Latest Post

बेलापूर  (प्रतिनिधी  )-- राष्ट्रसंत प .पू .स्वामी श्री गोविंददेवगिरीजी महाराज तथा आचार्य  किशोरजी   व्यास महाराज यांचे उपस्थितीत  बेलापूरात विविध धार्मिक कार्यक्रम व प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे                           आचार्य किशोरजी व्यास तथा राष्ट्र  संत प पू स्वामी गोविंददेवगिरीजी यांचे सकाळी बेलापूर येथे आगमन होणार असुन बेलापूरचे ग्रामदैवत श्री हरिहर केशव गोविंद भगवंताच्या सुप्रसन्नतेसाठी पंडीत महेश व्यास मोहन खानवेलकर हं भ प सोपान महाराज हिरवे यांच्या अधिपत्याखाली करण्यात आलेल्या श्री हरिहर याग  कार्यक्रमास आचार्य किशोरजी व्यास उपस्थित  राहुन उपस्थितांना उपदेश करणार आहे त्या नंतर प्रसाद वाटप करण्यात येणार आहे दुपारी चार वाजता जे टी एस हायस्कूलच्या मागील पटांगणात आचार्य  किशोरजी व्यास यांचे जाहीर प्रवचन तसेच आचार्य  किशोरजी व्यास यांच्या हस्ते  कै .मुरलीधर खटोड पतसंस्थेच्या वतीने सभासदांना वस्तुचे वाटप त्या नंतर सांयकाळी जुने बालाजी मंदिर येथे अन्नकुट उत्सव  अशा प्रकारे  विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे  तरी ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे अवाहन करण्यात आले आहे


अहमदनगर - जामखेड येथील आरोळेवस्ती येथे बुधवार (दि.३०) रात्री घरात बळजबरीने घुसून मारहाण करीत महिल्याच्या गळ्यातील गंठण चोरून नेल्याच्या घटनेतील आरोपी २४ तासाच्या आत पकडण्याची महत्त्व पूर्ण कामगिरी नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. दीपक उर्फ सलीम नारायण भोसले (वय २४ रा.वाहिरा, ता.आष्टी जि.बीड), लखन उर्फ ढोल्या नारायण भोसले (वय २१) पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, घराचा दरवाजा तोडून घरातील माणसांना मारहाण करून ७ हजार रोख रक्कम व आधारकार्ड, पँनकार्ड व अन्य कागदपत्रे बळजबरीने चोरून नेल्याची फिर्याद रणजित बाबुराव खाडे (रा.राजुरी ता.जामखेड) यांनी जामखेड पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार तपास सुरु असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांना दाखल गुन्हा हा सलीम भोसले व लखन भोसले या दोघांनी केला असून ही दोन्ही आरोपी हे नवाबपूर ता.गंगापूर जि.औरंगाबाद येथे नातेवाईकांकडे लपवून बसले आहेत, अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार पवार यांच्या सूचनेनुसार सदर ठिकाणी जाऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून सलीम व लखन भोसले या दोघांना ताब्यात घेतले. त्याच्या कडे चौकशी केली असता, टोळी प्रमुख व भाऊ गोरख नारायण भोसले ( रा.वाहिरा ता.आष्टी), नाज्या उर्फ सोमीनाथ उर्फ दिलीप नेहऱ्या काळे (रा.घुमरी ता.कर्जत), रावसाहेब विलास भोसले ( रा. हातवळण ता.आष्टी) अशी मिळून गुन्हा केल्याची कबुली दिली. पकडण्यात आलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी जामखेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि संदीप पाटील, पोसई गणेश इंगळे, पोहेकाँ सुनिल चव्हाण, सफौ सोन्याबापू नानेकर, संदीप घोडके, विशाल दळवी, रविंद्र कर्डिले, रवि सोनटक्के, संदीप दरदंले, मच्छिंद्र बर्डे, रविंद्र घुंगासे, दीपक शिंदे, सचिन कोळेकर आदीच्या पथकाने ही कारवाई केली.

अकोले (प्रतिनिधी) मित्रा कडून घेतलेले पैसे परत देण्या घेण्याच्या वादातून मित्रांनीच मित्राचा खून केल्याची घटना अकोले तालुक्यातील गर्दनी शिवारात पाडव्याच्या दिवशी घडली .या संदर्भात दोन संशयित आरोपींना अकोले पोलिसांनी अटक केली असून, त्यांना उशिरा न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.अकोले शहरापासून जवळच असलेल्या नवलेवाडी येथील प्रथमेश एकनाथ भोसले( राहणार- पिंपळगाव निपाणी, तालुका अकोले ,हल्ली मुक्काम -नवलेवाडी) यास गर्दणीच्या डोगरातील चिमणदरा येथे त्याच्या डोक्यावरती जबर मारहाण करुन त्याचा खुन करण्यात आला आहे. अकोले पोलिसांनी 24 तासाच्या आत आरोपीचा शोध लावून अटक केली .पिंपळगाव निपाणी येथील व सध्या नवलेवाडी येथे राहत असलेले मान्हेरे आश्रमशाळेतील अधिक्षक एकनाथ भोसले यांचा मुलगा प्रथमेश हा 12 वीत शिकत होता. तो सी ई टी च्या अभ्यासक्रमासाठी नांदेड येथे शिकवणी वर्गात शिकत होता. दिपावली सुटटीसाठी तो आपल्या आई-वडिल राहत असलेल्या नवलेवाडी, अकोले येथे आलेला होता.सगळीकडे दिपावली साजरी होत असताना.सोमवार दि 28 आक्टोबर 2019 रोजी दुपारी प्रथमेश भोसले हा आपल्या मित्रांना भेटण्यासाठी घरून बाहेर पडला. तो सायंकाळी गर्दणी शिवारात डोक्याला जबर मारहाण करुन खून केलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. गर्दनी चे पोलीस पाटील संतोष अभंग यांच्या माहिती वरून पोलिसांनी शोध घेतला .अकोले पोलिसांनी सुरूवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे प्रचंड गतीने फिरून या खुनाचा तपास अवघ्या 24 तासात करून आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे.पोलिस उपविभागीय अधिकारी रोशन पंडित यानी भेट दिली .यावेळी पोलिसांनी सुजान महेश देशमुख रा. माळीझाप ता. अकोले व उदय विजय गोर्डे रा.धामणगाव रोड ता.अकोले या आरोपीना बेड्या ठोकल्या .एकनाथ खडू भोसले यांच्या फिर्यादीवरुन भा द.वि 302,34 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी व मयत हे मिञ असुन मयत प्रथमेश याने आरोपीना पैसे उसने दिलेले होते. ते पैसे परत मागण्याचा तगादा प्रथमेशने लावल्याने सुजान महेश देशमुख व उदय विजय गोर्डे यानी त्याला गर्दणीच्या डोगराकडे नेऊन डोक्यात जबर मारहाण करुन खून केला . त्यात प्रथमेश त्याचा मृत्यू झाला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक अरविंद जोधळे व उपनिरीक्षक दिपक ढोमणे करत आहे. शहराजवळील गर्दनी परिसरात दिवसा खुनाची घटना घडल्याने तालुक्यातील एकच खळबळ उडाली आहे.  अवघ्या साडेसात हजार रुपयाच्या उसनवारी वरून हा खून झाल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे .सतरा अठरा वर्षाची ही मुले एकमेकाचा घातकरीत खुना पर्यंत पोचले आहे. या डोंगरावरती खून करण्यात आला तेथे काही गुरे चारणार्‍या लोकांनी या मारामार्‍या पाहिल्या असल्याचे समजते. तथापि या परिसरात मुलांमध्ये मस्करी सुरू आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. तथापि काही काळानंतर खून झाल्याची बाब उघड झाली. त्यानंतर पोलिस पाटलांना ही बातमी सांगण्यात आली. त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला आणि त्यानंतर या घटनेचा उलगडा होण्यास मदत झाली. तथापि ऐन तारुण्यात या मुलांनी खुनासारखे प्रकार केल्याने तरुण पिढीच्या संदर्भाने आता अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहे. अशा स्वरूपाचा खून करण्याचा अकोल्यातील हा पहिलाच प्रकार मानला जात आहे. अढळा परिसरातील पिंपळगाव निपाणी येथील मूळचे रहिवासी असलेले एकनाथ भोसले यांचा चिरंजीव प्रथमेश याचे शवविच्छेदन अकोले येथे झाल्यानंतर पिंपळगाव येथे उशिरा त्याच्यावरती अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रथमेश हा राजूर येथील वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेले श्री बाबासाहेब गोडगे यांचा भाचा आहे. प्रथमेश हा भोसले कुटुंबाचा एकुलता एक मुलगा होता. त्यांच्या निधनाबद्दल परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

गंगापूर तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट
बि ए एम एस डाॅक्टरने घेतला गरोदर मातेचा बळी,
गंगापुर शहरात पुन्हा एकदा बि ए एम एस डाॅक्टरने घेतला गरोदर मातेचा बळी गंगापूर तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट आहे. वरिष्ठ अधिका-यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
शहरातील ओमसाई हाँस्पीटल मधे 28 वर्षीय महीलेची प्रसुती झाल्यानंतर जास्त रक्त स्त्राव झाल्याने तीचा मृत्यू झाल्याची घटना पहाटे पाच वाजता घडली आशमा हमीद शेख असे महीलेने नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गंगापुर शहरातील नवीन बस स्टँड जवळ असलेल्या डॉ अमीत गुंजाळ यांची पत्नी
डॉ. सौ. अर्जना गुंजाळ यांचे ओमसाई हाँस्पीटल मधे मन्सूरी काँलनी येथील आशमा हमीद शेख वय 28 वर्ष हीला प्रसुती करिता दाखल करण्यात आले होते डॉ अमीत गुंजाळ व डॉ. सौ. अर्जना गुंजाळ यांनी या महीलेची प्रसुती केली प्रसुती नंतर आशमास जास्त रक्त स्त्राव होत असल्याने डॉ गुंजाळ यांनी महीलेच्या नातेवाईकांना सागींतले आशमा हीला रक्तदाब वाढला आसुन औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला यावर नातेवाईकांनी तत्काळ घाटी रुग्णालयात घेऊन गेले असता रात्री अडीच वाजता दाखल केले परंतु उपचार चालू असतांना आशमा हीचा मृत्यू झाला या घटनेची माहिती गंगापुर पोलीसांना दिल्यावरुण पोलीस उपनिरीक्षक अर्जुन चौधर व कर्मचाऱ्यांनी घाटी रुग्णालयात जाऊन पंचनामा केला यामध्ये आशमाच्या प्रसुतीनंतर अती रक्त स्त्राव झाल्याचा पंचनामा  पोलिसांनी केल्याचे सांगितले
आशमा हीच्यावर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात श्ववविच्छेदन करून मृतदेहास घेऊन नातेवाईक थेट गंगापुर पोलीस ठाणे गाठत जो पर्यंत डॉ. अमीत गुंजाळ व त्यांची पत्नी डॉ. सौ. अर्जना गुंजाळ यांच्याविरोधात मनुष्य वधाचा गुन्हा दाखल होऊन अटक होत नाही तो पर्यंत मृतदेह हलवणार असा पवित्रा घेत मोठा जमाव पोलीस ठाण्यात जमा झाला होता मात्र पोलिसांनी आश्वासन दिल्याने नातेवाईकांनी मृत आशमावर अंत्यसंस्कार करण्यासाठी घेऊन गेले.

श्रीरामपुर (प्रतिनिधी)  तालुक्यातील भोकर येथील युवा शेतकरी प्रदीप बाबासाहेब नवले (वय-37) यांचा त्यांचे सख्खे भाऊ रविंद्र नवले याने मागील भांडणाच्या रागातून जड वस्तूने डोक्यात मारून खून करून मृतदेह गवतात लपवून ठेवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,मुळ सुभाषवाडी, बेलापूर येथील रहिवाशी असलेले मात्र सध्या भोकर येथे राहत असलेले युवा शेतकरी प्रदीप बाबासाहेब नवले यांचा मृतदेह त्यांच्याच शेतात कांग्रेस गवतात आढळून आल्याची माहिती पोलीस पाटील बाबासाहेब साळवे यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिली होती.माहिती मिळताच शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे,श्रीरामपुरचे पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट, सहायक पोलिस निरीक्षक एन जे शिंदे,पो का .पवार,बर्डे,लोंढे, दिघे आदींनी घटनास्थळी भेट दिली दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचा खून झाल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.प्रदीप नवले याचा खून त्याचा सख्खा भाऊ रविंद्र याने केल्याचा संशय पोलिसांना आला.पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेऊन अधिक तपास केला असता पोलिसांचा संशय खरा ठरला. दरम्यान मयत प्रदीप याची पत्नी भाऊबीजेला माहेरी गेली होती. याबाबत प्रदीप याची पत्नी स्वाती प्रदीप नवले यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, आपण मंगळवारी सायंकाळी भाऊबीजेला माहेरी आलो होतो.रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास दीर रविंद्र याने आपले पती प्रदीप यांचेशी जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद घातले.वादातून काही तरी जड वस्तू डोक्यात मारून गंभीर जखमी केले.त्यात पती प्रदीप यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी रवींद्र बाबासाहेब नवले यास ताब्यात घेतले असून पुढील तपास तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एन जे शिंदे करीत आहेत.


अहमदनगर (प्रतिनिधी) सततच्या पावसामुळे पोलीस मुख्यालयातील मैलामिश्रीत पाणी घरामध्ये घुसले आहे. त्यामुळे वसाहतीत राहणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत महिलांनी पोलीस अधिकार्‍यांकडे तक्रारीचा पाढा वाचला. मात्र, पोलीस प्रशासनानेही दुर्लक्ष केले असल्याचे दिसत आहे.पोलीस मुख्यालयातील वसाहतीमध्ये सलगच्या झालेल्या पावसाने गटारी तुंबल्या आहेत. त्यामुळे ते मैलामिश्रीत पाणी वसाहतीमध्ये घुसले असून नागरिकांना तेथे राहणेही मुश्किल झाले आहे. त्यामुळे वसाहतीमध्ये साथीचे आजार पसरत असून, आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत संबंधित प्रशासनाकडे तक्रार केली असता त्यांनीही दुर्लक्ष केले असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे वसाहतीमधील काही महिलांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यलय गाठले.मात्र, पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांची भेट होऊ शकली नाही.गेल्या काही दिवसांपूर्वी पोलीस मुख्यालयातील कर्मचारी सुनील कुर्हे यांची मुलगी पूजा हिचा मृत्यू झाला होता. याबाबत पोलीस अधीक्षक सिंधू यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीस मुख्यालयातील नागरी सुविधांची संबंधित अधिकार्‍यांची बैठक घेतली होती. यामध्ये महापालिका, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि तहसील कार्यालयाचे अधिकारी सहभागी झाले होते. व नागरी सुविधांवर तातडीने काम करण्याच्या सुचनाही सिंधू यांनी दिल्या होत्या. त्यासाठी प्रत्येक विभागाच्या अधिकार्‍यांना टाईम लिमिट दिले होते. मात्र, आता पुन्हा नागरी सुविधाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

गुहा - दि. २७ ऑक्टोबर २०१९
गुहा येथील गंगाधर बाबा छात्रलयातील अनाथ मुलांच्या सोबत दिवाळी साजरी करून देवळाली प्रवरा येथील आप्पासाहेब ढुस मित्र मंडळाच्या  सदस्यांनी परिसरातील तरुणांसमोर नवीन आदर्श ठेवला आहे.
देवळाली प्रवरा येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नुकतीच बैठक पार पडली, त्यामध्ये सण २०१९ ची दिवाळी फटाके व प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी साजरी करण्यावर सर्व सदस्यांचे एकमत झाले, त्यामुळे फटाक्यांच्या शिल्लक रक्कमे मध्ये गुहा येथील गंगाधर बाबा छात्रालयातील अनाथ मुलांसाठी फळे देऊन त्यांचे सोबत दिवाळी साजरी करण्यात यावी यावर सर्वांचे एकमत झाले. व  आज रविवारी दि. २७ ऑक्टोबर २०१९ राजी रात्री ०८.३० वाजता एकीकडे फटाके फोडून सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना आप्पासाहेब ढुस मित्रमंडळाचे प्रसाद ढुस,  सुशांत वारुळे, राहुल पाटोळे, अरबाज शेख, साहिल शेख, तुषार उर्हे, अक्षय पाटील, प्रदीप भांड, ऋषिकेश शिरसाठ, अजित गवळी आदी कार्यकर्त्यांनी अनाथ मुलांच्या सोबत दिवाळी साजरी करून तरुण पिढीसमोर आदर्श निर्माण केला.
     या स्तुत्य उपक्रमा बद्दल गंगाधर बाबा छात्रलयाच्या वतीने पप्पू सपकाळ यांनी अनाथ मुलांच्या सोबत दिवाळी साजरी करून आप्पासाहेब ढुस मित्र मंडळाने तरुणांच्या समोर आदर्श निर्माण केला असे मांडून सर्व सदस्यांचे आभार मानले ..

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget