बुलडाणा- 7 नोव्हे.
येथील जिल्हाधिकारी कार्यालय समोर मागील 24 डिसेंबर 2018 पासुन ईपीएस पेंशनधारक आपल्या मागण्या घेऊन साखळी उपोषण करीत आहे आज त्यांचे आंदोलन चिघडले व पोलिस व आंदोलन करणाऱ्या मध्ये धक्काबुक्की झाली आहे.
देशातील निमशासकीय पेंशनधारकाना पेंशनवाढ मिळावी यासाठी ईपीएस संघटनेच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यलयासमोर मागील 318 दिवसांपासून साखळी उपोषण करीत आहे, मात्र शासन या पेंशनधारकाकडे दुर्लक्ष करीत असल्याने आज पेंशनधारकानी जिल्हाधिकारी कार्यालय जवळ एसबीआई चौकात विनापरवानगी रास्तारोको आंदोलन करीत रस्त्यावर झोपून आंदोलन करीत वाहन अडवून ट्रैफिक जाम केला होता. ट्राफिक पुन्हा सुरु व्हावे म्हणून पेंशनधारकाना तेथून हटविले. सर्व आंदोलक आपल्या मंडप कडे येत असतांना पीएसआई अभय पवार यांनी ऐका आंदोलका कडून माइक हिसकला व या मुळे आंदोलक चिघडले व पोलीस व आंदोलका मध्ये लोटपाट झाली.विशेष म्हणजे ही घटना जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या कार्यल्यासमोरच घडली असल्याने परिसरात चांगलाच तनाव व गोंधळ निर्माण झाला होता. चिडलेल्या पेंशनधारकानी पोलिसांना सुद्धा लोटपाट केलीय. मात्र काहीवेळातच मध्यस्थी झाल्याने हा वाद मिटला मात्र या प्रकरणी पेंशनधारक आंदोलकावर पोलीस काय कार्यवाई करते याच्या कडे लक्ष लागले आहे.
Post a Comment