श्रीरामपूर (प्रतिनिधी)- शहरातील कांदा मार्केट परिसरातून ट्रक चालक व क्लिनरची लूट केल्याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांनी पाच दरोडेखोरांच्या टोळीला अटक केली आहे. दि. 11 रोजी रात्री विरप्पा बनेप्पा जोगी (रा. बसवाना, जि. विजापूर, राज्य कर्नाटक) यांनी त्यांची अशोक लेलॅण्ड ट्रक (क्र. टी.एस. 10 बी.क्यु.9269) ही कांदा मार्केट परिसरात उभी केली होती. त्यावेळी आरोपी आकाश दिनकर सौदागर, धम्मा ज्ञानदेव पटाईत, अजय विजय खंदारे, प्रकाश अरुण समुद्रे व किरण जगन्नाथ चिकणे (सर्व रा. भीमनगर, वॉर्ड नं. 6, श्रीरामपूर) यांनी ट्रक ड्रायव्हर, क्लिनरला मारहाण करून 1500 रुपये रोख रक्कम, कपडे, गाडीची चावी, एटीएम कार्ड असा माल मारहाण करून चोरून नेला.यावेळी ट्रक ड्रायव्हर व क्लिनरने आरडाओरड केल्याने रात्री गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचार्यांनी याठिकाणी येऊन काही आरोपींना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी दोन पथके रवाना करून आरोपींचा परिसरात शोध सुरू करून आरोपींना रोख रकमेसह ताब्यात घेतले असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.पोलीस निरीक्षक श्रीहरि बहिरट, सपोनि संभाजी पाटील, पोसई दत्तात्रय उजे, पोहेकॉ. जालिंदर लोंढे, पोना सोमनाथ गाडेकर, रामेश्वर ढोकणे, किशोर जाधव, गणेश वावडे, महेंद्र पवार, हरिष पानसंबळ, सुनील दिघे, पंकज गोसावी, अर्जून पोकळे यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली.
Post a Comment