सिल्लोड, ता.(04) : धानोरा (ता.सिल्लोड) येथील पूर्णावाडी परिसरातील शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने सोमवार (ता.4) रोजी सकाळी निधन झाले. परतीच्या पावसाने तालुक्यात थैमान घातल्याने जनावरांच्यासाठी असलेला चारा देखील वाहून गेला आहे. मयत झालेले शेतकरी कृष्णा काकडे (वय.38)यांचा प्रपंच दुभत्या जनावरांच्या दुधावरच अवलंबून होता. गेल्या दोन दिवसांपासून ढसाढसा रडत जनावरांना झाडांचा पाला खाऊ घालणारे काकडे प्रचंड तणावाखाली होते. आज सकाळी या काळजीपोटी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. सिल्लोड येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, त्यांच्या मृतदेहावर शेतवस्तीवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे
Post a Comment