बेलापूर (प्रतिनिधी )- स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून सर्व सामान्य नागरीकांची सेवा करण्याची संधी मिळते हे लक्षात घेवुन अभिनव स्वय सहायता महीला बचत गटाने कार्य करावे अशी अपेक्षा पचायत समितीचे सभापती दिपक पटारे यांनी व्यक्त केली बेलापूर ऐनतपुर येथील अभिनव महीला बचत गटाच्या स्वस्त धान्य दुकानाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून युवा नेते सिध्दार्थ मुरकुटे तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मसुर खान उपसभापती बाळासाहेब तोरणे धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई सचिव रज्जाक पठाण बनिंचद खरात माणिक जाधव उपस्थित होते या वेळी बोलताना युवा नेते सिध्दार्थ मुरकुटे म्हणाले की अतिशय कष्टाने या महीला बचत गटास धान्य दुकान मंजुर झाले आहे त्याकरीता बचत गटाच्या महीलांनी मंत्रालया पर्यत पाठपुरावा केला अनेक जण प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे त्यांच्या पाठीशी उभे राहीले आता ही दुकान कायम स्वरुपी मिळाली असुन मालाचे वाटप व्यवस्थित करावे काही लोक खोट्या तक्रारी करतील परंतु काळजी करु नका १५ वर्ष राजकारण करताना विरोधकाला पाय ठेवु दिला नाही असेही ते म्हणाले या वेळी बोलताना जि प सदस्य शरद नवले म्हणाले की रामगड येथे आदिवासी संस्थेचे धान्य दुकान होते परंतु काही लोकांनी तक्रारी करुन ते दुकान रद्द करण्यास भाग पाडले नंतर अधिकार्यांना हाताशी धरुन ते दुकान स्वतःच्या पदरात पाडून घेतले या वेळी आभिनव महीला बचत गटावर अन्याय करण्यात आला होता त्यामुळे या महीलांनी न्यायाकरीता आयुक्तांचे दरवाजे ठोठावले परंतु तेथे राजकीय आर्थिक ताकद वापरुन निकाल आपल्या बाजुने लावुन घेतला परंतु मा नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी वैयक्तिक लक्ष घालुन या महीलांना न्याय मिळवुन दिला असुन हा न्याय म्हणजे सत्याचा विजय आहे काही जण निवडून आलेले नसतानाही गावगाडा हाकलत असल्याचा आव आणतात त्यांनी आगोदर निवडून यावे असे अवाहनही शरद नवले यांनी केले असुन कुणाच्या पोटावर मारण्याचा प्रयत्न करु नका नियतीचा टोला समजत नसतो आता तरी सुधारा असेही ते म्हणाले या वेळी देविदास देसाई पोलीस निरीक्षक मसुर खान रज्जाक पठाण बाळासाहेब तोरणे आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले या वेळी प्रवासी संघटनेचे रणजित श्रीगोंड अजिज शेख गणेश भाकरे भास्कर बंगाळ पंचायत समीती सदस्य आरुण पा नाईक असगर शेख राजु शेख जाकीर शेख अय्याज सय्यद भगवान मोरे अरविंद साळवी मुस्ताक शेख यादव काळे करिमाबी सय्यद ईलियास शेख सद्दाम शेख मोनु शेख शफीक आतार सुहास शेलार शोएब शेख जिना शेख मुक्तार शेख जाकीर शेख सादीक शेख आसीफा शेख लतीफा शेख रुखसाना शेख नगीना शेख हसीना शेख उपस्थित होते प्रास्ताविक बचत गटाच्या अध्यक्षा शबाना शेख यांनी केले तर रोशनी शेख यांनी आभार मानले
Post a Comment