Latest Post

सिल्लोड :प्रतिनिधी सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथे  सहाय्यक अभियंता प्रदीप निकम यांच्या आदेशाने वीज बिल वसुली व वीजचोरीवर कारवाई करण्यासाठी मागील तीन दिवसांपासून मोहीम सुरू होती.महावितरणचे वरिष्ठ तज्ञ  अंबादास कडूबा साखरे व कर्मचारी विजय सांडू पाडळे राजीव सांडू शिंदे साहेबराव लक्ष्मण सपकाळ आदि महावितरणचे कर्मचारी शनिवारी (दि.१६) दुपारी साडेबाराच्या सुमारास अंधारी येथील झोपडपट्टी भागांमध्ये वीजबिल वसुली व वीजचोरीवर कारवाई करीत असतांना अंधारी येथील विठ्ठल भिमराव तायडे हा आमच्याकडे आला व आम्हाला म्हणाला की तुम्ही वीजबिल कशी काय वसुली करता.वीजबिल वसुली करायची नाही ताबडतोब गावातून निघुन जा जर कोणी  थांबले तर हातपाय तोडून हातात देईल.परत आल्यास दगडाखाली मारेल अशा प्रकारच्या धमक्या देऊन दमदाटी केली व जीवे मारण्याची धमकी दिल्या व तेथून निघून गेला.या प्रकरणी भराडिचे वरिष्ठ तंत्रज्ञ अंबादास कडूबा साखरे यांच्या फिर्यादीवरून विठ्ठल भीमराव तायडे यांच्यावर सिल्लोड ग्रामीण पोलिस स्टेशनला एनसीआर दाखल करण्यात आला.



बेलापूर  (प्रतिनिधी  )- स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून सर्व सामान्य नागरीकांची सेवा करण्याची संधी मिळते हे लक्षात घेवुन अभिनव स्वय सहायता महीला बचत गटाने कार्य करावे अशी अपेक्षा पचायत समितीचे सभापती दिपक पटारे यांनी व्यक्त केली बेलापूर  ऐनतपुर येथील अभिनव महीला बचत गटाच्या स्वस्त धान्य दुकानाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  जिल्हा परिषद सदस्य शरद नवले हे होते तर प्रमुख  अतिथी म्हणून युवा नेते सिध्दार्थ मुरकुटे तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मसुर खान उपसभापती बाळासाहेब  तोरणे धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई  सचिव रज्जाक पठाण बनिंचद खरात माणिक जाधव उपस्थित  होते या वेळी बोलताना युवा नेते सिध्दार्थ मुरकुटे म्हणाले  की अतिशय कष्टाने या महीला बचत गटास धान्य दुकान मंजुर झाले आहे त्याकरीता बचत गटाच्या महीलांनी  मंत्रालया पर्यत  पाठपुरावा केला अनेक जण प्रत्यक्ष  व अप्रत्यक्षपणे त्यांच्या पाठीशी उभे राहीले आता ही दुकान कायम स्वरुपी मिळाली असुन मालाचे वाटप व्यवस्थित  करावे काही लोक खोट्या तक्रारी करतील परंतु काळजी करु नका १५ वर्ष राजकारण करताना विरोधकाला पाय ठेवु दिला  नाही असेही ते म्हणाले     या वेळी बोलताना जि प सदस्य शरद नवले म्हणाले की रामगड येथे आदिवासी संस्थेचे धान्य दुकान होते परंतु  काही लोकांनी तक्रारी करुन ते दुकान रद्द करण्यास भाग पाडले नंतर अधिकार्यांना हाताशी  धरुन ते दुकान स्वतःच्या पदरात पाडून घेतले या वेळी आभिनव महीला बचत गटावर अन्याय करण्यात आला होता त्यामुळे या महीलांनी न्यायाकरीता आयुक्तांचे दरवाजे ठोठावले परंतु तेथे राजकीय आर्थिक  ताकद वापरुन निकाल आपल्या बाजुने लावुन घेतला परंतु  मा नामदार राधाकृष्ण  विखे पाटील यांनी वैयक्तिक लक्ष घालुन या महीलांना न्याय मिळवुन दिला असुन हा न्याय म्हणजे सत्याचा विजय आहे काही जण निवडून आलेले नसतानाही गावगाडा हाकलत असल्याचा आव आणतात त्यांनी आगोदर  निवडून यावे असे अवाहनही शरद नवले यांनी केले असुन कुणाच्या पोटावर मारण्याचा प्रयत्न करु नका नियतीचा टोला समजत नसतो आता तरी सुधारा असेही ते म्हणाले या वेळी देविदास देसाई  पोलीस निरीक्षक मसुर खान    रज्जाक पठाण बाळासाहेब तोरणे आदिंनी आपले मनोगत  व्यक्त केले या वेळी प्रवासी संघटनेचे रणजित श्रीगोंड अजिज शेख गणेश भाकरे भास्कर बंगाळ पंचायत समीती सदस्य आरुण पा नाईक असगर शेख राजु शेख जाकीर शेख अय्याज सय्यद भगवान मोरे अरविंद साळवी मुस्ताक शेख यादव काळे करिमाबी सय्यद ईलियास शेख सद्दाम शेख मोनु शेख शफीक आतार सुहास शेलार शोएब शेख जिना शेख मुक्तार शेख जाकीर शेख सादीक शेख आसीफा शेख लतीफा शेख रुखसाना शेख नगीना शेख हसीना शेख उपस्थित  होते प्रास्ताविक बचत गटाच्या अध्यक्षा शबाना शेख यांनी केले तर रोशनी शेख यांनी आभार मानले

अहमदनगर (प्रतिनिधी)  पारनेर बस स्थानकाजवळ असलेल्या आंबेडकर चौकात जुन्या भांडणाच्या कारणावरून 22 वर्षीय तरुणावर दोघांनी तलवारीने खुनी हल्ला करत जखमी केल्याची घटना शुक्रवारी पहाटे साडेसहा वाजता घडली. जखमी झालेल्या तरुणाचे नाव सौरभ उर्फ बंडू भिमाजी मते असे आहे. त्याच्यावर नगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून पारनेर पोलीस ठाण्यात गणेश चंद्रकांत कावरे व संग्राम चंद्रकांत कावरे या दोघा भावांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरातील तरुणांच्या दोन गटांमध्ये गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. दोन्ही गटांकडून याअगोदर एकमेकांना बेदम मारहाण झाली होती त्याचेच रूपांतर बंडू मते याच्यावरील हल्ल्यात झाले. शुक्रवारी सकाळी बंडू मते हा आंबेडकर चौकातील चहाचे दुकान उघडून ते सुरू करण्याच्या तयारीत असतानाच दोघांनी त्याच्याशी वाद घालण्यात सुरुवात केली व वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन दोघांनी त्याच्या हातापायावर तलवार तसेच चॉपरने वार केले. दोघांच्या तावडीतून निसटण्याचा प्रयत्न केला मात्र पाठलाग करून दोघांनी डॉ. आंबेडकर स्मारकासमोर त्याच्यावर तलवार तसेच चॉपरने वार केले.घटनेची माहिती समजल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र गवळी यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी बंडू मते यास नगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविले. भांडणाच्या वादातून गणेश चंद्रकांत कावरे व संग्राम चंद्रकांत कावरे या दोघांनी हल्ला केल्या असल्याची प्राथमिक माहिती जखमी सौरभ मते यांनी पोलिसांना दिली असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. यासंबंधीची फिर्याद जखमीचे चुलते रामदास सोपान मते यांनी पारनेर पोलीस ठाण्यात दिली आहे. या फिर्यादीवरून वरील दोघा हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

श्रीरामपूर (प्रतिनिधी)राहता तालुक्यातील ममदापूर येथे काल रात्री अली बाबा दर्गा परिसरातील  भरवस्तीत  इस्माईल शहा यांच्या घरी दोन ते तीनच्या सुमारास चोरी झाली असून सदर कुटुंब तीन दिवसापूर्वी पासून लग्नासाठी बाहेरगावी गेले होते घटने दरम्यान चोरांनी शेजारील घरांच्या कड्या लावल्या होत्या तर बंद असलेल्या घराची कडी व कोंडा कटरच्या साह्याने कापून आत प्रवेश केला यात पन्नास हजाराच्या रोकड रकमेसह सोन्याचे कानातील झुबे मंगळसूत्र सोन्याची अंगठी चांदीच्या बांगड्या असा दोन तोळ्याचा मुद्देमाल लंपास केला आहे चोरी अतिशय चतुराईने केली असून भरवस्तीत हा प्रकार घडला आहे पोलिस प्रशासनाने रात्री गावात गस्त घालावी अशी मागणी येथील नागरिक वारंवार करत आहे ममदापूर परिसरात भुरट्या चोरांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे पोलीस प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी येथील स्थानिक नागरिक करत आहे फिर्यादीच्या नातेवाइकांनी लोणी पोलिस ठाण्यात जाऊन संपर्क केला असता कर्मचारी उपलब्ध नसल्याने दुपारी साडे अकरा पर्यंत पंचनामा करण्यात उशीर झाल्याचे नातेवाइकांकडून समजते
ममदापुर गावचे माजी सरपंच विद्यमान उपसरपंच पोलीस पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची केली पाहणी .

अहमदनगर : कोपर्डी अत्याचार व हत्याकांड प्रकरणातील तीनही नराधमांना अहमदनगर न्यायालयाकडून फाशीची शिक्षा ठोठावल्यानंतर या फाशीच्या शिक्षेबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे दाखल पुष्टी (कन्फर्मेशन) याचिकेवर सुनावणी होऊन खटला मुंबई उच्च न्यायालयाकडे वर्ग झाला आहे. १६ ऑक्टोबर रोजी औरंगाबाद खंडपीठात न्यायाधीश टी. व्ही. नलावडे व न्यायाधीश के. के. सोनवणे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. आता मुंबई उच्च न्यायालयात या बहुप्रतिक्षित खटल्यावर लवकरात लवकर सुनावणी होऊन आरोपींवरील फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होईल, अशी अपेक्षा सर्वचजण व्यक्त करत आहेत. पीडिता कुटुंबीयांच्या मागणीनुसार या महत्त्वपूर्ण खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उमेशचंद्र यादव काम पाहत आहेत.

नाशिक । प्रतिनिधी:राज्यात राष्ट्रपती राजवटीमुळे पालकमंत्री तथा मंत्र्यांना असणारे धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. पाटबंधारे विभागाच्या प्रकल्पांमध्ये असलेल्या पाण्याचे बिगर सिंचनासाठी वाटप करण्याचे अधिकार आता जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहेत, तर सिंचनासाठीचे वाटप अधिकार पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना राहणार आहेत. राज्यात विधानसभा भंग झाली असून राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. या कालावधीत राज्यांच्या मुख्य सचिवांना मुख्यमंत्र्यांचे अधिकार असतील. सचिवांमार्फत राज्याचा कारभार चालवला जाणार आहे. ऑक्टोबरमध्ये पाणी आरक्षण बैठक होत असते. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या बैठकीत जिल्ह्याचे पाणीवाटप नियोजन केले जाते. मात्र, यंदा राष्ट्रपती राजवटीमुळे हे निर्णय घेण्याचे अधिकार प्रशासनाला देण्यात आले आहेत. शासनाने राज्यातील पाटबंधारे विभागाच्या जलाशयांबद्दल तातडीने आदेश काढला आहे. बिगर सिंचनाच्या पाण्याचे वाटप करण्यासाठी तसेच आरक्षणासाठी जिल्हास्तरीय समितीला कायदेशीर अधिकार आहेत. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेली समिती याबाबत निर्णय घेत असते, तर सिंचनासाठीचे पाणी आरक्षित ठेवण्याबाबत जलसंपदा राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील समिती निर्णय घेत असते. पाण्याचे आरक्षण गेल्या काही दिवसांत वादग्रस्त ठरत असल्याने या बैठकाही गाजत आहेत. यावर्षीचे पाणीवाटप व आरक्षणही वादाचा विषय होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. मात्र आरक्षण वेळेत करणे गरजेचे असल्याने शासनाने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यानुसार प्रशासकीय अधिकार्‍यांना याबाबतचे अधिकार देण्यात आले आहेत.

श्रीरामपूर (प्रतिनिधी)नगर-मनमाड रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहे. शिर्डी-राहाता या बाह्यवळण रस्त्यावर दररोज अपघात होतात. खड्ड्यामुळे नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदार व शासकीय अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. अशी मागणी खासदार सदाशिव लोखंडे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे यांच्याकडे केली. खा. लोखंडे यांनी यासंदर्भात अप्पर पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले.शिर्डी-राहता बाह्यवळण रस्त्यावरील खड्ड्यामुळे सूरज एकनाथ वाणी व दगडू माधव गोर्डे यांचा मृत्यू झाला होता. त्यास जागतिक बॅक प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता अंकुश पालवे, कार्यकारी अभियंता एन. एन. राजगुरु, सार्वजनिक बांधकान विभागाचे अधीक्षक अभियंता पी. बी. भोसले, अधीक्षक अभियंता जी. एस. मोहिते, सुप्रिम इन्फ्रा कंपनीचे विक्रम शर्मा हे अधिकारी व ठेेकेदार जबाबदार असून त्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पालक नवनाथ गणपत वाणी (रा. नादुर्खी, ता. राहता). गंगाधर शंकर गमे (रा. केलवड, ता. राहता) यांनी अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे यांच्याकडे केली.खासदार लोखंडे यांनी त्या संदर्भात राज्याचे सार्वजनिक बांधकाम सचिव व जिल्हाधिकारी यांच्याशी याबाबत चर्चा करुन माहिती दिली. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे अनेक अपघात होतात. वाहनांचे नुकसान होते. अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याने या प्रकारात ठेकेदार व अधिकार्‍यांना जबाबदार धरुन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. जिल्हाधिकारी यांनी त्यास संदर्भात श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार दाखल करावी, असे सांगितल्यावरुन खासदार लोखंडे यांच्यासमवेत येऊन वाणी व गमे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे यांच्याकडे फिर्याद नोंदविण्याची मागणी केली.या रस्त्यावर मोठमोठे खड्डे असतानाही टोल वसुली केली जात होती. खासदार लोखंडे यांनी आंदोलन करुन निर्मळपिंप्री येथील टोल नाका बंद पाडला होता. खड्डे बुजविल्याशिवाय टोल चालु करणार नाही. असे सांगितले. दोन दिवसांनी ठेकेदाराने खासदार सुजय विखे यांची भेट घेतली. भेटीनंतर पुन्हा टोल नाका सुरु केला. टोल नाका सुरु झाल्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी पुन्हा आंदोलन करुन निषेध व्यक्त केला. टोल नाक्यावर पोलिस उपाधिक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी पोलीस बंदोबस्त पुरविला. ठेकेदारांनी बाऊर उभे केले. अशी तक्रार लोखंडे यांनी केली.यासंदर्भात लोखंडे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. खड्डे न बुजविता टोल वसुलीसाठी पोलीस बंदोबस्त पुरविला जातो. मात्र इतर वेळी पोलीस तत्परता दर्शवीत नाही, जिव गमविलेल्या नागरिकांना न्याय मिळत नाही. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी प्रमाणिक अधिकार्‍याची नेमणुक करावी. संबंधित ठेकेदारांसह अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करावे. अशी आग्रही मागणी लोखंडे केली. अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे यांनी तत्काळ याप्रकरणी राहता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांची नेमणूक केली. चौकशी करुन तत्काळ अहवाल सादर करावा. अशा सूचना दिल्या. त्याचा अहवाल येताच उचित कारवाई करणार असल्याचे आश्वासन दीपाली काळे यांनी दिले. यावेळी शिवसेनेचे राजेंद्र देवकर, तालुका प्रमुख दादासाहेब कोकणे, सुधीर वायखिंडे, अतुल शेटे, संदिप दातीर, नानासाहेब बडाख, सोमनाथ पाबळे आदी उपस्थित होते.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget