बेलापूर (प्रतिनिधी )--सर्व धर्म समभाव ही मुस्लिम धर्माचे संस्थापक हजरत मोहंम्मद पैगंबर यांची शिकवण आहे त्यानुसारच गावातील सर्व बांधवानी जातीय सलोखा ठेवला व भविष्यातही ठेवावा असे अवाहन हाजी ईस्माईल शेख यांनी केले मोहमंद पैगबर जयंती निमित्त बेलापूर येथील जामा मस्जिद येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते या वेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य शरद नवले उपसरपंच रविंद्र खटोड सुधीर नवले आदि प्रमुख अतिथी उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हाजी बहोद्दीन सय्यद हे होते प्रारंभी ईदगाह मैदाना पासुन मिरवणुकीस प्रारंभ झाला झेंडा चौकात आल्यावर मिठाई वाटण्यात आली या वेळी अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रकाश कुर्हे हवालदार अतुल लोटके यांनी मिरवणुकीचे स्वागत केले त्यानंतर जामा मस्जिद येथे कार्यक्रम संपन्न् झाला लहान मुलांची मोहंमद पैगंबर यांच्या जिवनावर भाषणे झाली त्यानंतर बोलताना जिल्हा परीषद सदस्य शरद नवले यानी सांगितले की मोहंमद पैगंबरांनी जगाला शांततेचा संदेश दिला आहे पैगंबरांची शिकवण आचरणात आणण्याची गरज आहे या वेळी उपसरपंच रविंद्र खटोड सुधीर नवले यांनीही मनोगत व्यक्त केले या वेळी जाफरभाई आतार अजिज शेख रफीक शेख अतिश देसर्डा पोलीस काँ .बाळासाहेब गुंजाळ निखील तमनर पोपट भोईटे उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी शहारुख आतार अय्याज सय्यद कौसर सय्यद मुन्ना बागवान जब्बार आतार समीर जहागीरदार यांनी विशेष प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मोहसीन सय्यद यांनी केले तरअब्रार शफीक आतार यांनी आभार मानले
Post a Comment