Latest Post

बेलापूर   (प्रतिनिधी  )--सर्व धर्म समभाव ही मुस्लिम धर्माचे संस्थापक हजरत मोहंम्मद पैगंबर यांची शिकवण आहे त्यानुसारच गावातील सर्व बांधवानी जातीय सलोखा ठेवला व भविष्यातही ठेवावा असे अवाहन हाजी ईस्माईल शेख यांनी केले     मोहमंद पैगबर जयंती निमित्त बेलापूर येथील जामा मस्जिद येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते या वेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य शरद नवले उपसरपंच रविंद्र  खटोड सुधीर नवले आदि प्रमुख  अतिथी उपस्थित  होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हाजी बहोद्दीन सय्यद हे होते  प्रारंभी  ईदगाह मैदाना पासुन मिरवणुकीस प्रारंभ झाला झेंडा चौकात आल्यावर मिठाई वाटण्यात आली या वेळी अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे  तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रकाश कुर्हे हवालदार अतुल लोटके यांनी मिरवणुकीचे स्वागत केले त्यानंतर जामा मस्जिद येथे कार्यक्रम संपन्न् झाला लहान मुलांची मोहंमद पैगंबर यांच्या जिवनावर भाषणे झाली त्यानंतर बोलताना जिल्हा परीषद सदस्य शरद नवले यानी सांगितले की मोहंमद पैगंबरांनी जगाला शांततेचा संदेश दिला आहे पैगंबरांची शिकवण आचरणात आणण्याची गरज आहे  या वेळी उपसरपंच रविंद्र खटोड सुधीर नवले यांनीही मनोगत व्यक्त केले या वेळी जाफरभाई आतार अजिज शेख रफीक शेख अतिश देसर्डा पोलीस काँ .बाळासाहेब  गुंजाळ निखील तमनर पोपट भोईटे उपस्थित  होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी शहारुख आतार अय्याज सय्यद कौसर सय्यद मुन्ना बागवान जब्बार आतार समीर जहागीरदार यांनी विशेष प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मोहसीन सय्यद यांनी केले तरअब्रार शफीक आतार यांनी आभार मानले

बुलढाणा- 9 नोव्हे
चिखली शहरात अवैध धंद्याना उत आले असून हे धंदे सर्रासपणे चालविणाऱ्या लोकांना जणू पोलिसांची भीतीच उरली नसल्याचे प्रथमतः दिसून येत आहे.मुख्यतः शहरातील बाजार परिसरातील भर रस्त्यात व लहान लहान गल्लीबोळात सर्रासपणे वरली मटक्याचे आकडे मांडल्या जात असून याकडे मात्र पोलिसांचा अर्थपूर्ण कारणाने दुर्लक्ष असल्याने संभ्रम परिस्थिती निर्माण झालेली असल्याचे जागरूक नागरिक बोलत आहे.
     एकीकडे चिखलीचे कर्तव्यदक्ष ठाणेदार गुलाबराव वाघ हे आपल्या कार्यकर्तव्यामुळे तालुक्यात सर्वदूर परिचित आहे. चिखली शहरात ठाणेदार गुलाबराव वाघ यांनी राबविलेल्या विवीध उपक्रमामुळे ते लोकप्रिय झाले, परंतु अश्या कर्तव्यदक्ष म्हणून ओळखले जाणाऱ्या अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रातच वरली मटका खेळणारे व खेळवणारे सर्वच सहजच दृष्टीस पडल्याशिवाय राहत नाही.सामान्य नागरिक या अवैध धंद्यांना आळा बसावा यासाठी आग्रहित आहे.या अवैध धंद्यामुळे नेहमी बाजार खरेदीसाठी जाणाऱ्या महिलांना नाहक त्रास सहन करावाच लागतो. तसेच या ठिकाणी वरली खेळणाऱ्या लोकांमधील देवाणघेवाण होत असतांना नेहमी वाद ही होतातच तर कधी कधी या वादाचे स्वरूप भांडणात व हाणामारीत परिवर्तीत होऊन बाजारातील दुकानदार, बाजार करण्यास येणारे लोकांना व महिला व लहान मुलांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागतो.
    चिखली शहरात सर्रास चालणारे अवैध वरली व्यवसायवर संपूर्ण बंदी घालने ठानेदार वाघ यांच्या साठी काही मोठी गोष्ट नाही फक्त त्यांनी मनावर घेतले पाहिजे,अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त करता अशी मागणी केली की,उपविभागीय पोलीस अधिकारी बरकते, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटिल भुजबळ यांनी विशेष लक्ष द्यावे.

बेलापुर प्रतिनिधी-- अयोध्याप्रश्नी निकाल हा कोणत्याही धार्मिक समुदायाने आपल्या विरोधात किंवा आपल्या बाजूने लागला आहे असा ग्रह करू नये .तो आपल्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचा असून आपण त्याचा मान राखून स्वीकारावा , , ,असे अवाहन उपविभागीय पोलिस अधीकारी   राहुल मदने यांनी केले आहे   
मोहम्मंद पैगंबर जयंती  वआयोध्या प्रश्नी  निकालाबाबत नागरीकात  संभ्रम पसरवु नये या करीता बेलापूरातील औट पोस्ट येथे शांतता कमीटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते  .
पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे यांनी अयोध्या प्रश्न हा राजकीय नसून न्यायालयीन बनलेला आहे ,त्यामुळे देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करावे ,असे सांगितले ,
तर पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट यांनी बेलापूर च्या नागरिकांचे विशेष कौतुक करून आजपर्यंत कुठल्याही धार्मीक कार्यक्रम असो वा मिरवणूकी दरम्यान  शांतता व सुव्यवस्था राखणे कामी बेलापूरच्या नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य केले आहे व यापुढेही करतील ,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला..
या वेळी  सुनील मुथा  संघाचे मारुती राशीनकर , रणजीत श्रीगोड ,देविदास देसाई, नवनाथ कुताळ, 
प्रा. ज्ञानेश गवले, अतिष देसर्डा,
दिपक क्षत्रिय,दिलीप दायमा,तंटामुक्तीचे अध्यक्ष  प्रकाश कुर्हे अशोक गवते ,जिल्हा परिषद सदस्य शरद नवले , प .स  सदस्य अरुण पा. नाईक ,मार्केट कमिटी सदस्य सुधीर नवले ,अभिषेक खंडागळे ,  भरत साळुंके,उपसरपंच रविंद्र खटोड,लहानुभाऊ नागले ,आलम शेख,जिना शेख,दस्तगिर शेख,प्रा अशोक बडधे मोहसीन सय्यद हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक गणेश भिंगारदे  निखील तमनर पोपट भोईटे  इ.हजर होते.काँ बाळासाहेब  गुंजाळ यांनी आभार मानले

श्रीगोंदा (प्रतिनिधी) श्रीगोंदा पोलिसांच्या पथकाने घोगरगाव परिसरात अतुल रघुनाथ आगरकरला ताब्यात घेतले तो बनावट नोटा देऊन सोने खरेदी करणार होता. त्याच्याकडिल दोन लाख 73 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या असून ही बनावट नोटांची लिंक थेट बारामतीपर्यंत असून श्रीकांत सदाशिव माने (रा.बारामती) याने या बनावट नोटा दिल्या होत्या. माने याला पोलिसांनी ताब्यात घेतले. या दोघांना श्रीगोंदा न्यायालयासमोर हजर केले असता 12 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.श्रीगोंदा पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गावीत यांच्या पथकाने हा सापळा रचला होता. यात बनावट नोटा घेऊन आलेली ही व्यक्ती 2 लाख 83 हजार रुपये बनावट देऊन सोने खरेदी करणार होती. काळ्या रंगाच्या गाडी मध्ये आलेला अतुल रघुनाथ आगरकर रा.जवळेवाडी, सुपा, हा बनावट नोटा रक्कम रुपये 283000 बाळगताना मिळाला. त्यात 2000 रुपये दराच्या 92 व 500 दराच्या 199 नोटा बनावट बाळगताना सापडला होता त्याने सांगितल्याप्रमाणे पथकाने बारामती येथे श्रीकांत सदाशिव माने याला ताब्यात घेतले या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले त्यांना 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.आरोपी बड्या घरचेपकडण्यात आलेल्या आरोपीकडे आलिशान गाडी असून बारामतीमध्ये ताब्यात घेतलेला आरोपी बड्या घरचा आहे.रात्री या आरोपीला ताब्यात घेतल्यावर बराच गोंधळ आरोपीने केला असल्याचे सांगण्यात आले .पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेऊन बारामती पोलीस स्टेशनला माहिती दिली.बनावट नोटा छापल्या कुठे ? श्रीगोंदा पोलिसांच्या पथकाने या बनावट नोटा ताब्यात घेतल्या यात दोघांना ताब्यात घेतले असले तरी या बनावट नोटा छापणारी टोळी नेमकी कुठली आहे याचा तपास सुरू आहे.यात काही महिलांचा समावेश देखील असण्याची शक्यता आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- शहरातील कांदा मार्केट परिसरातून ट्रक चालक व क्लिनरची लूट केल्याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांनी पाच दरोडेखोरांच्या टोळीला अटक केली आहे. दि. 11  रोजी रात्री विरप्पा बनेप्पा जोगी (रा. बसवाना, जि. विजापूर, राज्य कर्नाटक) यांनी त्यांची अशोक लेलॅण्ड ट्रक (क्र. टी.एस. 10 बी.क्यु.9269) ही कांदा मार्केट परिसरात उभी केली होती. त्यावेळी आरोपी आकाश दिनकर सौदागर, धम्मा ज्ञानदेव पटाईत, अजय विजय खंदारे, प्रकाश अरुण समुद्रे व किरण जगन्नाथ चिकणे (सर्व रा. भीमनगर, वॉर्ड नं. 6, श्रीरामपूर) यांनी ट्रक ड्रायव्हर, क्लिनरला मारहाण करून 1500 रुपये रोख रक्कम, कपडे, गाडीची चावी, एटीएम कार्ड असा माल मारहाण करून चोरून नेला.यावेळी ट्रक ड्रायव्हर व क्लिनरने आरडाओरड केल्याने रात्री गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांनी याठिकाणी येऊन काही आरोपींना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी दोन पथके रवाना करून आरोपींचा परिसरात शोध सुरू करून आरोपींना रोख रकमेसह ताब्यात घेतले असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.पोलीस निरीक्षक श्रीहरि बहिरट, सपोनि संभाजी पाटील, पोसई दत्तात्रय उजे, पोहेकॉ. जालिंदर लोंढे, पोना सोमनाथ गाडेकर, रामेश्वर ढोकणे, किशोर जाधव, गणेश वावडे, महेंद्र पवार, हरिष पानसंबळ, सुनील दिघे, पंकज गोसावी, अर्जून पोकळे यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली.

बुलढाणा- 7 नवंबर
एक खेत स्थित कुएं में तेंदुए के 2 शावक गिरे हुए थे जिन्हें ग्रामस्थों की मदद से वनविभाग ने कुएं से बाहर तो निकाला किंतु एक शावक की मौत हो गई है.
      प्राप्त जानकारी के अनुसार मोताला तहसील अंतर्गत के ग्राम कालेगांव तपोवन के पास किसान झिप्रा नत्थू पावर के गुट क्र.70 स्थित खेत मे मौजूद कुएं में आज 7 नवंबर को 2 तेंदुए के शावक गिरे हुए नज़र आए जो आपने आपको पानी मे डूबने से बचाने के लिए जद्दोजहद कर रहे थे.इस घटना की सूचना मोताला रेंज के आरएफओ कोंडावार को मिलते ही उन्होंने तत्काल वनकर्मियों को भेजा जिन्होंने दोनों शावकों को कुएं से बाहर निकाला किंतु एक शावक की मौत हो गई थी.जीवीत शावक को मोताला रेंज कार्यालय में लाया गया जिसपर पशु वैद्यकीय अधिकारी ने उपचार किया जबकि मृत शावक का पोस्टमार्टम कर उसे जला दिया गया इस समय एसीएफ आर.आर.गायकवाड, आरएफओ कोंडावार सहित अन्य कर्मी भी मौजूद थे.4 से 5 माह के ये शावक कुएं में कैसे गिरे ये पता नही चल पाया है.
       जिंदा बचे शावक को अब उसी स्थान पर ले जाया गया है ताकि उसका मिलन अपनी मां से हो जाए. इस काम के लिए वन अधिकारी सहित रेस्क्यु टीम के राहुल चौहान,ईश्वर गवारगुरु,मेरत,संदीप मडावी भी पहोंचे है. रात में उक्त स्थान पर रुकर शावक की माँ के आने का इंतज़ार वन कर्मियों को करना पडेगा.

मुंबई : वृत्तसंस्था अनेक ठिकाणी जगभरातल्या मोठमोठ्या ब्रॅण्ड्सच्या नावाने बनावट वस्तूंची विक्री केली जाते. त्यासाठी संबंधित कंपन्यांसारखे पॅकेजिंग केले जाते. अशाप्रकारे फसवणूक करणाऱ्या संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ओरिजनल कंपनीसारखे पॅकेजिंग करण्यासाठी या मालाचा वापर केला जात असल्याचा संशय असून यामध्ये सुमारे 25 कोटी रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे.भिवंडी तालुक्यातील वळपाडा येथे पोलिसांनी ही कारवाई केली. कारवाईत कॅनॉन, सॅमसंग, व इपसॉन या नामवंत इलेक्ट्रॉनिक कंपन्यांच्या वस्तूंचे बनावट पॅकेजिंग केले जात असल्याचे समोरे आले असून यात जवळपास 25 कोटींहून अधिक रक्कमेचे पुठ्ठ्याचे साहित्य तसेच बनावट वेष्टन पोलिसांनी जप्त केले.याप्रकरणी एका संशयितास ताब्यात घेतल्याची माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. किशोर आंबा बेरा (28) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.संबंधित गोदामात अनधिकृतपणे पॅकेजिंग साहित्य ठेवण्यात आले असल्याची माहिती भिवंडीचे पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार नारपोली पोलिसांच्या मदतीने घटनास्थळी छापा टाकून सदरचा मुद्देमाल जप्त केला. संशयितांवर कॉपिराईट अॅक्ट 1957 चे कलम 51 आणि कलम 63 अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget