येणाऱ्या काही दिवसांमध्ये रामजन्मभूमी व बाबरी मज्जिद या संवेदनशील विषयावर मा.सर्वोच्च न्यायालय यांचेकडून न्यायनिवाडा होणार आहे. हा निकाल देणारी यंत्रणा म्हणजे देशाची सर्वोच्च न्यायव्यवस्था असून तीचेवर सर्व भारतीय जनतेचा विश्वास आहे. तरी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा सर्व भारतीय नागरिकाने पाळणे बंधनकारक आहे. सदर चा निकाल काहीही असो या निकालानंतर चांगल्या अथवा वाईट प्रतिक्रिया व्हाट्सअप, फेसबुक अथवा इतर सोशल मीडिया,पत्रकबाजी टीका टिपणी देणे हा न्यायालयाचा अवमान ठरेल अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देणे म्हणजे हा न्यायालयाचा अवमान करणाऱ्या व्यक्तींविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
तरी नागरिकांनी खालील सूचनांचे काटेकोर पणे पालन करावे.
❌ जमाव करून थांबू नये.
-------------------------------
❌ सोशल मीडियावर सदर निकालाचे अनुषंगाने कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील अशा प्रकारचे संदेश प्रसारित करू नयेत.
---------------------------------
❌ निकालानंतर गुलाल उधळू नये.
----------------------------------
❌ फटाके वाजवू नयेत.
-----------------------------------
❌ सायलेन्सर काढून गाड्या पळवू नयेत.
------------------------------------
❌ महाआरती अथवा समूह पठण याचे आयोजन करू नये.
------------------------------------
❌ निकाला निमित्त पेढे, साखर अथवा मिठाई वाटू नयेत.
------------------------------------
❌ घोषणाबाजी जल्लोष करू नये.
------------------------------------
❌ मिरवणुका रॅली काढू नये.
------------------------------------
❌ भाषण बाजी करू नये.
------------------------------------
❌ कोणतेही वाद्य वाजवू नये. धार्मिक भावना दुखावण्याचा बुद्धिपुरस्सर उद्देशाने शब्द उच्चारू नये.
------------------------------------
❌ कोणत्याही प्रकारचे जातीय दंगलीच्या अनुषंगाने जुने व्हिडिओ,फोटो फोटो पुन्हा प्रसारित करून अफवा पसरवू नये..
------------------------------------
सदरचा निकाल हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला केवळ जागेसंदर्भातील निकाल असेल.
तरी वरील सूचनांचे उल्लंघन केल्यास, जातीय तणाव निर्माण केल्यास, धार्मिक भावना भडकवल्यास त्याचेवर भारतीय दंड सहिता कलम
⭕ कलम 295 कोणत्याही वर्गाच्या धर्माचा अपमान करण्याच्या उद्देशाने उपासना स्थानाचे नुकसान करणे अगर ते अपवित्र करणे.
------------------------------------
⭕ कलम 295 (अ) कोणत्याही वर्गाच्या धर्माचा किंवा धार्मिक श्रद्धांचा करून धार्मिक भावनांवर अत्याचार करण्याच्या उद्देशाने बुद्धिपुरस्सर व दुष्ट उद्देशाने कृती करणे.
------------------------------------
⭕ कलम 298 धार्मिक भावना दुखावण्याचा च्या बुद्धिपुरस्सर उद्देशाने शब्द उच्चारणे याशिवाय इतर प्रचलित कायद्यान्वये दखलपात्र स्वरूपाचे गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करून मा. न्यायालयात समक्ष हजर करण्यात येईल.
🙏 तरी सर्व नागरिकांना *शांतता राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे
💯%आपल्या प्रत्येक हालचालीवर पोलिसांचे व सायबर सेलचे लक्ष आहे
श्रीहरी बहिरट
पोलीस निरीक्षक
Post a Comment