सिल्लोड :प्रतिनिधी सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथे सहाय्यक अभियंता प्रदीप निकम यांच्या आदेशाने वीज बिल वसुली व वीजचोरीवर कारवाई करण्यासाठी मागील तीन दिवसांपासून मोहीम सुरू होती.महावितरणचे वरिष्ठ तज्ञ अंबादास कडूबा साखरे व कर्मचारी विजय सांडू पाडळे राजीव सांडू शिंदे साहेबराव लक्ष्मण सपकाळ आदि महावितरणचे कर्मचारी शनिवारी (दि.१६) दुपारी साडेबाराच्या सुमारास अंधारी येथील झोपडपट्टी भागांमध्ये वीजबिल वसुली व वीजचोरीवर कारवाई करीत असतांना अंधारी येथील विठ्ठल भिमराव तायडे हा आमच्याकडे आला व आम्हाला म्हणाला की तुम्ही वीजबिल कशी काय वसुली करता.वीजबिल वसुली करायची नाही ताबडतोब गावातून निघुन जा जर कोणी थांबले तर हातपाय तोडून हातात देईल.परत आल्यास दगडाखाली मारेल अशा प्रकारच्या धमक्या देऊन दमदाटी केली व जीवे मारण्याची धमकी दिल्या व तेथून निघून गेला.या प्रकरणी भराडिचे वरिष्ठ तंत्रज्ञ अंबादास कडूबा साखरे यांच्या फिर्यादीवरून विठ्ठल भीमराव तायडे यांच्यावर सिल्लोड ग्रामीण पोलिस स्टेशनला एनसीआर दाखल करण्यात आला.
Post a Comment