बुलढाणा- 9 नोव्हे
चिखली शहरात अवैध धंद्याना उत आले असून हे धंदे सर्रासपणे चालविणाऱ्या लोकांना जणू पोलिसांची भीतीच उरली नसल्याचे प्रथमतः दिसून येत आहे.मुख्यतः शहरातील बाजार परिसरातील भर रस्त्यात व लहान लहान गल्लीबोळात सर्रासपणे वरली मटक्याचे आकडे मांडल्या जात असून याकडे मात्र पोलिसांचा अर्थपूर्ण कारणाने दुर्लक्ष असल्याने संभ्रम परिस्थिती निर्माण झालेली असल्याचे जागरूक नागरिक बोलत आहे.
एकीकडे चिखलीचे कर्तव्यदक्ष ठाणेदार गुलाबराव वाघ हे आपल्या कार्यकर्तव्यामुळे तालुक्यात सर्वदूर परिचित आहे. चिखली शहरात ठाणेदार गुलाबराव वाघ यांनी राबविलेल्या विवीध उपक्रमामुळे ते लोकप्रिय झाले, परंतु अश्या कर्तव्यदक्ष म्हणून ओळखले जाणाऱ्या अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रातच वरली मटका खेळणारे व खेळवणारे सर्वच सहजच दृष्टीस पडल्याशिवाय राहत नाही.सामान्य नागरिक या अवैध धंद्यांना आळा बसावा यासाठी आग्रहित आहे.या अवैध धंद्यामुळे नेहमी बाजार खरेदीसाठी जाणाऱ्या महिलांना नाहक त्रास सहन करावाच लागतो. तसेच या ठिकाणी वरली खेळणाऱ्या लोकांमधील देवाणघेवाण होत असतांना नेहमी वाद ही होतातच तर कधी कधी या वादाचे स्वरूप भांडणात व हाणामारीत परिवर्तीत होऊन बाजारातील दुकानदार, बाजार करण्यास येणारे लोकांना व महिला व लहान मुलांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागतो.
चिखली शहरात सर्रास चालणारे अवैध वरली व्यवसायवर संपूर्ण बंदी घालने ठानेदार वाघ यांच्या साठी काही मोठी गोष्ट नाही फक्त त्यांनी मनावर घेतले पाहिजे,अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त करता अशी मागणी केली की,उपविभागीय पोलीस अधिकारी बरकते, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटिल भुजबळ यांनी विशेष लक्ष द्यावे.
Post a Comment