Latest Post

येणाऱ्या काही दिवसांमध्ये रामजन्मभूमी व बाबरी मज्जिद या संवेदनशील विषयावर मा.सर्वोच्च न्यायालय यांचेकडून न्यायनिवाडा होणार आहे. हा निकाल देणारी यंत्रणा म्हणजे देशाची सर्वोच्च न्यायव्यवस्था असून तीचेवर सर्व भारतीय जनतेचा विश्वास आहे. तरी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा सर्व भारतीय नागरिकाने पाळणे बंधनकारक आहे. सदर चा निकाल काहीही असो या निकालानंतर चांगल्या अथवा वाईट प्रतिक्रिया व्हाट्सअप, फेसबुक अथवा इतर सोशल मीडिया,पत्रकबाजी टीका टिपणी देणे हा न्यायालयाचा अवमान ठरेल अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देणे म्हणजे हा न्यायालयाचा अवमान करणाऱ्या व्यक्तींविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
     तरी नागरिकांनी खालील सूचनांचे काटेकोर पणे पालन करावे.

जमाव करून थांबू नये.
-------------------------------
सोशल मीडियावर सदर निकालाचे अनुषंगाने कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील अशा प्रकारचे संदेश प्रसारित करू नयेत.
---------------------------------
निकालानंतर गुलाल उधळू नये.
----------------------------------
 फटाके वाजवू नयेत.
-----------------------------------
 सायलेन्सर काढून गाड्या पळवू नयेत.
------------------------------------
 महाआरती अथवा समूह पठण याचे आयोजन करू नये.
------------------------------------
 निकाला निमित्त पेढे, साखर अथवा मिठाई वाटू नयेत.
------------------------------------
 घोषणाबाजी जल्लोष करू नये.
------------------------------------
 मिरवणुका रॅली काढू नये.
------------------------------------
 भाषण बाजी करू नये.
------------------------------------
 कोणतेही वाद्य वाजवू नये. धार्मिक भावना दुखावण्याचा बुद्धिपुरस्सर उद्देशाने शब्द उच्चारू नये.
------------------------------------
 कोणत्याही प्रकारचे जातीय दंगलीच्या अनुषंगाने जुने व्हिडिओ,फोटो फोटो पुन्हा प्रसारित करून अफवा पसरवू नये..
------------------------------------
       सदरचा निकाल हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला केवळ जागेसंदर्भातील निकाल असेल.
     तरी वरील सूचनांचे उल्लंघन केल्यास, जातीय तणाव निर्माण केल्यास, धार्मिक भावना भडकवल्यास त्याचेवर भारतीय दंड सहिता कलम
कलम 295 कोणत्याही वर्गाच्या धर्माचा अपमान करण्याच्या उद्देशाने उपासना स्थानाचे नुकसान करणे अगर ते अपवित्र करणे.
------------------------------------
कलम 295 (अ) कोणत्याही वर्गाच्या धर्माचा किंवा धार्मिक श्रद्धांचा  करून धार्मिक भावनांवर अत्याचार करण्याच्या उद्देशाने बुद्धिपुरस्सर व दुष्ट उद्देशाने कृती करणे.
------------------------------------
⭕ कलम 298 धार्मिक भावना दुखावण्याचा च्या बुद्धिपुरस्सर उद्देशाने शब्द उच्चारणे याशिवाय इतर प्रचलित कायद्यान्वये दखलपात्र स्वरूपाचे गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करून मा. न्यायालयात समक्ष हजर करण्यात येईल.
   🙏 तरी सर्व नागरिकांना *शांतता राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे
💯%आपल्या प्रत्येक हालचालीवर पोलिसांचे व सायबर सेलचे लक्ष आहे

            श्रीहरी बहिरट
          पोलीस निरीक्षक
     श्रीरामपूर शहर पो.ठाणे

अहमदनगर (प्रतिनिधी) मोटारसायकली चोरी करून त्या विक्री करणारा सराईत गुन्हेगार एलसीबीच्या जाळ्यात सापडला आहे. त्याच्याकडून चोरीच्या बुलेटसह सहा गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.सुरज शिवाजी शिंदे (रा. बुरूडगाव रोड, आयटीआय कॉलेजजवळ) असे पोलिसांनी अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. सुनील गुगळे यांची बुलेट 15 ऑक्टोबर रोजी चोरीला गेली होती. ही बुलेट शिंदे याने चोरली असून ती विक्रीसाठी तो नवनागापूरच्या सह्याद्री चौकात येणार असल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना खबर्‍याकडून मिळाली. त्यानुसार पवार यांनी पोलिसांचे पथक नियुक्त करून कारवाईचे आदेश दिले. शिंदे हा बुलेटसह येताना दिसताच पोलीस पथकाने त्याला अडविले. सुरूवातीला त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली मात्र नंतर त्याने चोरीची कबुली दिली. ही मोटारसायकल जप्त करत आणखी विचारपूस करता त्याने चोरीच्या मोटारसायकली पोलिसांना दाखविल्या. त्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. गोदाम टिळक रोडला गेल्या सहा-सात महिन्यापासून शिंदे हा नगर शहरात मोटारसायकली चोरी करत होता. चोरीच्या मोटारसायकलला गिर्‍हाईक न मिळाल्याने त्याने त्या टिळक रोडला भाडोत्री खोलीत राहत असलेल्या आईच्या खोलीशेजारीला मोकळ्या जागेत बारदाण्याखाली झाकून ठेवल्या होत्या. पोलिसांनी त्या जप्त केल्या.

बेलापूर  ( प्रतिनिधी  )-  एका शेतकऱ्यांने नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी आलेल्या अधिकार्या समोरच मोड फुटलेल्या सोयाबीनच्या ढिगार्यास आग लावल्याची घटना बेलापूर खूर्द येथे घडली आहे                बेलापूर खुर्द येथील  आशा रामराव महाडिक व रामराव नारायण महाडीक यांच्या एक  एकर  शेतात सोयाबीनचे पीक घेण्यात आले होते नुकत्याच झालेल्या पावसाने काढणीस  आलेले सोयाबीन पूर्णता भिजून गेले अनेक ठिकाणी तयार सोयाबीन ला मोड फुटले शासनाने नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्याचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून शासनाच्या आदेशानुसार बेलापूर खुर्द येथील  ग्रामसेवक सी डी  तुंबारे भाऊसाहेब कृषि अधिकारी तनपुरे   तसेच कोतवाल सुनील बाराहते पोलीस पाटील नर्सरी उमेश बाराहते व बेलापूर खुर्द चे पोलीस पाटील युवराज जोशी हे सर्वजण महाडिक यांच्या शेतात पंचनामा करण्याकरता गेले होते तयार झालेल्या सोयाबीनला पुर्णपणे कोंब फुटले होते  सोयाबीनची अवस्था पाहून संबंधित शेतकऱ्याचा राग अनावर झाला पंचनामा फोटो सातबारा विमा  पावती आदि कागदपत्राची पूर्तता  केल्यानंतरही शासन मदत तरी किती देणार त्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्याने संबधीत अधिकार्या समक्षच सोयाबीनच्या गंजीस आग लावली हे पाहून पंचनामे झालेले अधिकारीही ही गोंधळून गेले या बाबत कामगार तलाठी विकास शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की कृषि अधिकारी ग्रामसेवक पोलीस पाटील यांच्या समक्ष पंचनामा करुन कागदपत्र  माझ्याकडे  जमा झालेली आहे सदर शेतकऱ्याने तयार झालेली सोयाबीन पावसाने भिजल्यामुळे त्यास मोड फुटलेले होते असे शिंदे यांनी सांगितले

सिल्लोड, ता.(04) : धानोरा (ता.सिल्लोड) येथील पूर्णावाडी परिसरातील शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने सोमवार (ता.4) रोजी सकाळी निधन झाले. परतीच्या पावसाने तालुक्यात थैमान घातल्याने जनावरांच्यासाठी असलेला चारा देखील वाहून गेला आहे. मयत झालेले शेतकरी कृष्णा काकडे (वय.38)यांचा प्रपंच दुभत्या जनावरांच्या दुधावरच अवलंबून होता. गेल्या दोन दिवसांपासून ढसाढसा रडत जनावरांना झाडांचा पाला खाऊ घालणारे काकडे प्रचंड तणावाखाली होते. आज सकाळी या काळजीपोटी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. सिल्लोड येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, त्यांच्या मृतदेहावर शेतवस्तीवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे

बेलापूर  ( प्रतिनिधी )-- इतर पिकाबरोबरच डाळींब पिकाचेही पंचनामे करुन डाळींब उत्पादकांना नुकसान भरपाई  देण्यात यावी अशी मागणी डाळींब उत्पादक शेतकरी रवींद्र खटोड यांनी केली आहे             पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले पावसाचे पाणी फळ बागामध्ये साचल्यामुळे कालही ठिकाणी  मुळकुज फळकुज तर अनेक ठिकाणी  फुलगळीचे प्रमाण वाढले आहे डाळींबामध्ये प्रामुख्याने जुन मध्ये मृग सप्टेंबर मध्ये हस्त तर जानेवारीत आंबिया आसे तीन बहार धरले जातात सार्वाधिक बहार हा हस्त बहार धरला जातो अन नेमक्या याच बहारामधे अतिवृष्टी झाली आहे सप्टेंबर महिन्यात हस्त बहाराची  छाटणी पानगळ ही कामे केली जातात अनेक शेतकऱ्यांनी हस्त बहार धरला त्यांच्या डाळींबाची चांगली  सेटींगही झाली काहु ठिकाणी  फळ सेटींग चांगली  झिलेली असताना अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी फुल गळती झालेली आहे तयार होत असलेल्या फळामधे पाणी शिरल्याने फळकुजही वाढली आहे बागेत पाणी साचल्याने मुळकुजही वाढली आहे बहार धरल्या नंतर दोन महीन्यात मोठ्या प्रमाणात खर्च झालेला आहे तरी डाळीब शेतीचे पंचनामे करुन त्यांना नुकसान भरपाई  देण्यात यावी अशी मागणी  खटोड यांनी केली आहे

श्रीरामपूर-शहरातील विविध भागातील रस्ते पूर्णपणे उखडले गेले आहेत सर्व रस्त्यावर जागोजागी मोठं-मोठे खड्डे निर्माण झालेले आहे,पावसाचे पाणी या खड्ड्यात जमा होऊन रस्त्यातील साचलेल्या पाण्यामुळे अंदाज न आल्याने अनेक अपघात झाले अनेक जीव अपघातात गेले अनेक जन कमी अधिक प्रमाणात अपंग झाले, काही व्यक्ती आजही विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत या सर्व प्रकारास घटनेस श्रीरामपूर नगर पालिकेतील सत्ताधारी हेच जबाबदार आहेत,शासनयोजणे अंर्तगत नगरपालिका निधीमधून शहरातील सर्व रस्त्याची देखभाल,दुरुस्ती, डागडुजी,होणे गरजेचे असताना राजकीय द्वेषाने पछाडलेल्या सत्ताधार्यांनी रस्त्याची कामे करण्यास जाणून बुजून टाळले आहे.व आजही टाळत आहेत त्यामुळे शहर वासीयांवर मानव निर्मित आपत्तीने इच्छा नसताना मरणे अपंग होणे हे नशिबी येत आहे व आलेले आहे असा आरोप आम आदमी पार्टी चे जिल्हा अध्यक्ष तिलक डुंगरवाल यांनी रास्तारोको प्रसंगी केला.
सत्ताधारी मात्र विकासाच्या गप्पा मारण्यात मशगुल आहेत,विकासाचे गाजर दाखवून सामान्य माणसाची नगरपरिषदेने घोर फसवणूक केली आहे देवाज्ञा झालेले व अपंग झालेल्या यांचा तळतळाट श्रीरापमुर नगरपषदेतील सत्ताधाऱ्यांना लागणार आहे असे तालुका अध्यक्ष विकास डेंगळे म्हणाले.
विकासाच्या वल्गना करणाऱ्या नगरपरिषदेला देव सद्बुद्धी देवो आणि शराहतील सर्व रस्त्याची मजबुतीकरण्यासह डांबरी करण त्वरीत होवो नागरिकांची मरणाची वाट पाहू नका तुम्हाला येथेच सर्व फेडावे लागेल,देव तुम्हाला माफ करणार नाही असा इशारा कामगार नेते नागेशभाई सावंत यांनी दिला,नगरपालिका सत्ताधार्यांनी शहरातील रस्त्यांचे कामे न केल्या मूळे आज दिनांक 3 -11- 2019 सकाळी 10 वाजता संगमनेर नेवासा रोड बसस्टँड शेजारी रास्ता रोको करण्यात आला होता
शहरातील रस्त्याचे कामे त्वरित न झाल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन हाती घेण्यात येईल असा इशारा पोलीस अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला.यावेळी महाराष्ट्र सर्वोद्योग कामगार कर्मचारी युनियन,मराठा सेवा संघ, आदी संघटनानी पाठिंबा दिला.

यावेळी रस्त्यावर 3 स्पायडरमॅन कसरत पहिला मिळाले स्पायडरमॅन-लक्ष चोरडीया,राज डेंगळे,वेद भोसले.

आंदोलन यशस्वी करण्यासाठी यात आप चे जिल्हा अध्यक्ष तिलक डुंगरवाल,कामगार नेते नागेश भाई सावंत तालुका अध्यक्ष विकास डेंगळे,राहुल रणपिसे,तालुका मीडिया अध्यक्ष प्रविण जमधडे,मराठा स्वयं सेवक संघाचे राजेंद्र भोसले, आम आदमी पार्टी चे राजुभाई शेख,भारत डेंगळे, सलीम शेख,रोहित भोसले,राजेश पाटील,दीपक परदेशी,रोहित भोसले,अक्षय कुमावत,  यशवंत जेठे,हरिभाऊ तुवर,जयेश पाटील,आनंद पाटील,बाबासाहेब गवारेभैरव मोरे,,राजू यादव,अक्षय गिरमे,नितेश हिंगमिरे, रमेश भोरे,देवराज मूळे, राजू राहिंज,दीपक पांचाळ,किरण डेंगळे,सागर देवकर,किरण गायकवाड, देवेंद्र गोरे,अनिकेत धनगे, दीपक वावधने,प्रशांत बागुल,पप्पू जेठे,रोहन उंडे, शाम कांबळे,प्रवीण लगडे ,भागवत बोंबले,देवराज मुळे, राहुल डांगे,बी.एम.पवार,योगेश तांबे,संदीप सिंगटे, राहुल केदार,दिनेश यादव,सुनील धनवटे, सतीश धनवटे,अनिल जाधव ,सचिन जगरवल,अनिरुद्ध कुलकर्णी,आदी कार्यकर्ते,मोठ्या संख्येने उपस्थित होते


अहमदनगर (प्रतिनिधी) स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून साकत शिवरात(ता.नगर) 3 लाख रुपये रोख रक्कम, घड्याळ, मोबाईल, गॉगल, वॉलेट असा एकुण 3 लाख 76 हजाराचा मुद्देमाल लुटणार्‍या टोळीतील एकाला नगर तालुका पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवत दोन तासात अटक केली आहे. समाधान गजानन काळे(वय- 27 रा. दहिगाव ता. नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अद्याप सात जण फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.शुक्रवारी(दि.01) पुणे येथील व्यापारी संभाजी शिवाजी इंदळकर(वय-44) यांना अनओळखी नंबर वरून फोनद्वारे 3 लाखात अर्धा किलो सोने देतो म्हणून बतावणी केली. यासाठी त्यांना साकत(ता.नगर)येथे एका शेतात बोलवण्यात आले. इंदळकर तेथे येताच 8 जणांनी त्यांच्या जवळील 3 लाख रुपये रोख रक्कम, घड्याळ, मोबाईल, गॉगल, वॉलेट असा 3 लाख 76 हजाराचा मुद्देमाल चोरुन नेला. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget