चोरीचा आरोप असणारा वॉचमन निर्दोष,एमआयडीसीतील स्विचगेअर प्रायव्हेट कंपनी चोरी प्रकरणाला नवी दिशा चौघांना अटक.

अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसीतील स्विचगेअर प्रायव्हेट कंपनीतून कंपनीच्या वॉचमनने चोरी केली असून तो दुसर्‍याने चोरी केल्याचा बनाव करत आहे, अशी तक्रार कंपनीच्या मालकाने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र, एमआयडीसी पोलीसांनी तपास केला असता, चोरीसंदर्भात वॉचमनचा बनाव नसल्याचे समोर आले असून चोरी करणार्‍या चौघांना अटक केली असून अन्य चौघे फरार आहे. या प्रकारात मात्र, विनाकारण वॉचमन नोकरीला मुकला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी, सुधीर परशुराम पटवर्धन यांच्या मालकीची एमआयडीसीमध्ये स्विचगेअर प्रायव्हेट कंपनी आहे. या कंपनीत विष्णू रावजी चोरमले (रा. शेवगाव, हल्ली रा. निंबळक बायपासरोड, एमआयडीसी) हा वॉचमन म्हणून नोकरीला होता. 25 ऑक्टोबरचे रात्री साडेआकरा ते 26 ऑक्टोबरचे साडेबाराच्या दरम्यान कंपनीमधून कॉपर वायर, ब्रास कॉईल, सीसीटीव्ही डीव्हीआर असा 4 लाख 14 हजार 850 रूपयांचा मुद्देमाल चोरीला गेला. यावेळी चोरमले हा कामावर होता. त्याला चोराने मारहाण केली होती.कंपनीचे मालक पटवर्धन यांना चोरमले यानेच चोरी केल्याचा संशय आला. तो बनाव करत आहे. त्यांनी याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरमले व त्याच्या अन्य साथीदाराविरोधात फिर्याद दिली. मालकाने चोरमले याला कंपनीतून काढून टाकले. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक पवन सुपनर हे या गुन्हाचा तपास करत होते.यावेळी त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली, हा गुन्हा अन्य व्यक्तींनी केला आहे. त्यादृष्टीकोनातून तपास झाला. यामध्ये चोरी करणारे भिमा सोपान मिरगे (रा. सावडी), कैलास राजेंद्र जाधव (रा. बोल्हेगाव), अजय सोपान गुळवे (रा. नालेगाव) व सागर मच्छिंद्र वाघमारे (रा. निंबळक) यांना अटक केली आहे. तर संतोष धोत्रे व पप्पू उर्फ गोरख संभाजी जाधव हे फरार आहेत. बबलू उर्फ पीर मोहम्मद शेख, सुंदर खंडागळे यांनी चोरीचा माल खरेदी केला ते पण फरार आहे. एमआयडीसी पोलीस त्यांचा शोध घेत आहे. अटक केलेल्या चौघांकडून एक लाख 6 हजार 100 रूपये किंमतीचे ब्रास कॉईल व कॉपर कॉईल हस्तगत केले आहे. चोरी दुसर्‍याने केली असली तरी यामध्ये वॉचमनची नोकरी गेली आहे. त्याला दुसरीकडे नोकरी देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक बोरसे यांनी सांगितले. हा गुन्हाचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, शहर पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बोरसे, उपनिरीक्षक पवन सुपनर, पोलीस नाईक देवेद्र पंढारकर, चव्हाण, नवले यांनी केला.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget