जख्मी शेतकऱ्यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. यात 15 शेतकरी जख्मी झाले असून यातील काही शेतकऱ्यांना बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहेत. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
      बदनापुर येथील अवैध सावकार वामन आनंदा आसोले याने आज 27 नोव्हेबर रोजी साकाळी 10.30 वाजेच्या सुमारास शेतात काम करीत असताना अचानक 30 ते 35 जनानी लोखंडी रॉड व लाठ्या काठयानी बेदम मारहाण केली यात सर्व 15 शेतकरी जख्मी झाले असून जख़्मी मध्ये तीन महिलांचा तर 12 पुरुषांचा समावेश आहेत.या जख्मीतील 4 जणांना बुलडाणा येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले
आहे.ही घटना मेहेकर तालुक्यातील असून  जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.बुलढाणा जिल्ह्यातील असंख्य शेतकरी सावकारी पाशात अडकले असून त्यांच्या दादागिरीला कंटाळून काही शेतकरयानी आत्महत्या सुद्धा केल्या आहेत.या घटनेची तक्रार मेहकर पोलिसांनी नोंदवून न घेतली नाही असा आरोप पीडितांनी केला आहे.घटनेची माहिती मिळताच बुलढाणा शहर ठाणेदार यांनी जख़्मीचा बयान नोंदविन्यात आले आहे. शेतकऱ्यांना न्याय केव्हा मिळेल याकडे जिल्हा वासियांचे लक्ष लागले आहे.मेहकर ठाणेदार आत्माराम प्रधान यांच्याशी फोन माहिती घेतली असता ते म्हणाले की गुन्हा नोंदविन्याची प्रक्रीया सुरु असून एकमकां विरोधात गुन्हा दाखल होणार आहे.

बुलडाणा- 27 नोव्हे.रस्ता बांधकाम ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे सैलानी येथील घर कोसळल्या प्रकरणी रायपुर पोलीस ठाण्यात संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल झालेला आहे.
     बुलडाणा जिल्ह्यातील हातणी ते जालना जिल्ह्यातील भोकरदनपर्यंत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून या रस्त्याचे काम सुरु आहे.धार्मिक स्थळ सैलानीतून हा मार्ग जात असल्याने सैलानीमध्ये रोडचे खोदकाम सुरु आहे.ठेकेदाराकडून खोदकाम कुठे कमी तर कुठे जास्त करण्यात येत आहे. सैलानी येथील मो.नफीस हाजी मो.अय्यूब यांच्या घराला कोरुन रस्ता खोदण्यात आल्याने त्यांचा घर तकलादु झाला व 24 नोव्हेंबर रोजी एक मजला घर पूर्णपणे कोसळला. या घरात गावातील विद्यार्थी अभ्यास करतात. सुदैवाने घर कोसळण्याच्या वेळी घरात कोणीही नव्होता.घरमालक मो.नफीस हे इलेक्ट्रिक कंत्राटदार असल्याने त्यांचे इलेक्ट्रिकचे मोठे साहित्य ठेवलेले होते व घर पडल्याने जवळपास 18 ते 20 लाखाचे नुकसान झाले सदर रोडच्या कामात हलगर्जी करणारी कंपनी साकार इंफ्रास्ट्रक्चर यांनी जाणून बुजुन घराचे नुकसान केले अशी तक्रार घर मालक शेख अय्यूब शेख दगडु यांनी दिल्यामुळे संबंधित कंपनीवर रायपुर पोलीस ठाण्यात भादवी ची कलम 427 प्रमाणे एनसी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सैलानीत मार्गाच्या कामासाठी झालेल्या खोदकामामुळे घरासमोर 10 फुट खोल खड्डे पडले असून घरातील लहान,वयो व्रुद्ध लोकांना ये जा करण्यास मोठा त्रास होत आहे तर अनेक घर या खोदकामाने तकलादु झाले आहे व त्यांना धोका निर्माण झालेला आहे.अश्या घरात राहणारे लोक घाबरलेले आहे.या कडे एनएचए चे अधिकारी व ठेकेदाराने लक्ष देणे गरजेचे आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget