ठेकेदार व अधिकार्‍यांविरुध्द गुन्हे दाखल करा.खासदार सदाशिव लोखंडे यांचे अप्पर पोलीस अधीक्षक काळे यांना निवेदन.

श्रीरामपूर (प्रतिनिधी)नगर-मनमाड रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहे. शिर्डी-राहाता या बाह्यवळण रस्त्यावर दररोज अपघात होतात. खड्ड्यामुळे नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदार व शासकीय अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. अशी मागणी खासदार सदाशिव लोखंडे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे यांच्याकडे केली. खा. लोखंडे यांनी यासंदर्भात अप्पर पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले.शिर्डी-राहता बाह्यवळण रस्त्यावरील खड्ड्यामुळे सूरज एकनाथ वाणी व दगडू माधव गोर्डे यांचा मृत्यू झाला होता. त्यास जागतिक बॅक प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता अंकुश पालवे, कार्यकारी अभियंता एन. एन. राजगुरु, सार्वजनिक बांधकान विभागाचे अधीक्षक अभियंता पी. बी. भोसले, अधीक्षक अभियंता जी. एस. मोहिते, सुप्रिम इन्फ्रा कंपनीचे विक्रम शर्मा हे अधिकारी व ठेेकेदार जबाबदार असून त्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पालक नवनाथ गणपत वाणी (रा. नादुर्खी, ता. राहता). गंगाधर शंकर गमे (रा. केलवड, ता. राहता) यांनी अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे यांच्याकडे केली.खासदार लोखंडे यांनी त्या संदर्भात राज्याचे सार्वजनिक बांधकाम सचिव व जिल्हाधिकारी यांच्याशी याबाबत चर्चा करुन माहिती दिली. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे अनेक अपघात होतात. वाहनांचे नुकसान होते. अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याने या प्रकारात ठेकेदार व अधिकार्‍यांना जबाबदार धरुन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. जिल्हाधिकारी यांनी त्यास संदर्भात श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार दाखल करावी, असे सांगितल्यावरुन खासदार लोखंडे यांच्यासमवेत येऊन वाणी व गमे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे यांच्याकडे फिर्याद नोंदविण्याची मागणी केली.या रस्त्यावर मोठमोठे खड्डे असतानाही टोल वसुली केली जात होती. खासदार लोखंडे यांनी आंदोलन करुन निर्मळपिंप्री येथील टोल नाका बंद पाडला होता. खड्डे बुजविल्याशिवाय टोल चालु करणार नाही. असे सांगितले. दोन दिवसांनी ठेकेदाराने खासदार सुजय विखे यांची भेट घेतली. भेटीनंतर पुन्हा टोल नाका सुरु केला. टोल नाका सुरु झाल्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी पुन्हा आंदोलन करुन निषेध व्यक्त केला. टोल नाक्यावर पोलिस उपाधिक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी पोलीस बंदोबस्त पुरविला. ठेकेदारांनी बाऊर उभे केले. अशी तक्रार लोखंडे यांनी केली.यासंदर्भात लोखंडे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. खड्डे न बुजविता टोल वसुलीसाठी पोलीस बंदोबस्त पुरविला जातो. मात्र इतर वेळी पोलीस तत्परता दर्शवीत नाही, जिव गमविलेल्या नागरिकांना न्याय मिळत नाही. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी प्रमाणिक अधिकार्‍याची नेमणुक करावी. संबंधित ठेकेदारांसह अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करावे. अशी आग्रही मागणी लोखंडे केली. अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे यांनी तत्काळ याप्रकरणी राहता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांची नेमणूक केली. चौकशी करुन तत्काळ अहवाल सादर करावा. अशा सूचना दिल्या. त्याचा अहवाल येताच उचित कारवाई करणार असल्याचे आश्वासन दीपाली काळे यांनी दिले. यावेळी शिवसेनेचे राजेंद्र देवकर, तालुका प्रमुख दादासाहेब कोकणे, सुधीर वायखिंडे, अतुल शेटे, संदिप दातीर, नानासाहेब बडाख, सोमनाथ पाबळे आदी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget