मुंबई : वृत्तसंस्था अनेक ठिकाणी जगभरातल्या मोठमोठ्या ब्रॅण्ड्सच्या नावाने बनावट वस्तूंची विक्री केली जाते. त्यासाठी संबंधित कंपन्यांसारखे पॅकेजिंग केले जाते. अशाप्रकारे फसवणूक करणाऱ्या संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ओरिजनल कंपनीसारखे पॅकेजिंग करण्यासाठी या मालाचा वापर केला जात असल्याचा संशय असून यामध्ये सुमारे 25 कोटी रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे.भिवंडी तालुक्यातील वळपाडा येथे पोलिसांनी ही कारवाई केली. कारवाईत कॅनॉन, सॅमसंग, व इपसॉन या नामवंत इलेक्ट्रॉनिक कंपन्यांच्या वस्तूंचे बनावट पॅकेजिंग केले जात असल्याचे समोरे आले असून यात जवळपास 25 कोटींहून अधिक रक्कमेचे पुठ्ठ्याचे साहित्य तसेच बनावट वेष्टन पोलिसांनी जप्त केले.याप्रकरणी एका संशयितास ताब्यात घेतल्याची माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. किशोर आंबा बेरा (28) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.संबंधित गोदामात अनधिकृतपणे पॅकेजिंग साहित्य ठेवण्यात आले असल्याची माहिती भिवंडीचे पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार नारपोली पोलिसांच्या मदतीने घटनास्थळी छापा टाकून सदरचा मुद्देमाल जप्त केला. संशयितांवर कॉपिराईट अॅक्ट 1957 चे कलम 51 आणि कलम 63 अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Post a Comment