बेलापूर ( प्रतिनिधी )- एका शेतकऱ्यांने नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी आलेल्या अधिकार्या समोरच मोड फुटलेल्या सोयाबीनच्या ढिगार्यास आग लावल्याची घटना बेलापूर खूर्द येथे घडली आहे बेलापूर खुर्द येथील आशा रामराव महाडिक व रामराव नारायण महाडीक यांच्या एक एकर शेतात सोयाबीनचे पीक घेण्यात आले होते नुकत्याच झालेल्या पावसाने काढणीस आलेले सोयाबीन पूर्णता भिजून गेले अनेक ठिकाणी तयार सोयाबीन ला मोड फुटले शासनाने नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्याचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून शासनाच्या आदेशानुसार बेलापूर खुर्द येथील ग्रामसेवक सी डी तुंबारे भाऊसाहेब कृषि अधिकारी तनपुरे तसेच कोतवाल सुनील बाराहते पोलीस पाटील नर्सरी उमेश बाराहते व बेलापूर खुर्द चे पोलीस पाटील युवराज जोशी हे सर्वजण महाडिक यांच्या शेतात पंचनामा करण्याकरता गेले होते तयार झालेल्या सोयाबीनला पुर्णपणे कोंब फुटले होते सोयाबीनची अवस्था पाहून संबंधित शेतकऱ्याचा राग अनावर झाला पंचनामा फोटो सातबारा विमा पावती आदि कागदपत्राची पूर्तता केल्यानंतरही शासन मदत तरी किती देणार त्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्याने संबधीत अधिकार्या समक्षच सोयाबीनच्या गंजीस आग लावली हे पाहून पंचनामे झालेले अधिकारीही ही गोंधळून गेले या बाबत कामगार तलाठी विकास शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की कृषि अधिकारी ग्रामसेवक पोलीस पाटील यांच्या समक्ष पंचनामा करुन कागदपत्र माझ्याकडे जमा झालेली आहे सदर शेतकऱ्याने तयार झालेली सोयाबीन पावसाने भिजल्यामुळे त्यास मोड फुटलेले होते असे शिंदे यांनी सांगितले
Post a Comment