बेलापुर प्रतिनिधी-- अयोध्याप्रश्नी निकाल हा कोणत्याही धार्मिक समुदायाने आपल्या विरोधात किंवा आपल्या बाजूने लागला आहे असा ग्रह करू नये .तो आपल्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचा असून आपण त्याचा मान राखून स्वीकारावा , , ,असे अवाहन उपविभागीय पोलिस अधीकारी राहुल मदने यांनी केले आहे
मोहम्मंद पैगंबर जयंती वआयोध्या प्रश्नी निकालाबाबत नागरीकात संभ्रम पसरवु नये या करीता बेलापूरातील औट पोस्ट येथे शांतता कमीटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते .
पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे यांनी अयोध्या प्रश्न हा राजकीय नसून न्यायालयीन बनलेला आहे ,त्यामुळे देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करावे ,असे सांगितले ,
तर पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट यांनी बेलापूर च्या नागरिकांचे विशेष कौतुक करून आजपर्यंत कुठल्याही धार्मीक कार्यक्रम असो वा मिरवणूकी दरम्यान शांतता व सुव्यवस्था राखणे कामी बेलापूरच्या नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य केले आहे व यापुढेही करतील ,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला..
या वेळी सुनील मुथा संघाचे मारुती राशीनकर , रणजीत श्रीगोड ,देविदास देसाई, नवनाथ कुताळ,
प्रा. ज्ञानेश गवले, अतिष देसर्डा,
दिपक क्षत्रिय,दिलीप दायमा,तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रकाश कुर्हे अशोक गवते ,जिल्हा परिषद सदस्य शरद नवले , प .स सदस्य अरुण पा. नाईक ,मार्केट कमिटी सदस्य सुधीर नवले ,अभिषेक खंडागळे , भरत साळुंके,उपसरपंच रविंद्र खटोड,लहानुभाऊ नागले ,आलम शेख,जिना शेख,दस्तगिर शेख,प्रा अशोक बडधे मोहसीन सय्यद हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक गणेश भिंगारदे निखील तमनर पोपट भोईटे इ.हजर होते.काँ बाळासाहेब गुंजाळ यांनी आभार मानले
Post a Comment