बेलापूर ( प्रतिनिधी )-- इतर पिकाबरोबरच डाळींब पिकाचेही पंचनामे करुन डाळींब उत्पादकांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी डाळींब उत्पादक शेतकरी रवींद्र खटोड यांनी केली आहे पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले पावसाचे पाणी फळ बागामध्ये साचल्यामुळे कालही ठिकाणी मुळकुज फळकुज तर अनेक ठिकाणी फुलगळीचे प्रमाण वाढले आहे डाळींबामध्ये प्रामुख्याने जुन मध्ये मृग सप्टेंबर मध्ये हस्त तर जानेवारीत आंबिया आसे तीन बहार धरले जातात सार्वाधिक बहार हा हस्त बहार धरला जातो अन नेमक्या याच बहारामधे अतिवृष्टी झाली आहे सप्टेंबर महिन्यात हस्त बहाराची छाटणी पानगळ ही कामे केली जातात अनेक शेतकऱ्यांनी हस्त बहार धरला त्यांच्या डाळींबाची चांगली सेटींगही झाली काहु ठिकाणी फळ सेटींग चांगली झिलेली असताना अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी फुल गळती झालेली आहे तयार होत असलेल्या फळामधे पाणी शिरल्याने फळकुजही वाढली आहे बागेत पाणी साचल्याने मुळकुजही वाढली आहे बहार धरल्या नंतर दोन महीन्यात मोठ्या प्रमाणात खर्च झालेला आहे तरी डाळीब शेतीचे पंचनामे करुन त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी खटोड यांनी केली आहे
Post a Comment