Latest Post

नाशिकरोड | प्रतिनिधी नाशिकरोड परिसरातील शिंदे गावात एका गाळ्यात पोलीस आणि अन्न पुरवठा अधिकाऱ्यांच्या संयुक्त कारवाईत दीड लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी गाळा मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.अधिक माहिती अशी की, नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे येथील लोहिया कंपाउंडमध्ये असलेल्या एका गाळ्यात अनधिकृत तंबाखू, गुटखा असल्याची गुप्त माहिती पोलीस आयुक्तालयातील विशेष पथकाला मिळाली  होती. त्यानुसार छापा टाकून पोलिसांच्या पथकाने शिताफीने दीड लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला.ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन सोनवणे, शिरसाठ, वाघ, पवार, गवळी अन्न सुरक्षा अधिकारी पी.एस.पाटील यांच्या पथकाने केली.  छाप्यात विविध नावांचा सुमारे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे.  याप्रकरणी गाळा मालक रामविलास शिवणारायन लोहिया याच्या विरोधातनाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


बुलडाणा- 27 नोव्हे.
बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील बदनापुर येथील वैजनाथ बोरकर या शेतकरी सह इतर 15 शेतकऱ्यांना शेतात काम करीत असतांना अचानकपणे शेतात येवून अवैध सावकार वामन आसोले यांनी भाडोत्री गुंड आणून जीवघेणा हल्ला केला असा आरोप जख्मी शेतकऱ्यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. यात 15 शेतकरी जख्मी झाले असून यातील काही शेतकऱ्यांना बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहेत. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
      बदनापुर येथील अवैध सावकार वामन आनंदा आसोले याने आज 27 नोव्हेबर रोजी साकाळी 10.30 वाजेच्या सुमारास शेतात काम करीत असताना अचानक 30 ते 35 जनानी लोखंडी रॉड व लाठ्या काठयानी बेदम मारहाण केली यात सर्व 15 शेतकरी जख्मी झाले असून जख़्मी मध्ये तीन महिलांचा तर 12 पुरुषांचा समावेश आहेत.या जख्मीतील 4 जणांना बुलडाणा येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले
आहे.ही घटना मेहेकर तालुक्यातील असून  जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.बुलढाणा जिल्ह्यातील असंख्य शेतकरी सावकारी पाशात अडकले असून त्यांच्या दादागिरीला कंटाळून काही शेतकरयानी आत्महत्या सुद्धा केल्या आहेत.या घटनेची तक्रार मेहकर पोलिसांनी नोंदवून न घेतली नाही असा आरोप पीडितांनी केला आहे.घटनेची माहिती मिळताच बुलढाणा शहर ठाणेदार यांनी जख़्मीचा बयान नोंदविन्यात आले आहे. शेतकऱ्यांना न्याय केव्हा मिळेल याकडे जिल्हा वासियांचे लक्ष लागले आहे.मेहकर ठाणेदार आत्माराम प्रधान यांच्याशी फोन माहिती घेतली असता ते म्हणाले की गुन्हा नोंदविन्याची प्रक्रीया सुरु असून एकमकां विरोधात गुन्हा दाखल होणार आहे.

बुलडाणा- 27 नोव्हे.रस्ता बांधकाम ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे सैलानी येथील घर कोसळल्या प्रकरणी रायपुर पोलीस ठाण्यात संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल झालेला आहे.
     बुलडाणा जिल्ह्यातील हातणी ते जालना जिल्ह्यातील भोकरदनपर्यंत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून या रस्त्याचे काम सुरु आहे.धार्मिक स्थळ सैलानीतून हा मार्ग जात असल्याने सैलानीमध्ये रोडचे खोदकाम सुरु आहे.ठेकेदाराकडून खोदकाम कुठे कमी तर कुठे जास्त करण्यात येत आहे. सैलानी येथील मो.नफीस हाजी मो.अय्यूब यांच्या घराला कोरुन रस्ता खोदण्यात आल्याने त्यांचा घर तकलादु झाला व 24 नोव्हेंबर रोजी एक मजला घर पूर्णपणे कोसळला. या घरात गावातील विद्यार्थी अभ्यास करतात. सुदैवाने घर कोसळण्याच्या वेळी घरात कोणीही नव्होता.घरमालक मो.नफीस हे इलेक्ट्रिक कंत्राटदार असल्याने त्यांचे इलेक्ट्रिकचे मोठे साहित्य ठेवलेले होते व घर पडल्याने जवळपास 18 ते 20 लाखाचे नुकसान झाले सदर रोडच्या कामात हलगर्जी करणारी कंपनी साकार इंफ्रास्ट्रक्चर यांनी जाणून बुजुन घराचे नुकसान केले अशी तक्रार घर मालक शेख अय्यूब शेख दगडु यांनी दिल्यामुळे संबंधित कंपनीवर रायपुर पोलीस ठाण्यात भादवी ची कलम 427 प्रमाणे एनसी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सैलानीत मार्गाच्या कामासाठी झालेल्या खोदकामामुळे घरासमोर 10 फुट खोल खड्डे पडले असून घरातील लहान,वयो व्रुद्ध लोकांना ये जा करण्यास मोठा त्रास होत आहे तर अनेक घर या खोदकामाने तकलादु झाले आहे व त्यांना धोका निर्माण झालेला आहे.अश्या घरात राहणारे लोक घाबरलेले आहे.या कडे एनएचए चे अधिकारी व ठेकेदाराने लक्ष देणे गरजेचे आहे.

बेलापूर  (प्रतिनिधी  )-  चांदेगाव  ता .राहुरी येथील एका इसमावर झोपेतच खूनी हल्ला करण्यात आला असुन त्या हल्ल्यातुन तो तरुण बालबाल बचावला त्याचेवर साखर कामगार रुग्णालयात उपचार चालु आहे        चांदेगाव भोसले वस्ती येथील गौतम मंजाबापु भोसले हे झोपेत असताना पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास तोडं बांधलेल्या व्यक्तीने घरात प्रवेश केला व गौतम यांचा गळा विळ्याच्या सहाय्याने कापण्याचा प्रयत्न  केला जागसुद असलेल्या गौतमने त्यास विरोध करुन पकडण्याचा प्रयत्न केला असता सदर ईसम विळा जागेवरच टाकुन पसार झाला जखमी गौतम यास तातडीने साखर कामगार हाँस्पिटलला दाखल करण्यात आले असुन त्याच्या गळ्याला चिरल्यामुळे २२ टाके पडले आहे गौतम हा जागा आसल्यामुळे थोडक्यात
बचावला हल्ला करणाराने नियोजन बध्द रितीने हल्ला  केल्याचे स्पष्ट होत आहे हल्ला करण्याकरीता नविन विळा आणलेला असुन तो खास विळी नेवासा येथील आणला असावा असे दिसते हा हल्ला नेमका कोणत्या हेतुने करण्यात आला हे स्पष्ट होत नसले तरी हल्ला करणाराचा हेतु हत्या करणे असल्याचे स्पष्ट होत आहे

नाशिक । प्रतिनिधी जिल्हा पुरवठा विभागाकडून रेशन दुकानदारांना विक्रीसाठी निकृष्ट दर्जाचा गहू प्राप्त झाला आहे. याबाबत दुकानदारांनी पुरवठा विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. ग्राहकांना निकृष्ट गहू मिळू नये यासाठी पुरवठा विभाग गहू बदलून देणार, अशी ग्वाही जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नरसीकर यांनी दिली.पुरवठा विभागाला पंजाब, हरयाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांतून खरेदी केलेला गहू वितरणासाठी प्राप्त होतो. मात्र पावसात भिजलेला गहू राज्याच्या माथी मारण्यात आला. गहू काळवंडलेला असला तरी तो खाण्यास चांगला असल्याची माहिती देत पुरवठा विभागाने या गव्हाचे वाटप करण्याचे निर्देश दिले होते. गव्हास मोठ्या प्रमाणावर सोंडे लागले आहेत. तसेच काही दुकानदारांना पीठ झालेला गहू विक्रीसाठी देण्यात आला आहे. हा गहू घेण्यास ग्राहकांनी नकार दिला. याबाबत तक्रारी केल्यानंतर पुरवठा विभाग खडबडून जागा झाला.दिंडोरी तालुक्यातील रेशन दुकानदारांनी प्राप्त झालेल्या गव्हाला सोंडे लागल्याचे व गव्हाचे पोत्यांमध्येच पीठ झाल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. नरसीकर यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी गणपत डोळसे पाटील, निवृत्ती कापसे, दिलीप नवले, अशोक बोराडे आदी उपस्थित होते.

अहमदनगर जिल्ह्यात अवैध धंद्याना उत आले असून हे सर्व धंदे सर्रासपणे चालविणाऱ्या लोकांना जणू पोलिसांची भीतीच उरली नसल्याचे प्रथमतः दिसून येत आहे.मुख्यतः शहरातील बाजार परिसरातील भर रस्त्यात व लहान लहान गल्लीबोळात सर्रासपणे मटका आकड्याचे  दुकानी मांडल्या जात असून याकडे मात्र पोलिसांचा अर्थपूर्ण कारणाने दुर्लक्ष असल्याने संभ्रम परिस्थिती निर्माण झालेली असल्याचे जागरूक नागरिकांकडून बोललेजात आहे.
     एकीकडे अहमदनगर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलिस अधीक्षक इशू सिधू साहेब आपल्या कार्यकर्तव्यामुळे जिल्ह्यात तालुक्यात सर्वदूर परिचित आहे. तर श्रीरामपुर शहरात अप्पर पोलीस अधीक्षका मा. दीपाली काळे  आहेत. यांनी राबविलेल्या विवीध उपक्रमामुळे ते लोकप्रिय झाले, परंतु अश्या कर्तव्यदक्ष म्हणून ओळखले जाणाऱ्या अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रातच मटका खेळणारे व खेळवणारे सर्वच सहजच दृष्टीस पडल्याशिवाय राहत नाही.सामान्य नागरिक या अवैध धंद्यांना आळा बसावा यासाठी आग्रहित आहे. अहमदनगर जिल्ह्यात सर्रास चालणारे अवैध मटका  व्यवसायवर संपूर्ण बंदी घालने कर्तव्यदक्ष अधीक्षक इशू सिधू साहेब यांच्या साठी काही मोठी गोष्ट नाही फक्त त्यांनी मनावर घेतले पाहिजे,अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त करत अशी मागणी केली आहे की,अहमदनगर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष अधीक्षक इशू सिधू साहेब यांनी विशेष लक्ष द्यावे.

अहमदनगर (प्रतिनिधी)  राहाता पोलिसांवर गावठी कट्ट्यातून गोळीबार करून पोलीस हवालदार अजित पठारे गंभीर जखमी केल्या प्रकरणातील पसार झालेल्या आणखी एका आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरे येथून अटक केली आहे. अमित उर्फ सुरेंद्र विजय सांगळे (वय- 35 रा. टाकळीमियाँ, ता. राहुरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.नोव्हेंबरला पोलीस हवालदार रशिद बादशहा शेख व अजित पठारे हे खाजगी दुचाकीवरून राहाता शहरात शासकीय नोटीस बजावण्यासाठी जात होते. दुपारीच्या वेळी चितळे रोडवर गर्दी असलेल्या ठिकाणी दोन इसम तोंडाला रुमाल बांधलेले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ते गंठणचोर असल्याचा पोलिसांना संशय आल्याने त्यांना अडविण्यात आले. त्यावेळी त्यांनी पोलिसांवर गावठी कट्ट्यातून गोळीबार केला. यात पोलीस पठारे हे गंभीर जखमी झाले होते.पोलिसांनी गावठी कट्ट्यासह आरोपी श्रीरामपुरातील शिरसगावच्या सचिन ताकेला ताब्यात घेतले होते. तर एक आरोपी पसार होता. याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखा या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना पसार आरोपी अमित सांगळे हा पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरे येथे असल्याची गुप्त बातमी पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली.स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक शिशीरकुमार देशमुख, पोलीस हवालदार सुनील चव्हाण, मनोहर गोसावी, रवींद्र कर्डिले, दत्ता गव्हाणे, संदीप पवार, संतोष लोढे, रवी सोनटक्के, दीपक शिंदे, संदीप दरंदले, मच्छिंद्र बर्डे, बबन बेरड, सचिन कोळेकर यांनी मिळून तळेगाव ढमढरे येथे सापळा लावून आरोपीस शिताफीने अटक केली. गुन्ह्याबातत त्याने कबूली दिली. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, श्रीरामपूरच्या अपर पोलीस अधीक्षक दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने केली.संगमनेर, राहुरी, लोणीत गुन्हे अटक केलेला आरोपी अमित सांगळे यांच्याकडे पोलिसांनी विचार केली असता इतर ठिकाणी गंठण चोरी केलेल्या गुन्ह्यांची उकल झाली. सांगळे याने गोळीबारात अटक केलेल्या आरोपी सचिन लक्ष्मण ताके यांच्या साथीने संगमनेर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत तीन, राहात्यातील लोणी आणि राहुरीत गंठण चोरी केल्याची कबुली दिली. याप्रकरणी संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget