मोटारसायकली चोरी करून त्या विक्री करणारा सराईत गुन्हेगार एलसीबीच्या जाळ्यात.

अहमदनगर (प्रतिनिधी) मोटारसायकली चोरी करून त्या विक्री करणारा सराईत गुन्हेगार एलसीबीच्या जाळ्यात सापडला आहे. त्याच्याकडून चोरीच्या बुलेटसह सहा गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.सुरज शिवाजी शिंदे (रा. बुरूडगाव रोड, आयटीआय कॉलेजजवळ) असे पोलिसांनी अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. सुनील गुगळे यांची बुलेट 15 ऑक्टोबर रोजी चोरीला गेली होती. ही बुलेट शिंदे याने चोरली असून ती विक्रीसाठी तो नवनागापूरच्या सह्याद्री चौकात येणार असल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना खबर्‍याकडून मिळाली. त्यानुसार पवार यांनी पोलिसांचे पथक नियुक्त करून कारवाईचे आदेश दिले. शिंदे हा बुलेटसह येताना दिसताच पोलीस पथकाने त्याला अडविले. सुरूवातीला त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली मात्र नंतर त्याने चोरीची कबुली दिली. ही मोटारसायकल जप्त करत आणखी विचारपूस करता त्याने चोरीच्या मोटारसायकली पोलिसांना दाखविल्या. त्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. गोदाम टिळक रोडला गेल्या सहा-सात महिन्यापासून शिंदे हा नगर शहरात मोटारसायकली चोरी करत होता. चोरीच्या मोटारसायकलला गिर्‍हाईक न मिळाल्याने त्याने त्या टिळक रोडला भाडोत्री खोलीत राहत असलेल्या आईच्या खोलीशेजारीला मोकळ्या जागेत बारदाण्याखाली झाकून ठेवल्या होत्या. पोलिसांनी त्या जप्त केल्या.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget